पोस्ट विवरण
उन्हाळी सोयाबीन मधील प्रमुख किडी आणि रोगांचे व्यवस्थापन (Major pests and diseases in Soybean and their Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
सोयाबीन हे पीक महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे पिक असुन, खरिप हंगामामध्ये फुलोरा व काढणी काळात पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याची कमी भरून काढण्यासाठी शेतकरी उन्हाळी सोयाबीनची पेरणी करतात. उन्हाळी सोयाबीनमध्ये कीड व रोगांच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक स्वरूपातच जर नियंत्रण केले तर पुढील फवारणीसाठीचा खर्च कमी होऊन पिकाचे नुकसान कमी होते. त्यामुळे आपल्याला महत्वाच्या किडी रोग व त्यांच्या अवस्था माहित असल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करणे सोपे जाते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण उन्हाळी सोयाबीन मधील प्रमुख किडी आणि रोगांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
उन्हाळयात सोयाबीन पिकावर पाने गुंडाळणारी अळी, खोडमाशी, चक्री भुंगा, पांढरी माशी हे कीटक तर, पानांवरील ठिपके, तांबेरा रोग प्रामुख्याने आढळून येतात. हे रोग व कीटक पिकाचे आतोनात नुकसान करतात आणि यामुळे उत्पादनात घट येते म्हणूनच यांचे वेळीच नियंत्रण करणे महत्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊया या कीटक व रोगांविषयी:
सोयाबीन मधील प्रमुख कीटक (Soybean Insects):
पाने गुंडाळणारी अळी (Leaf Roller):
पाने गुंडाळणाऱ्या अळीची ओळख:
- पतंग लहान व करड्या रंगाचे असतात.
- त्यांच्या पुढील पंखावर टोकाकडील मागच्या किनाऱ्यावर पांढरा ठिपका असतो.
- मागील पंख दातेरी असतात.
पाने गुंडाळणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms):
- अळी पाने गुंडाळते व आत राहून पाने पोखरते.
- कीडग्रस्त पाने कपासारखी अथवा चोचेसारखी दिसतात व ती गळून पडतात.
उपाय (Remedy):
इंडोक्झाकार्ब 14.5% एससी (घरडा-किंगडोक्सा) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
खोडमाशी (Khodmashi):
खोडमाशीची ओळख:
- या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.
- या पांढऱ्या रंगाच्या असुन त्या खोडात दडुन बसतात.
- मादी माशी देठावर व पानावर अंडी घालते.
- अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पाने पोखरुन देठापर्यंत पोहचतात.
खोडमाशीची लक्षणे (Symptoms):
- खोडमाशीचा प्रादुर्भाव पिक लहान असतानाच सहजपणे ओळखता येतो.
- या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो
- सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे 15 ते 20 दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते.
- असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते.
- रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते.
उपाय (Remedy):
- थियामेथोक्सम 12.60%+ लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 09.50% झेडसी (सिजेंटा-अलिका) 80 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा. किंवा
- क्विनॉलफॉस २५ इसी (धानुका - धानुलक्स) 200 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
चक्री भुंगा (Gridle Beetle):
चक्री भुंग्याची ओळख:
- या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो.
- लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते.
चक्री भुंग्याची लक्षणे (Symptoms):
- शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेली दिसते.
- पान फक्त सुकलेले असेल तर चक्री भुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते जर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरु करण्याची शक्यता असते.
- चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे वरच्या खापेच्या वरील भाग वाळून जातो.
- चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते.
उपाय (Remedy):
किडीच्या प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी 15 दिवसाच्या अंतराने पुढील पैकी किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी -
पहिली फवारणी -
थियामेथोक्सम 12.60%+ लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 09.50% झेडसी (सिजेंटा-अलिका) 80 मिली सोबत निम तेल 10000 पी.पी.एम - 400 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा. यामुळे खोडकिडीसोबतच चक्री भुंगा व रस शोषक किडीच्या नियंत्रणास मदत होईल.
दुसरी फवारणी - 30 - 35 दिवसानी थायक्लोप्रीड 21.7 एससी (बायर-अलांटो) 300 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
तिसरी फवारणी - 45 - 50 दिवसांनी क्लोरएन्ट्रानिलिप्रोल 18.5 % एससी (FMC-कोराजेन) 60 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
चौथी फवारणी - 60 - 65 दिवसांनी इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी (देहात इलिगो) 100 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
पांढरी माशी (White Fly):
पांढऱ्या माशीची ओळख :
- पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
- रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
- या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
- कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
- पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.
पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms):
- पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
- या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
- झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
- या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
उपाय (Remedy):
- प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
- याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्राम प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
प्रमुख रोग (Soybean disease) :
पानांवरील ठिपके (Nematodes):
लक्षणे:
- हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.
- झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.
- कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
- आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.
रोग व्यवस्थापन:
- पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
तांबेरा रोग (Rust):
लक्षणे:
- तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
- हे ठिपके हळूहळू जांभळट व थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
- हे ठिपके गोल ते अंडाकृती आकाराचे असून विखुरलेले किंवा पुंजक्यांसारखे असतात.
- तांबेरा रोगाची लक्षणे पर्णकोषावर आणि फुलांच्या फांदीवरही दिसतात.
रोग व्यवस्थापन:
- रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
- पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
- वेळेवर पेरणी करावी.
- पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
- तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे.
एकात्मिक व्यवस्थापन :
- सोयाबीन पेरणीपूर्वी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. जमिनीतील किडीच्या अवस्था उष्णता, पक्षी यामुळे नष्ट होतात.
- पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
- प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त 8 दिवसांच्या आत पेरणी आटपावी.
- पेरणीसाठी कीड प्रतिकारक्षम वाणाचा वापर करावा.
- पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत थायोमिथोक्साम 30% एफ.एस. 10 मि.लि. प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्या माशीच्याही नियंत्रणास मदत होते.
- पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळे चिकट सापळे एकरी 10 या प्रमाणे साधारणपणे 8-10 मीटर अंतरावर लावावेत.
- शिफारशीप्रमाणेच नत्र खताची मात्रा द्यावी. अतिरिक्त मात्रा दिल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढतो.
तुम्ही तुमच्या उन्हाळी सोयाबीन पिकामधील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. शेतकरी उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड का करतात?
खरिप हंगामामध्ये फुलोरा व काढणी काळात पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याची कमी भरून काढण्यासाठी शेतकरी उन्हाळी सोयाबीनची पेरणी करतात.
2. उन्हाळी सोयाबीन पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
उन्हाळी सोयाबीन पिकावर पाने गुंडाळणारी अळी, खोडमाशी, चक्री भुंगा, पांढरी माशी हे कीटक तर, पानांवरील ठिपके, तांबेरा हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.
3. चक्री भुंगा कसा ओळखावा?
चक्री भुंगा किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असून, लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ