पोस्ट विवरण
सुने
कृषि
कीट
कृषि ज्ञान
शरीफा
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
4 Oct
Follow

सीताफळ पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Pests of Custard Apple Crop and Their Management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हे महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फार प्राचीन काळापासून सिताफळ हे दऱ्या खोऱ्यातील कोरडवाहू फळझाड, रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे. सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. सहसा या फळपिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत नाही. परंतु बदलत्या वातावरणीय परिस्थितीमुळे पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. सीताफळ या फळपिकावर सहसा कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत नसला तरी बदलत्या हवामानामुळे त्यावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. सीताफळाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करण्यासाठी किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण याचविषयीची माहिती घेणार आहोत.

सीताफळ पिकात आढळून येणारे प्रमुख कीटक:

  • फुलकिडे
  • मावा
  • पिठ्या ढेकूण
  • फळमाशी
  • पांढरी माशी

फुलकिडे (Thrips):

फुलकिड्यांची ओळख (Identification of Custard Apple Thrips):

  • फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मिमी पेक्षा कमी लांबीचे असतात त्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.
  • फुलकिडे नुकत्याच आलेल्या कळ्या, नुकतीच फळधारणा झालेली फळे, पानाच्या मागील बाजूच्या मुख्य शिरा खरवडून बाहेर पडणारा द्रव शोषतात.

फुलकिड्यांची लक्षणे (Symptoms of Thrips):

  • फुलकिडे (Thrips) या कीटकांचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो.
  • प्रादुर्भाव झालेली पाने गळू लागली की या किटकांचा मोर्चा दुसऱ्या पानांकडे वळतो.
  • फुलकिड्यांनी खरवडलेला, नुकसान केलेला भाग तपकिरी रंगाचा होतो. कालांतराने काळपट पडतो.
  • पाने वेडीवाकडी होतात.
  • मोठ्या फळांवर देखील खरवडल्याचे डाग दिसून येतात.
  • फळ वाटेल तसे डाग ही वाढत जातात.
  • प्रादुर्भावग्रस्त भाग कडक होतो.
  • फळांचा आकार वेडावाकडा होतो. परिणामी फळांना बाजारात चांगला भाव मिळत नाही.

फुलकिड्यांचे व्यवस्थापन (Management of Thrips):

  • या कीडीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावेत.
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • या कीडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% एससी (देहात-स्लेमाइट एससी) 400 मिली किंवा
  • ऐसफेट 50% + इमिडा 1.8% एसपी (यूपीएल-लान्सर गोल्ड) 300 ग्रॅम किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात-Demfip) 100 ग्रॅम किंवा
  • फ्लॉनिकॅमिड 50% डब्ल्यूजी (यूपीएल-उलाला) 60 ग्रॅम एकरी वापर करावा.

मावा कीटक (Aphid) :

मावा कीटकाची ओळख (Identification of Custard Apple Aphids):

  • मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
  • मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.

मावा कीटकाची लक्षणे (Symptoms of Aphids):

  • हे कीटक कोवळ्या कळ्यांमधील रस शोषून घेतात.
  • त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
  • ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळी बुरशी वाढते.
  • या कीटकाच्या अधिक प्रादुर्भावामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

मावा कीटकाचे व्यवस्थापन (Management of Aphids):

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
  • फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
  • बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.

पिठ्या ढेकूण (Mealybug):

पिठ्या ढेकूण किटकाची ओळख (Identification of Custard Apple Mealybug) :

  • प्रौढ मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असून रंग पांढरट लालसर असते.
  • डोके आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात.
  • मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात जवळपास 600 अंडी घालते. अंडी वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात.
  • अंडी अंडाकृती, नारंगी रंगांची असतात.

पिठ्या ढेकूण किटकाची लक्षणे (Symptoms of Mealybug):

  • ही कीड पाने,कोवळ्या फांद्या,कळ्या आणि कोवळी फळे यामधून रस शोषण करते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्या व फळे गळतात. अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो.
  • या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर जास्त आढळतो.
  • या किडीच्या अंगातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळी बुरशी चढते. त्यामुळे झाडांची पाने, काळी पडून प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.

पिठ्या ढेकूण किटकाचे व्यवस्थापन (Management of Mealybug):

  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 500 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • (Mealy raze - Kay bee) ची 400 मिली प्रति एकर फवारणी करावी.

पांढरी माशी:

पांढऱ्या माशीची ओळख (Identification of Custard Apple White fly) :

  • ही कीड दक्षिण भारतात कधीकधी आढळते.
  • पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
  • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
  • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
  • कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
  • पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms of White fly):

  • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले पानाच्या खालच्या भागातून अन्नरस शोषतात.
  • त्यांच्या पोटातून ते चिकट पदार्थ पानांवर टाकतात. त्यामुळे त्यावर एक थर जमा होतो व अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते.
  • त्यामुळे फळे लहान राहून उत्पन्नात घट येते.

पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन (Management of White fly):

  • प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
  • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा  किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

फळमाशी (Fruit Fly):

फळमाशीची ओळख (Identification of Custard Apple Fruit Fly):

  • फळमाशी ही कीड सीताफळावर वर्षभर आढळते.
  • फळमाशी रंगाने पिवळसर तांबूस असते.
  • फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
  • फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.

फळमाशीची लक्षणे (Symptoms of Fruit Fly):

  • फळमाशी ही कीड फळाच्या आत अंडी घालते आणि मग अळ्या फळांचा गर खातात.
  • या किडीची ओळख म्हणजे ही कीड अंडी घालताना फळाला बारीक छिद्र करते. त्या छिद्रातून पातळ द्रव्य बाहेर येते.
  • कीड लागल्यावर फळे सडतात.
  • शेवटी ही फळे खाली गळून पडतात.

फळमाशीचे व्यवस्थापन (Management of Fruit Fly):

  • शेतात कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
  • फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक)100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या सीताफळ पिकातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1) महाराष्ट्रात सीताफळ पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

सीताफळ पिकाच्या वाढीसाठी महाराष्‍ट्रातील हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्‍यास भरपूर वाव आहे. अत्‍यंत कोरडया रखरखीत व उष्‍ण हवामानाच्‍या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्‍या हवामाना पर्यंतच्‍या प्रदेशात सिताफळ वाढते.

2) सीताफळ बागेत बहार का धरला जातो?

एकाच वेळी फळधारणा होण्यासाठी बहार धरला जातो.

3) सीताफळ बागेमध्ये आच्छादनाचा वापर का करावा?

सीताफळ बागेमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.

47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ