पोस्ट विवरण
सुने
मिर्च
कीट
कृषि ज्ञान
हरी मिर्च
कृषी ज्ञान
DeHaat Channel
28 Feb
Follow

मिरची मधील प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Pests in Chilli and their Management)


मिरची मधील प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Pests in Chilli and their Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. महाराष्ट्रात मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. किडींचा प्रादुर्भाव होणे व योग्य वेळी किडींचे नियंत्रण न करणे यामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान होते. मिरची पिकाचे किडीमुळे 34 ते 75 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. आजच्या भागात हे नुकसान टाळता यावे व वेळीच उपाययोजना करून पीक वाचविता यावे याकरिता मिरची पिकामधील प्रमुख किडी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मिरची या पिकावर रस शोषण करणारे कीटक जास्त प्रमाणात आढळतात. फुलकिडे, तुडतुडे, मावा, पांढरी माशी तसेच कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

1) फुलकिडे ओळख (Thrips):

फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात त्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.

लक्षणे (Symptoms):

 • मिरचीवर फुलकिडे (Thrips) या कीटकांचा प्रादुर्भाव शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो.
 • हे कीटक पानावर ओरखडे पाडतात व त्यामधून निघणारा रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात व पानांच्या कडा ह्या वरच्या बाजूला वळतात आणि बारीक होतात.
 • हे कीटक खोडातील देखील रस शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
 • या किडीचा उपद्रव पीक लहान असतानाच सुरू होतो. ते मोठे होईपर्यंत राहतो.
 • झाडाची वाढ खुंटते. झाडाला मिरच्या कमी लागतात.

उपाय (Remedy):

 • या कीडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) 400 मिली किंवा
 • ऐसफेट 50% + इमिडा 1.8% एसपी (यूपीएल-लान्सर गोल्ड) 300 ग्रॅम किंवा
 • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (घरडा-पोलीस) 100 ग्रॅम किंवा
 • फ्लॉनिकॅमिड 50% डब्ल्यूजी (यूपीएल-उलाला) 60 मिली एकरी वापर करावा.
 • या कीटकनाशकांचा स्प्रे फुलोरा अवस्थेत घेऊ नये

2) तुडतुडे ओळख (Jassid):

 • किडीची 4 ते 5 मि. मी. लांबी, रंग हिरवट करडा असून, आकार पाचरीसारखा असतो.
 • डोक्‍यावर तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात.
 • तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.

तुडतुडे कीटकाची लक्षणे (Symptoms):

 • तुडतुडे ही कीड पानातील रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषून घेतात.
 • तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे मिरचीवर, पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते.
 • प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो.
 • या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते.
 • तुडतुड्यांमुळे 50 ते 70% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

उपाय (Remedy):

 • मिरचीवरील या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
 • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 80 ग्रॅम 200 मिली किंवा
 • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3) मावा कीटकाची ओळख (Aphid):

 • मिरचीच्या पिकातील मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
 • मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.

मावा कीटकाची लक्षणे (Symptoms):

 • हे कीटक मिरचीची कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
 • त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
 • ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोधते.
 • मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.

उपाय (Remedy):

 • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी.
 • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली प्रती एकर या प्रमाणात ड्रीप द्वारे द्यावे.

4) पांढरी माशी ओळख (White Fly):

 • पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
 • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
 • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
 • कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
 • पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms):

 • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
 • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
 • झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
 • या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

उपाय (Remedy):

 • प्रति एकर शेतात 4 ते 6 पिवळे चिकट सापळे वापरा.
 • एसिटामिप्रिड 20 % एस पी (टाटा-मानिक) 100 ग्रॅम किंवा एसीफेट 75% डब्ल्यूपी (टाटा-असताफ) 400 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
 • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 15 ग्रॅम किंवा थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 80 ग्रॅम 200 मिली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
 • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ऍसिटामिप्रिड 20% एसपी (टाटा-माणिक) 100 ग्रॅम किंवा
 • डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यू पी (सिजेंटा-पेगासस) 200 ग्रॅमची एकरी फवारणी करावी.

5) कोळी कीटकाची ओळख (Mite):

कोळी हे कीटक अत्यंत सूक्ष्म (लांबी 1 मि.मी.) असून, चप्पट, वर्तुळाकार, लाल किंवा पिवळसर असतात.

पानावर ते सैरावैरा धावत असतात.

कोळी कीटकाची लक्षणे (Symptoms):

 • हे कीटक पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषतात.
 • प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात.
 • झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कोकडलेली दिसतात.
 • सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात.
 • प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते.
 • फुलांची गळ होते.
 • फळांचा आकार लहान राहून विद्रूप होतो.
 • उत्पादनात भारी घट होते.

उपाय (Remedy):

 • या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोपरगाईट 57% ईसी (धानुका-ओमाइट) 400 मिली किंवा
 • फेनाझाक्विन 10% ईसी (कोर्टेवा-मॅजिस्टर) 200 मिलीची एकरी फवारणी करावी.

तुम्ही तुमच्या मिरची पिकामधील प्रमुख कीड व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात मिरची पिकाची लागवड कुठे होते?

मिरचीचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रात नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि उस्‍मानाबाद येथे घेतले जाते.

2. मिरची पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?

मिरची या पिकावर मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके व भुरी रोग या विषाणूजन्य रोगांचा तर, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा यासारख्या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.

3. मिरची पिकावरील कोळी कीटक कसा ओळखावा?

कोळी हे कीटक अत्यंत सूक्ष्म (लांबी 1 मि.मी.) असून, चप्पट, वर्तुळाकार, लाल किंवा पिवळसर असतात.

33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ