ऊस पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Diseases in Sugarcane and their Management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक पीक आहे. ऊस हे उष्णकटिबंधीय व बहूवर्षीय पीक आहे. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे हे प्रमुख ऊस उत्पादक जिल्हे आहेत. महाराष्ट्रात ऊस पिकावर विविध प्रकारच्या किडी व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड तसेच पोक्का बोईंग, लालकूज, तांबेरा, ऊसाची चाबूक काणी आणि मर रोग या किडी व रोगांचा समावेश आहे. आजच्या आपल्या या भागात आपण ऊस पिकातील महतवाच्या रोगां विषयीची व त्यांच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
पोक्का बोईंग (Pokka Boeing) :
- पोक्का बोईंग हा रोग हवेद्वारे पसरतो.
- मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
- पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
- या रोगाची लागण सुरुवातील शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसून येते.
- पानाच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट, हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात.
- रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते.
- खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत.
- या रोगाची तीव्रता आढळल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.
ऊस पिकातील पोक्का बोईंग रोग नियंत्रण:
- निरोगी बियाण्याची लागवड करावी.
- शेंडा कूज झालेले ऊस काढून नष्ट करावेत.
- खालील कोणत्याही एका रासायनिक बुरशीनाशकाच्या प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आलटून पालटून 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
- कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 8 ग्रॅम
- कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्लूपी (क्रिस्टल-ब्लू कॉपर)- 12 ग्रॅम
- मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी (देहात DEM 45)- 18 ग्रॅम
लाल कुज (Red Rot) :
- लाल कुज हा रोग मातीमध्ये असलेल्या कॉलिटॉट्रिकम फॅलकॅटम या बुरशीमुळे होतो.
- या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऊसावर आणि पानांवर दिसून येतो.
- लागण झालेल्या पानांचा रंग बदलतो.
- हिरवा ते नारिंगीनंतर नारिंगी ते पिवळा असा होतो.
- लाल रंगाचे ठिपके पानाच्या मध्य शिरेवर दिसतात.
- पाने खालून वर सुकत जातात. नंतर रोगग्रस्त ऊस फिकट रंगाचा आणि पोकळ होतो.
- लागण झालेल्या ऊसाचे मध्येच विभाजन केल्यास त्यातून आबंट वास येतो व अंतर्गत भाग लाल झालेला दिसतो.
- कधी-कधी आतल्या भागात काळ्या तपकिरी रंगाचा द्रव दिसून येतो.
ऊस पिकातील लाल कुज रोग नियंत्रण :
- लागवडीपुर्वी बेणे 1 टक्का बोर्डोमिश्रणच्या द्रावणात बुडवावेत.
- रोग आढळून आल्यास पाने व ऊस गोळा करून जाळून नष्ट करावेत.
- बियाणे कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (क्रिस्टल-बाविस्टीन) च्या द्रावणात 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी 15 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर त्याची लागवड करावी.
- कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्ट-बाविस्टिन) - 8 ग्रॅम किंवा
- मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी (देहात DEM 45)- 18 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करा.
तांबेरा (Rust) :
- तांबेरा या रोगाचे बिजाणू हवेद्वारे पसरतात.
- पानाच्या दोन्ही बाजूस लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके आकाराने मोठे होऊन त्यांचा रंग तपकिरी ते नारिंगी-तपकिरी किंवा लाल- तपकिरी होतो.
- पूर्ण पान तांबेरायुक्त होते.
- ऊस पिकातील तांबेरा रोग नियंत्रण :
- लागवड फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये करू नये.
- रोगमुक्त बियाणे निवडावे.
- रोगप्रतिकारक्षम जातींची लागवड करावी.
ऊस पिकातील तांबेरा रोग नियंत्रण :
- बियाणे कार्बेन्डाझिम द्रावणात (100 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 100 लिटर पाणी) दहा मिनिटे बुडवावे. त्यानंतर लागवड करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात-DEM 45) 10-15 दिवसाच्या अंतराने 2-3 वेळा फवारावे.
- खालील कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. चांगल्या रिझल्टसाठी प्रति पंप 5 मिली IFC स्टिकर मिसळावे.
- कार्बेन्डाजिम 12 %+मैनकोजेब 63 % डब्ल्यूपी (युपीएल-साफ) 12 ग्रॅम
- हेक्साकोनाजोल 5% एससी (टाटा रैलिस-कॉन्टाफ प्लस) - 0.4 मिली
ऊसाची चाबूक काणी :
- ऊसाची चाबूक काणी हा रोग ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो.
- ऊसाच्या शेंड्यापासून 25-250 सेंमी. लांबीची चंदेरी आवरण असणारा काळ्या पावडरने भरलेला चाबुकासारखा लांब पट्टा बाहेर पडतो. म्हणून या रोगाला चाबूक काणी म्हणतात.
- सदर लागण झालेला ऊस निरोगी ऊसापेक्षा लहान दिसतो.
- बाजूच्या बेटामधून भरपूर अंकुर फुटतो त्यातून निघालेली पाने सरळ आखूड असतात.
- हा रोग बेण्याद्वारे आणि रोगट खोडव्यापासून पसरतो.
- लागवडीच्या ऊसापेक्षा खोडव्यामध्ये काणीरोगाचे प्रमाण जास्त आढळते.
नियंत्रण :
- निरोगी व रोगप्रतिकारक वाणांचा वापर करावा तसेच उष्ण जलप्रकिया केलेले बेणे वापरावे.
- वारंवार खोडवा पीक घेवू नये.
- चंदेरी आवरण फाटण्यापूर्वी काणी रोगाचे पट्टे जाड कापडाच्या पिशवीत भरून उकळत्या पाण्यात एका तासासाठी बुडवून ठेवावे जेणेकरून रोगाचे बीजकण मरून जातील.
- बियाणे 0.1% कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्ट-बाविस्टिन)च्या द्रावणात (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम बावीस्टीन) 10 मिनिटे बुडवून ठेवावे.
मर रोग (Wilt) :
- मर रोगाची लक्षणे ऊसाची निम्मी वाढ होईपर्यंत दिसत नाहीत.
- प्रथम पाने पिवळी पडतात व ऊस शेंड्यापासून वाळण्यास सुरुवात होते.
- ऊसाच्या आत पोकळी बनते, असा ऊस वजनाला हलका भरतो.
- लागण झालेल्या ऊसाची मुळे कुजतात आणि ऊस अलगदपणे उपटून येतो.
- शेवटी संपूर्ण ऊस वाळतो आणि मरतो.
- रोगग्रस्त ऊसातील आतला भाग हलक्या ते गडद जांभळ्या किंवा तपकिरी रंगाचा बनलेला असतो.
नियंत्रण:
- निरोगी बेणे लागवडीसाठी निवडावे.
- शेतात स्वछता ठेवावी.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेणे 0.1% बाविस्टीन (क्रिस्टल)च्या द्रावणात (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम बावीस्टीन) 10 मिनिटे बुडवून ठेवून नंतर लागवड करावी.
तुम्ही तुमच्या ऊस पिकामधील रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात ऊस पिकाची लागवड कुठे होते?
ऊसाचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे येथे घेतले जाते.
2. ऊस पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
ऊस पिकावर प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड तसेच पोक्का बोईंग, लालकूज, तांबेरा, ऊसाची चाबूक काणी आणि मर रोग यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.
3. ऊसाची चाबूक काणी रोग कोणता?
ऊसाच्या शेंड्यापासून 25-250 सेंमी. लांबीची चंदेरी आवरण असणारा काळ्या पावडरने भरलेला चाबुकासारखा लांब पट्टा बाहेर पडतो या रोगाला चाबूक काणी रोग असे म्हणतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
