पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
ज्वार
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
4 June
Follow

ज्वारी पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Major diseases of Sorghum crop and their management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे उत्पादन व क्षेत्रही चांगले आहे. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे अशा ठिकाणी ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. ज्वारी हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील 10 लाख हेक्टर क्षेत्रावरील दख्खन पठारात कोरड्या जमिनिवर घेतले जाणारे एक महत्वपूर्ण पीक आहे. खरीप व रब्बी हंगामातील ज्वारीचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी किडींचा/रोगाचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्वारी पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होते. या पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण ज्वारी पिकातील प्रमुख रोगांविषयी तसेच व्यवस्थापन पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत.

रोगांची ओळख (Major diseases of Sorghum) :

ज्वारीच्या दाण्यावरील बुरशी (ग्रेन मोल्ड) :

ज्वारीच्या दाण्यावरील बुरशी रोगाची लक्षणे :

 • या रोगात बुरशी संक्रमणामुळे दाणे पांढरट किंवा गुलाबी होतात.
 • रोगाला कारणीभूत बुरशीमुळे ज्वारीला काळा रंग येतो.

ज्वारीच्या दाण्यावरील बुरशी रोगामुळे होणारे नुकसान :

 • ज्वारी फुलोरा अवस्थेत अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना सतत पाऊस असल्यास खरीप हंगामात दाण्यांवरील बुरशी रोगाचा प्रादुर्भाव उद्भवतो. यामुळे ज्वारीच्या दाण्यांचा रंग बदलतो (पांढरा व करडा रंग).
 • तसेच जास्त प्रमाणात संसर्ग झाल्यास दाणे काळे पडतात.
 • दाण्यांचे वजन घटते.
 • दाण्यांचा आकार लहान होतो.
 • उत्पन्नात 100 टक्‍क्‍यांपर्यंत घट होऊ शकते. तसेच दाण्याची उगवणशक्ती कमी होते.
 • बुरशी रोगाची लागण झालेली ज्वारी खाल्ल्यास जनावरांना विषबाधा होते.

ज्वारीच्या दाण्यावरील बुरशी रोगाचे नियंत्रण :

 • हमखास पाऊस येण्याच्या काळात परिपक्व होणारे ज्वारीचे वाण पेरणीसाठी वापरू नये.
 • पिक पावसात सापडून नुकसान होऊ नये म्हणून शारीरिक दृष्ट्या पक्वतेच्या 12-15 दिवसात कापणी करावी.
 • पिकाची फुलोरा अवस्था सुरू असताना कॅप्टन 50% डबल्युपी (Arysta - Captan) किंवा मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
 • गरजेनुसार दहा दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी करावी.

ज्वारीवरील काणी रोग :

 • हा रोग बुरशीमुळे होतो.
 • या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होतो.

ज्वारीवरील काणी रोगाची लक्षणेः

 • कणसातील दाण्यांचे रूपांतर काणीच्या बिजांडा मध्ये होते.
 • दाणे काणी व मोकळ्या काणीचा प्रादुर्भाव मुख्यत महाराष्ट्रात आढळून येतो.
 • हे काणीयुक्त पांढरे दाणे टोकास निमुळते असून फोडले असता त्यातून काळी भुकटी पडते व हे बिजाणू बियांवर चिकटून शेतात पोहचतात.
 • घरगुती बियाणे वापरल्यास, या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो.

ज्वारीवरील काणी रोगाचे नियंत्रणः

 • पेरणीपूर्वी ज्वारीच्या प्रती किलो बियांण्यास कार्बॉक्सिन 37.5% डबल्यु एस, थायरम 37.5% डबल्यु एस (धानुका - विटावॅक्स) 3 ग्रॅम चोळावे.
 • शेतातील काणी झालेली कणसे नष्ट करावीत.
 • रोगमुक्त बियाणे वापरावे.

ज्वारीच्या कणसावरील चिकटा :

ज्वारीच्या कणसावरील चिकटा रोगाची लक्षणे :

 • कणसाच्या फुलाच्या गुच्छातून मधासारखा चिकट द्रव्य स्रवून संपूर्ण कणीस काळे पडते.
 • चिकट द्रवामध्ये या रोगाची असंख्य बिजे असतात.
 • या रोगास साखऱ्या असेही म्हणतात.
 • परागीकरण न केलेले मादी वाण संपूर्णपणे या रोगास बळी पडून दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.

ज्वारीच्या कणसावरील चिकटा रोगाचे नियंत्रण :

 • या रोगाच्या नियंत्रणासाठी बांधावरील दुय्यम पोशिंदया वनस्पती (उदा. बहुवार्षिक गवत) नष्ट कराव्यात.
 • रोगाचा प्रसार बियाण्या मार्फत होतो.
 • रोगग्रस्त शेतीतील बी वापरण्यापूर्वी तीस टक्के मिठाच्या द्रावणातून काढावे. (10 लिटर पाणी अधिक 3 किलो मीठ)
 • पाण्यावर तरंगणारे हलके व पोचट, बियाणे काढून टाकावे.
 • नंतर बियाणे स्वच्छ पाण्यात धुऊन, वाळवून पेरणीसाठी वापरावे किंवा बियाण्यास थायरम ( 75% ) या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

ज्वारीच्या कणसावरील चिकटा रोगाचे रासायनिक नियंत्रण :

 • ज्वारी 50 टक्के फुलोरा अवस्थेत आल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने थायरम 75% डबल्यु एस (Chemet-Seedcap) दोन ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे पुढील फवारणी गरजेनुसार करावी.
 • तसेच रस शोषक किटकांच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली प्रति एकर किंवा
 • जिओलाइफ नो व्हायरस 400 मिली प्रति एकर किंवा
 • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 100 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ज्वारीवरील खडखड्या रोग :

 • हा रोग बुरशीमुळे होतो.
 • हलक्या जमिनीवरील कोरडवाहू रब्बी ज्वारीचे पीक या रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडते.
 • या रोगाची लागण पीक फुलोरा अवस्थेत असताना किंवा त्यानंतरच्या काळात ताटाच्या जमिनी लगतच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या कांड्याला होते.
 • रोगग्रस्त कांडे आतून पोकळ होतात.

ज्वारीवरील खडखड्या रोगाची लक्षणे :

 • रोगग्रस्त कांड्यांचा उभा छेद घेतला असता मध्ये फक्त काळे धागे आढळून येतात.
 • रोगग्रस्त झाडे वाऱ्यासोबत हलताना खडखड असा आवाज करतात. म्हणून या रोगास खडखड्या रोग असे म्हणतात.
 • रोगग्रस्त झाडांच्या कणसात दाणे बरोबर भरत नाहीत.
 • रोगग्रस्त झाडे जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यास धोका संभवतो.
 • या रोगामुळे धान्य उत्पादनात घट तर होतेच त्याच बरोबर कडब्याची प्रत सुद्धा खराब होते.

ज्वारीवरील खडखड्या रोगाचे नियंत्रण:

 • पिकाची फेरपालट करावी.
 • हलक्या जमिनीवर जिरायती रब्बी ज्वारी पेरणी करताना खडखड्या रोगास प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.
 • पीक फुलोरा अवस्थेत असताना शक्यतो पाण्याची एक पाळी द्यावी.
 • खताची योग्य मात्रा दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
 • हमखास खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव होणाऱ्या भागात स्युडोमोना सक्लोरोरॅफिसया जीवाणूजन्य घटकाची बीज प्रक्रिया करावी.

ज्वारीवरील तांबेरा रोग:

 • प्रथमतः चमकणारा जांभळट तांबड्या रंगाचा ठिपका दिसतो.
 • तीव्रता वाढल्यावर पानाचा मोठा भाग व्यापला जातो.
 • तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या पानामध्ये पानाच्या खालच्या बाजूवर लहान पुटकुळ्या येतात. त्यामुळे संपूर्ण पानाच्या उती नष्ट होऊन पूर्ण पान नष्ट होऊ शकते.

ज्वारीवरील तांबेरा रोगाचे नियंत्रण :

 • बुरशी रहित बियाणे वापरावे.
 • पिकाची फेरपालट करावी.
 • पूर्वी या रोगाला बळी पडलेल्या वाणांचे अवशेष नष्ट करावे.
 • पेरणीनंतर एक महिन्याने दहा दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
 • तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
 • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

 • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
 • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
 • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
 • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
 • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
 • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
 • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
 • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
 • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
 • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
 • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या ज्वारी पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

 1. ज्वारी पिकासाठी योग्य हंगाम कोणता?

ज्वारी हे पीक तसे तीन हंगामात घेतले जाते. पण रब्बी हंगामातील हे मुख्य पीक असून, हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. तर पावसाळी हंगामातील जातींची जून-जुलैमध्ये पेरणी करतात.

 1. ज्वारी पिकात कोणते रोग आढळून येतात?

ज्वारी पिकात दाण्यावरील बुरशी (ग्रेन मोल्ड), काणी, कणसावरील चिकटा, खडखड्या रोग व तांबेरा रोग असे मुख्य रोग आढळून येतात.

 1. ज्वारी पिकाला खडखड्या रोगाची लागण कधी होते?

ज्वारी पिकाला खडखड्या या रोगाची लागण पीक फुलोरा अवस्थेत असताना किंवा त्यानंतरच्या काळात ताटाच्या जमिनी लगतच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या कांड्याला होते.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ