पोस्ट विवरण
केळी पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Major diseases of banana crop and their management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
जगभरात केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळीच्या उत्पादनापैकी सुमारे 50 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रातील एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हयांत आहे म्हणूनच महाराष्ट्रातील जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. याच केळी पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असून हा लागवडीपासून ते घड काढणीपर्यंत दिसून येतो. म्हणूनच आजच्या या भागात आपण केळी पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
पनामा किंवा मर रोग:
रॅल्स्टोनिया सोलॅनेसेरम जीवाणूमुळे मातीतून होणारा रोग म्हणजे पिकांमधील मर रोग. फळवर्गीय कुटुंबातील बहुतेक प्रजातींसह विस्तृत श्रेणीवर या रोगाचा परिणाम होतो. या रोगामुळे पनामा केळीचा संपूर्ण पणे नाश होतो त्यामुळे, त्याला मर (रोग पनामा) रोग म्हणतात. आम्लयुक्त जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. हा रोग जमिनीतील कवकांमुळे होतो. केळीच्या पिलांना तसेच मोठ्या खुंटांना हा रोग झाल्यामुळे ती मरतात. ग्रोमिशेल ही जात या रोगास जास्त बळी पडते.
लक्षणे (Symptoms) :
- प्रथम खुंटावरील साल पिवळी पडून सुकते.
- नंतर केळीची पाने डेरे पिवळी होऊन सुकतात.
- खुंटाभोवती पाने लोंबतात व नुसते खोड उभे राहते.
- मुख्य खोड सुकून त्याचा पानांपर्यंतचा भाग चिरलेला दिसतो.
- रोगट खुंट फळधारणेपूर्वीच मरते. परंतु केळी निसवल्यानंतर हा रोग पडल्यास केळीची वाढ सारखी होत नसून ती अवेळी पिकतात.
- रोगट खुंटाच्या खालच्या गड्ड्यात काळ्या रेषा दिसतात.
- रोगकारक बुरशी मुळांवरील अन्नवाहिन्यांमध्ये वाढते. परिणामी, अन्नरसाचा वरचा मार्ग खुंटतो.
- अशा खुंटाच्या गड्ड्या लगतच्या पिलांच्या कांद्यातही रोगकारक कवकाच्या स्वरूपात जाऊन तेथे रोगाचा उपद्रव होतो.
मर रोगावरील नियंत्रणाचा उपाय (Remedy) :
बीज प्रक्रिया :
बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळी 5 मिली पीएसबी(प्रतीक:बायो-लाईव्ह), 5 मिली रायझोबियम(ईफको), 5 मिली ट्रायकोडर्माची (ईफको-ट्रिचो) बीज प्रक्रिया करावी त्यासाठी एक लिटर पाण्यात त 125 ग्रॅम गूळ घेऊन तो त्यात वरील तीन घटक एकत्र मिसळून त्यानंतर ते बियाण्याला लावून पेरणी करावी. किंवा धानुका विटावॅक्स पॉवर प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम या प्रमाणात वापरून बीजप्रक्रिया करावी.
उपाय (Remedy):
- मेटलॅकिल्स 4%+मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी (सिंजेंटा - रेडोमिल गोल्ड) 600 ग्रॅम प्रति 300 लिटर/एकर किंवा
- प्रोपिकोनाझोल 25%ईसी (सिंजेंटा - टिल्ट) 300 मिली प्रति 300 लिटर/एकर पाणी प्रमाणात ड्रेंचिंग करावी.
पर्णगुच्छ (बोकड्या) :
गेल्या काही वर्षांपासून या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून, शेकडो एकरांवरील केळीच्या बागा नाश पावल्या आहेत.
लक्षणे (Symptoms) :
- प्रथम पानाच्या खालील बाजूवर, मुख्य शिरेवर, देठावर व बारीक शिरेवर अतिशय लहान, अनियमित लांबीचे, गडद हिरव्या रंगाचे लांबट चट्टे दिसतात.
- रोग ग्रस्त पाने लहान राहतात.
- या पानांच्या कडांमधील हरितद्रव्यांचा नाश झालेला आढळून येतो. त्याच्या कडा नागमोडी होऊन पिवळ्या पडतात.
- पाने ठिसूळ होऊन त्वरित सडतात व वाळतात.
- पानांचा देठ वाजवीपेक्षा जास्त लांबीचा राहतो. अशा प्रकारच्या पानांमुळे झाडाची वाढ खुंटते.
- या रोगाचे अखेरच्या अवस्थेतील लक्षण म्हणजे पानांची लांबी व रुंदी कमी होते.
- पाने तलवारीच्या पात्यासारखी दिसतात.
- ती ताठ व सरळ उभी राहतात. अशा पानांचा झुबका शेंड्यावर तयार झालेला दिसतो. म्हणूनच या रोगास बंची टॉप असे म्हणतात.
- यापैकी कोवळ्या पानांमधून सूर्यप्रकाशाकडे पाहिले असता पानांवर गर्द हिरव्या किंवा काळसर रंगाच्या तुटक रेषा स्पष्टपणे दिसतात.
- रोगट झाडातून सहसा घड बाहेर पडत नाही. पडल्यास केळी लहान आकाराची येतात.
उपाय (Remedy):
- फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% डब्ल्यूजी (देहात - demfip) @5 ग्रॅम/पंप आणि अॅसेटामिप्रीड 20% एसपी (टाटा - मानिक) @10 ग्रॅम/पंप आलटून पालटून 7 दिवसांच्या अंतराने फवारा किंवा
- एसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी (यूपीएल - लान्सरगोल्ड) 400 ग्रॅम एकरी फवारा.
केळीचा पोंगासड रोग (हार्ट रॉट):
झाडाचे मुख्य पान सडणे, पोंगा मर होणे आणि पानांवर पिवळे चट्टे दिसणे असे या रोगाचे बाह्यस्वरूप असते.
लक्षणे (Symptoms) :
- गाभ्याचा भाग वरून खालपर्यंत कुजलेला आढळतो.
- कुजण्याची अथवा सडण्याची क्रिया वरच्या भागापासून सुरू होत असून ती गड्ड्यापर्यंत पोहोचून झाडांचा नाश करते.
- रोगट झाडे सडल्यानंतर त्यांचा उग्र वास येतो.
- सडण्याची क्रिया फक्त हिवाळ्यात दिसून येते.
- उन्हाळ्यात मात्र सडण्याची क्रिया आढळून येत नसून फक्त पानांवरच पिवळे चट्टे दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात रोगट झाडे चटकन लक्षात येत नाहीत.
- या रोगाची लक्षणे प्रथम कोवळ्या पानांवर दिसून येतात.
- साधारणतः अर्धा इंच रुंदीचे पांढरट अथवा पिवळ्या रंगाचे पट्टे पानांवर आढळतात.
- हे पट्टे पानांच्या कडांपासून वाढत जातात.
- पानांच्या वाढीबरोबरच या पट्ट्यांचा रंग तांबूस होत जातो.
- पानांच्या कडा आतल्या बाजूने गुंडाळल्या जातात.
- सर्वसाधारणपणे झाडाच्या मधल्या कोवळ्या पानांवर ही लक्षणे स्पष्ट दिसतात.
उपाय (Remedy):
- लागवडीपूर्वी उन्हाळी खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
- लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत.
- कंद लागवडीपूर्वी,
- कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 30 मिनिटे बुडवावीत किंवा
- अझोक्सीस्ट्रोबिन 23% एससी (Amistar - Syngenta) 300 मिली 300 लिटर पाण्यातून फवारावे किंवा हेक्साकोनाझोल 5% एससी (हेक्साधन प्लस - धानुका) ची रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर प्रथम फवारणी करावी
- 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.
- चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रतिझाड वापरावे.
- लागवडीच्या वेळी जमिनीत प्रतिझाड ब्लिचिंग भुकटी 6 ग्रॅम द्यावी. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हीच प्रक्रिया करावी.
फळावरील काळी बोंडी रोग (सिगार अँड रॉट):
- या रोगास इंग्रजीत जळका चिरूट असे म्हणतात.
- या रोगाची लागण ट्रॅकिस्पेरा फुक्टिजीना आणि व्हर्टीसिलियम थिओब्रोमी या बुरशीमुळे होतो.
- हा रोग फक्त घडांवरील केळांवरच आढळतो.
लक्षणे (Symptoms) :
- केळीच्या घडामधील काही फळांची खालची टोके काळी पडतात व कुजू लागतात.
- ही कुजण्याची क्रिया हळूहळू वाढत जाऊन कुजलेला भाग वाळू लागतो.
- केळीच्या खालच्या टोकाकडून 35 सें.मी. पर्यंतच्या भागावर शुष्क कूज दिसून येते.
- कुजलेल्या भागावर आडव्या, गोलाकार रेषा वलयाप्रमाणे पडलेल्या आढळतात. त्यामुळे केळे अर्धवट पिकलेल्या चिरुटाप्रमाणे दिसते.
- या वाळलेल्या टोकावर रोगकारक कवकाच्या बिजाणूंमुळे करड्या रंगाच्या राखेसारखा थर आढळतो.
- रोगट फळांचा हिरवा भागही लवकरच लिबलिबीत होऊन कुटल्यामुळे आतील गर उघडा पडून तो गळतो. अशा स्थितीनंतर केळी काळी पडून वाळतात. अशा फळांना बाजारपेठेत काहीच किंमत येत नाही.
उपाय (Remedy):
- घड निसवल्यावर घडावर कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (ईफको - यामाटो) 10 ग्रॅम किंवा मँकोझेब 75% डब्ल्यू पी (देहात - DeM 45) 25 ग्रॅम अधिक चांगल्या प्रतीचे स्टीकर 10 ली. पाण्यात मिसळून फवारावे किंवा
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) - 300 मिली/एकर किंवा
- अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) - 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.
पानांवरील करपा (लीफ स्पॉट):
- इंग्रजीत करपा हा रोग सिगाटोका अथवा लीफ स्पॉट या नावाने ओळखतात.
- केळी पिकावर पडणाऱ्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट आढळून येते.
- ज्या - ज्या ठिकाणी या रोगाची बाधा झालेली आढळून येते त्या - त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होते.
- या रोगामुळे नुकसान तर होतेच, शिवाय पिकांच्या भांडवली खर्चासही धक्का बसतो.
- लागवडीसाठी वापरात असलेल्या जवळपास सर्व जाती (त्यातल्या त्यात कॅव्हेंडिश समूहातल्या जाती) या रोगास बळी पडतात.
- सिगाटोका हा रोग बुरशीजन्य आहे.
- या बुरशीच्या लैंगिक व अलैंगिक अशा दोन अवस्था आहेत.
- यापैकी अलैंगिक अवस्थेचे शास्त्रीय नाव सरस्कोस्पोरा म्युसी असून लैंगिक अवस्थेत नाव मायको स्पोरेला म्युसिकोला असे आहे.
ही बुरशी दोन प्रकारे बीजाणू तयार करते व हे दोन्ही प्रकारचे बीजाणू रोग प्रादुर्भावासाठी कारणीभूत असतात.
लैंगिक अवस्थेतील बीजाणूंना अस्कोस्पोअर्स असे, तर अलैंगिक अवस्थेतल्या बिजाणूंना कोनिडिया असे म्हणतात.
या रोगाच्या प्रमुख दोन जाती आहेत.
1) काळा सिगाटोका : हा रोग मायको स्पेरिला फिजेनसिस या बुरशीमुळे होतो.
2) पिवळा सिगाटोका : हा रोग मायको स्पेरिला म्युसिकोला या बुरशीमुळे होतो.
लक्षणे (Symptoms) :
- या रोगाची लक्षणे मुख्यतः पानांवरच दिसतात.
- पानांवर प्रथम फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.
- हे ठिपके वाढत जाऊन लांबट पिवळ्या रेषा एकमेकांत मिसळून मोठ्या आकाराचे राखट रंगाचे ठिपके तयार होतात.
- अशा प्रकारचे ठिपके पानांच्या सर्व भागांवर पसरले जाऊन सबंध पान वाळलेले दिसते.
- या रोगाची लक्षणे जमिनी लगतच्या जुन्या 3 ते 4 पानांवर जास्त दिसते व त्यामानाने वरची पाने निरोगी दिसतात.
- पाने अकाली पिवळी पडून देठाशी मुडून लटकलेली दिसतात.
- झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होऊन अन्न तयार करण्याच्या कामात बाधा येऊन झाडाची वाढ खुंटते. परंतु झाड मरत नाही.
उपाय (Remedy):
- शिफारशीत अंतरावरच लागवड करावी.
- बागेत पाणी साठू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा करावा.
- पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
- बाग व भोवतालचा परिसर तणमुक्त ठेवावा.
- बागेतील पिले व पत्ती वेळच्या वेळी कापून त्याची बागेबाहेर योग्य विल्हेवाट लावावी.
- बागेस शिफारशीप्रमाणेच खत मात्रा द्याव्यात.
- पानाचा रोगग्रस्त भाग अथवा संपूर्ण पान कापून नष्ट करावे.
- कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
- रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 600 ग्रॅम प्रति एकर 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अँथ्रकनोज नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 450 मिलीची 300 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते किंवा
- मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (नागार्जुन - इंडेक्स) 100 -150 ग्रॅम/एकरी फवारणी करावी.
मोझॅक किंवा हरितलोप रोग (क्लोरोसिस):
या रोगाची रोगट लागण झाल्यास पानावर हरितद्रव्य दिसत नाही व पिवळसर पट्टे सर्वत्र विखुरलेले दिसतात.
लक्षणे (Symptoms) :
- मोझॅक रोग ग्रस्त झाडांची वाढ खुंटते.
- ही झाडे पूर्णपणे वाढत नाहीत.
- वाढल्यास त्यांना क्वचित प्रमाणात घड लागतात.
- वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये केळीच्या झाडाला या रोगाची बाधा होते.
- या रोगाची लागण एका झाडापासून दुसऱ्या झाडाला व बागेत घेतलेल्या आंतरपिकातही होते.
उपाय (Remedy):
- या रोगाच्या लक्षणांकरीता तसेच माव्यांच्या उपस्थितीकरीता शेताचे नियमित निरीक्षण करा.
- यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट केल्यास विषाणूंना टाळण्यात मदत होईल.
- आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
- मित्र किड्यांना नुकसान होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर सीमित ठेवा.
- मुंग्यांच्या संख्येचे चिकट पट्ट्या लाऊन नियंत्रण करा.
- जमिनीवर प्लास्टिक अच्छादन वापरून माव्यांना पळवुन लावुन रोगामुळे होणारे नुकसान कमी करा.
- प्रत्येक ओळीत पडदे बांधल्यास माव्यांचा प्रतिबंध होईल.
- थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 150 ग्रॅम 300 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी किंवा
- फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली प्रति एकर किंवा
- जिओलाइफ नो व्हायरस 400 मिली प्रति एकर किंवा
- फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 150 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात 300 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुम्ही तुमच्या केळी पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते?
महाराष्ट्रातील जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते.
2. मर रोगाचे केळी पिकावर काय परिणाम दिसून येतात?
मर रोगामुळे पनामा केळीचा संपूर्ण पणे नाश होतो त्यामुळे, त्याला मर (रोग पनामा) रोग म्हणतात. आम्लयुक्त जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. हा रोग जमिनीतील कवकांमुळे होतो. केळीच्या पिलांना तसेच मोठ्या खुंटांना हा रोग झाल्यामुळे ती मरतात.
3. पानांवरील करपा (लीफ स्पॉट) रोगाच्या प्रमुख जाती कोणत्या?
काळा सिगाटोका व पिवळा सिगाटोका या पानांवरील करपा (लीफ स्पॉट) रोगाच्या प्रमुख जाती आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ