पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
6 Apr
Follow

महोगनी वृक्ष लागवड योजना (Mahogany Vruksh Lagwad Yojana)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महोगनी झाडाची सध्या सगळीकडे चर्चा आहे मंडळी. जगभरात व्यापारी वृक्षांच्या लागवडीत मोठे प्रयोग होत आहेत. महाराष्ट्रात महोगनी वृक्ष खाया नावाने ओळखले जाते. महोगनी हे नाव दक्षिण अफ्रिकन आहे. महोगनी झाडापासून मिळणारं लाकूड हे फर्निचर आणि फिक्स्चर बनविण्यासाठी उपयोगी पडतं त्यासाठी याला प्रचंड मागणी आहे. लाकूड कठोर टणक असतं परंतु लाकडाची गुणवत्ता उत्कृष्ट असते असं पाहायला मिळालं आहे. जर तुम्ही जुन्या काळातल्या कादंबरी वाचल्या तर महोगनीसोबत काही महत्त्वाच्या वस्तूंची ओळख करून दिली जाते, जसे की धूम्रपानासाठी म्हणजे सिगारचे लाकूड, महोगनीपासून बनवलेली खुर्ची आणि चहाची भांडी, महोगनीपासून बनवलेले ड्रेसिंग टेबल आणि बरेच काही. याचे कारण असे की हे लाकूड पॉलिश केल्यावर चांगले पोत देते आणि म्हणूनच महोगनीचे लाकूड सर्वाधिक पसंतीचे आहे.

महोगनीच्या झाडाची लागवड करण्याकरता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘वृक्ष लागवड अनुदान योजनेतून" अनुदान मिळू शकतंय. या योजनेत महोगनी सोबतच चंदन झाड लागवड, चिंच झाड, जांभूळ झाड याप्रकारच्या अन्य 31 प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया महोगनी वृक्ष लागवड योजनेविषयीची माहिती.

महोगनी झाड लावण्याची पद्धत कशी आहे?

  • महोगनीच्या दोन झाडाच्या मध्ये कमीतकमी 25 - 30 फूट अंतर ठेवायचं जेणेकरून ते चांगल्या फांद्या देऊ शकेल आणि हवेचा प्रवाह सुद्धा चांगला राहील, हवा खेळती राहील त्यामुळे झाडं लवकर वाढतात.
  • वाढ होताना झाडाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, निगा राखली पाहिजे आणि खते प्रत्येक हंगामात आणि प्रत्येक वर्षी योग्यरित्या वापरली पाहिजेत.
  • गरजेनुसार दर 10 - 15 दिवसांनी झाडांना पाणी द्यायचं.
  • पहिल्या काही वर्षात ज्या बाजूच्या फांद्या दिसतात त्या कापल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगले सरळ लाकूड मिळेल.
  • एकदा त्याची योग्य काळजी घेतली तर 25 ते 30 वर्षांच्या कालावधीत चांगले उत्पादन मिळू शकते.

आता जाणून घेऊया महोगनी झाडाच्या किमती विषयी?

  • महोगनीच्या लाकडाची किंमत घनफुटांवर अवलंबून असते आणि महोगनी झाडाची किंमत घनफूटानुसार 10,000 ते 50,000 रुपये दरम्यान असते.
  • बहुतेक 10 वर्षांच्या महोगनी झाडाची विक्री किंमत 10,000 ते 15,000 रुपये प्रति झाड असते.

महोगनी वृक्ष लागवडीबद्दल काही गोष्टी :

  • महोगनीचे झाड जास्त पाण्याची मागणी करत नाही आणि कोणत्याही मातीत, हवामानात सहज टिकून राहू शकते.
  • केवळ 1 एकर जमिनीतून अंदाजे 67 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळविता येऊ शकतो.
  • लहान शेतकरी हे झाड त्यांच्या शेताच्या आवाराच्या किमान सीमेवर लावू शकतात.
  • केवळ 100 महोगनी झाडे कोणत्याही शेतकऱ्याचे नशीब बदलू शकतात,
  • तथापि, सर्वोत्तम नफा मिळविण्यासाठी प्रत्येकाने 800 ते 1200 महोगनी रोपे प्रति एकर लावली पाहिजेत.

महोगनी झाडाच्या शेतीसाठी अनुदान कसं मिळवाल?

  • महोगनीच्या झाडाची लागवड करण्याकरता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘वृक्ष लागवड अनुदान योजने’ अंतर्गत अनुदान मिळत आहे.
  • या योजनेत महोगनी सोबतच चंदन झाड लागवड, चिंच झाड , जाभूळ झाड याप्रकारच्या अन्य 31 प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत महोगनी झाडाची शेती करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना 2 लाख 56 हजार रुपयांचं एकरी अनुदान देण्यात येत आहे.
  • आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीत अथवा रोजगार हमी सेवा केंद्राशी संपर्क साधून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या अनुदान संदर्भाततला फॉर्म दिला जातो तो डाउनलोड करून संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक भरून आपल्या गावातल्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचा.
  • कमी गुंतवणुकीमुळे आणि भरघोस परतावा मिळत असल्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ताबडतोब महोगनी वृक्ष लागवडीला सुरुवात करावी.

अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा?

  • महोगनी वृक्षलागवडीसाठी च्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे लिखित स्वरूपात अर्ज करून ग्रामपंचायतीला येणारे वर्ष मोहगनी वृक्ष लागवड या सदराखाली तुम्हाला किती एकर लागवड करायची आहे त्याची माहिती देऊन चालू वर्षाच्या आराखड्यात वैयक्तिक नावासह नाव घेण्यास सांगावे.
  • सदरचा आराखडा हा ग्रामपंचायती 26 जानेवारीला बनवत असतात.
  • जर तुमच्या 26 जानेवारी चा आराखड्यात नाव नाही आले तर, ऑगस्ट 15 ला पुरवणी आराखडा दिला जातो त्याच्यात नाव घेण्यास सांगावे.

क्षेत्र मर्यादा:

  • फळझाड फळपीक व वृक्ष लागवडीसाठी किमान 0.05 हेक्टर व कमाल 2 हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे.
  • इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
  • ही जमीन कूळ कायद्या खाली येत असल्यास व 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात येते.

अर्ज कुठे करावा:

ग्रामपंचायत कार्यलयात अथवा रोजगार हमी सेवा केंद्राशी संपर्क साधून.

आवश्यक कागदपत्रे:

  • 7/12 उतारा
  • 8अ उतारा ( एकुण क्षेत्र 2 हे.पेक्षा कमी)
  • आधार कार्ड
  • राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स

कलमे रोपे खरेदी कोठून करावीत:

  • कलमे रोपे निवड व खरेदी लाभार्थी यांनी स्वत: करावी. कलमे/ रोपे दर्जाबाबतची जबाबदारी लाभार्थींची राहील. लाभार्थ्याने कलमे/ रोपे खरेदी करताना खालीलप्रमाणे रोपवाटीकांना प्राधान्य द्यावे.
  • कृषी विभागाच्या रोपवाटीका
  • कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका
  • खाजगी शासन मान्य रोपवाटिका
  • सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय रोपवाटिका
  • परवानाधारक खाजगी रोपवाटीकेवरुन कलमे/रोपे खरेदी करावयाची गरज पडल्यास मा. आयुक्त कृषि यांनी लागू केलेल्या दराने खरेदी करता येईल.
  • कलमे/रोपे उपलब्धतेबाबतच्या अद्यावत माहितीसाठी National Nursery Portal च्या nnp.nhb.gov.in या संकेतस्थळाचा वापर करण्यात यावा.
  • खते औषधे व इतर साहित्य शेतकरी यांनी स्वत: खरेदी करुन खरेदीच्या पावत्या सादर करणे आवश्यक आहे.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महोगनी वृक्ष लागवडीसाठी किती अनुदान दिले जाते?

महोगनी वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना एकरी अडीच लाख रुपये अनुदान देते. सदरचे अनुदान हे रोजगार हमी योजनेमार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांना दिले जाते.

2. महोगनी वृक्षलागवडीसाठी अर्ज कुठे करावा?

महोगनी वृक्षलागवडीसाठी च्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे लिखित स्वरूपात अर्ज करावा.

3. महोगनीच्या झाडाची लागवड करण्यासाठी अनुदान कुठून मिळत?

महोगनीच्या झाडाची लागवड करण्याकरता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘वृक्ष लागवड अनुदान योजनेतून" अनुदान मिळू शकत.

57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ