पोस्ट विवरण
गवार पिकातील प्रमुख कीड व रोगांचे व्यवस्थापन (Major diseases and their management in Cluster Bean)
गवार पिकातील प्रमुख कीड व रोगांचे व्यवस्थापन (Major diseases and their management in Cluster Bean)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
गवार ही शेंगवर्गीय भाजी असून, महाराष्ट्रामध्ये अंदाजे 8910 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश येथे जनावरांसाठी हिरवा चारा, हिरवळीचे खत म्हणून गवार पिकविली जाते. गवारीच्या पिकापासून निघणाऱ्या डिंकाला मोठी मागणी असल्यामुळे, परकीय चलन मिळवून देणारे पिक म्हणून गवार या पिकाकडे पहिले जाते. गवार हे उष्ण हवामानातील पिक आहे. खरीपातील उष्ण व दमट हवेमुळे तसेच जमिनीचा सामू 7.5 ते 8 च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. या पिकावर भुरी रोग, मर रोग तसेच तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो व हे पिकाचे आतोनात नुकसान करण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण गवार पिकातील प्रमुख कीटक व रोगांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
गवार पिकातील भुरी रोग ओळख (Cluster Beans Powdery Mildew):
- हा रोग लेव्हेलूला टावरीका नावाच्या बुरशीमुळे होतो.
- गवारीवरील बुरशीजन्य रोगांपैकी पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी हा सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.
- लागवडीनंतर साधारणत: 45 दिवसांच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.
भुरी रोग लक्षणे व नुकसान (Symptoms and Damage):
- हा बुरशीजन्य रोग असून पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते.
- या रोगाचा प्रादुर्भाव शेंगा व खोडावरही होतो त्यामुळे, पाने निस्तेज होऊन गळतात.
- शेंगांचा हिरवा रंग बदलून त्या तपकिरी रंगाच्या होतात.
- थंड व दमट हवामान रोगवाढीस पोषक असल्याने हा रोग येतो.
- हवामानानुसार त्याची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दिसून येते.
- रात्रीचे तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत असल्यास आणि 80% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता, जोडीला ढगाळ वातावरण असल्यास असे वातावरण भुरी (Powdery Mildew) रोगाच्या वाढीसाठी पोषक असते.
भुरी रोग नियंत्रणाचा उपाय (Remedy) :
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 500 ग्रॅमची एकरी फवारणी करावी.
- प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) 400 ग्रॅमची एकरी फवारणी करावी.
गवार पिकातील मर रोग ओळख (Cluster Beans Fusarium Wilt) :
- हा बुरशीजन्य रोग (Fungal Disease) असून‘फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम’या बुरशीमुळे होतो.
- या रोगाची लक्षणे साधारणपणे पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी पिकावर दिसून येतात.
मर रोग लक्षणे व नुकसान (Symptoms and Damage) :
- मर रोगाची बुरशी बियाण्यातून अथवा जमिनीतून मुळाद्वारे रोपात प्रवेश करते आणि खोडाच्या आतील भागात वाढते परिणामी जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांचा पानाकडे होणारा पुरवठा बंद होतो.
- सुरवातीला या रोगामुळे कोवळी पाने व फांद्या सुकतात आणि शेवटी पूर्ण झाड वाळून जाते.
- या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमीन आणि बियांद्वारे होतो.
- प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात.
- मर रोगग्रस्त झाड शेवटी पूर्णपणे मरून जाते.
- रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची संख्या कमी होऊन पीक विरळ होते. परिणामी उत्पादनात घट होते.
मर रोगावरील नियंत्रणाचा उपाय (Remedy) :
बीज प्रक्रिया :
- बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळी 5 मिली पीएसबी(प्रतीक:बायो-लाईव्ह), 5 मिली रायझोबियम(ईफको), 5 मिली ट्रायकोडर्माची (ईफको-ट्रिचो) बीज प्रक्रिया करावी त्यासाठी एक लिटर पाण्यात त 125 ग्रॅम गूळ घेऊन तो त्यात वरील तीन घटक एकत्र मिसळून त्यानंतर ते बियाण्याला लावून पेरणी करावी. किंवा धानुका विटावॅक्स पॉवर प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम या प्रमाणात वापरून बीजप्रक्रिया करावी.
फवारणी:
- मेटलॅकिल्स 4%+मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी (सिंजेंटा-रेडोमिल गोल्ड) 400 ग्रॅम प्रति 200 लिटर किंवा
- प्रोपिकोनाझोल 25%ईसी (सिंजेंटा-टिल्ट) 200 मिली प्रति 200 लिटर ड्रेंचिंग करावी.
गवार पिकातील तुडतुड्यांची ओळख (Cluster Beans Leaf Hopper) :
- किडीची 4 ते 5 मि. मी. लांबी, रंग हिरवट करडा असून, आकार पाचरीसारखा असतो.
- डोक्यावर तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात.
- तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.
तुडतुड्यांची लक्षणे व नुकसान (Symptoms and Damage) :
- तुडतुड्यांची पिल्ले आणि प्रौढ शेंगामधून रस शोषतात. त्यामुळे शेंगा गळून पडतात.
- तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे शेंगांवर, पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते.
- प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो.
- तुडतुड्यांमुळे 50 ते 70% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
तुडतुड्यांवरील नियंत्रणाचा उपाय (Remedy) :
इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यू जी (बायर-एडमायर) 12 ग्रॅम एकरी 200 ली पाण्यात मिसळून फवारावे किंवा
थायमेथोक्सम 25% डब्ल्यू जी (देहात-असेर) 80 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारावे.
तुम्ही तुमच्या गवार पिकामधील प्रमुख कीड व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात गवार कुठे पिकते?
गवार पीक प्रामुख्याने भारतातील उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये राजस्थान, हरियाणा, गुजरात, पंजाब तसेच महाराष्ट्रामध्ये देखील घेतले जाते.
2. गवार पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
गवार पिकावर भुरी रोग, मर रोग तसेच तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो व हे पिकाचे आतोनात नुकसान करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
3. गवार पिकाची पेरणी कधी करतात?
गवार पिकाची पेरणी दोन वेळा करता येते. जून-जुलैमध्ये गवार पिकाची पेरणी प्रामुख्याने चारा आणि धान्यासाठी करतात. तसेच काही भागात सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्येही गवार पेरली जाते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ