पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 June
Follow

माती परीक्षणाधारे खते वापराचा मिळणार सल्ला

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन संस्थेने खत उद्योगातील कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत माती परीक्षणाधारे पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक माहितीचा प्रसार महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. विशेषतः मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतांची निवड करून त्या ठिकाणी प्रात्यक्षिके तसेच जागृती कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. मिळणारे शास्त्रीय परिणाम व प्रमाणीकरणाच्या आधारे मोबाइल तंत्रज्ञानाधारे निर्णय आधार पद्धती (डिसिजन सपोर्ट सिस्टिम) विकसित केली जाणार आहे. यामध्ये पिकांची निवड व अन्नद्रव्य व्यवस्थापन अंतर्भूत करण्यात आले आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ