पोस्ट विवरण
सुने
तरबूज
कीट
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
13 Mar
Follow

कलिंगडाच्या प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Insects and their management in Watermelon)

कलिंगडाच्या प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Insects and their management in Watermelon)


कलिंगडाच्या प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Insects and their management in Watermelon)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. कलिंगडाचे पीक हे उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि जळगाव अशा ठिकाणी केली जाते. महाराष्ट्रात कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन हे जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत घेतले जाते. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास कलिंगडाच्या पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. कलिंगड हे पिक कीड व रोगास फारच संवेदनशील आहे. किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण कलिंगडाच्या पिकातील प्रमुख किडींविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

मावा कीटक (Aphid) :

मावा कीटकाची ओळख:

 • मिरचीच्या पिकातील मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
 • मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.

मावा कीटकाची लक्षणे (Symptoms):

 • हे कीटक मिरचीची कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
 • त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
 • ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोधते.
 • मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.

उपाय (Remedy):

 • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
 • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

फळमाशी (Fruit Fly) :

फळमाशीची ओळख:

 • फळमाशी रंगाने पिवळसर तांबूस असते.
 • फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
 • फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.

फळमाशीची लक्षणे (Symptoms):

 • फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
 • त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात.
 • या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात.
 • या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.

उपाय (Remedy):

 • शेतात कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
 • फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक)100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • फ्लुबेंडियामाइड 20% डब्ल्यूजी (टाटा-ताकुमी) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

फुलकिडे (Thrips) :

फुलकिड्यांची ओळख:

 • फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात.
 • फुलकिड्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.

फुलकिड्यांची लक्षणे (Symptoms):

 • फुलकिडे पानातील रस शोषून घेतात व पानांचे नुकसान करतात.
 • कीड नवीन पाने आणि खोड या भागांना नुकसान करते.
 • पाने गुंडाळलेली दिसतात आणि नंतर फिकट पिवळी होऊन हळूहळू सुकून जातात.
 • तीव्र प्रादुर्भावामुळे नवीन पाने कोरडी होऊन पडतात.

उपाय (Remedy):

 • या कीडीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावी.
 • नीम तेल (अझेडरेक्टिन) @30 मिली
 • बायो आर 303 (वनस्पती अर्क) @30 मिली
 • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. किंवा
 • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) @100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

पांढरी माशी (White fly) :

पांढऱ्या माशीची ओळख :

 • पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
 • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
 • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
 • कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
 • पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms):

 • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
 • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
 • झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
 • या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

उपाय (Remedy):

 • प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
 • इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 15 ग्रॅम प्रति एकर किंवा
 • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
 • याशिवाय पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ऍसिटामिप्रिड 20% एसपी (टाटा-माणिक) 100 ग्रॅम प्रति एकर किंवा
 • डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यू पी (सिजेंटा-पेगासस) 200 ग्रॅमची प्रति एकर फवारणी करावी.

नाग अळी (Leaf Miner) :

नाग अळीची ओळख:

 • कोणत्याही पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
 • या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते.

नाग अळीची लक्षणे (Symptoms):

 • नाग अळीचा प्रादुर्भाव रोपे लहान असताना दमट हवामानात कोवळ्या पानांवर होतो.
 • ही अळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोड्या, पिवळट, जाड रेषा दिसतात.
 • पाने पिवळी पडून गळतात.

उपाय (Remedy):

 • क्विनालफॉस 25% ईसी (सिजेंटा-एकालक्स) 400 मिलि 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
 • कार्टॅप हायड्रोक्लोराइड 75% एसजी (धानुका-मोर्टार) 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

एकात्मिक कीड व्यवस्थापन (Watermelon pest control) :

 • मागील पिकांचे अवशेष नष्ट करावेत.
 • पिकांची फेरपालट करावी.
 • पीक नेहमी तणमुक्त ठेवावे.
 • रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.
 • कलिंगड लागवडी नंतर लगेच 5 ते 6 दिवसानंतर एकरी 13 पिवळे व 12 निळे चिकट सापळे लावावेत.
 • तसेच एकरी 4 ते 5 कामगंध सापळे देखील लावावेत.
 • पिकांवरील नुकसानीची लक्षणे लक्षात घेऊन कोणती कीड आहे याची खात्री तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्यावी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाचे उपाय योजावेत.

कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणीच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी:

 • फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
 • फवारणीसाठी वापरण्यात येणारे पाणी हे 6.5 ते 7.5 पीएच चे असावे.
 • फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा आहे याची खात्री करून घ्यावी.
 • फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
 • फवारणी मिश्रणामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नयेत.

तुम्ही तुमच्या कलिंगड पिकामधील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन कुठे घेतले जाते?

महाराष्ट्रात जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

2. कलिंगड पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?

कलिंगड पिकावर प्रामुख्याने मोझॅक व्हायरस, भुरी रोग, करपा, केवडा रोग, मर रोग तसेच मावा, फळमाशी, फुलकिडे, पांढरीमाशी आणि नाग अळी यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.

3. कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या?

कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत, लागवडीचे अंतर, बियाणे, खत, पाणी आणि कीड-रोग नियोजन या महत्वाच्या गोष्टी आहेत.

53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ