पोस्ट विवरण
सुने
कृषि
मक्का
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
7 Mar
Follow

मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन!


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. मका, हे जगातील सर्वात महत्वाच्या पिकांपैकी एक आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच हे पीक भारतासोबतच महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मका हे उबदार हंगामातील पीक आहे. त्याला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. मका पिकाचे 30 ते 40 टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग. याच मका पिकावर येणारी एक महत्वाची कीड म्हणजे अमेरिकन लष्करी अळी. ही कीड तिच्या वाढीच्या वेगवगेळ्या टप्पात पिकाचे आतोनात नुकसान करते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीविषयी आणि तिच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

अमेरिकन लष्करी अळी (American armyworm):

अंडी :

  • एक मादी तिच्या संपूर्ण जीवनकाळात सुमारे 1500 ते 2000 अंडी 100 ते 200 च्या समुहात कोवळ्या पानांच्या खालच्या किंवा वरच्या बाजुला पुंजक्यात देत असून, राखाडी रंगाच्या मऊ केसांनी झाकलेली असतात.
  • घुमटाच्या आकाराची पांढरी अर्धगोलाकार अंडी चार ते पाच दिवसात उबवतात.

अळी :

  • अळी अवस्था पिकाला प्रत्यक्ष नुकसान करणारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे.
  • अळी हिरवट तपकिरी रंगाची असून वेगवेगळ्या सहा अवस्थांमधुन जाते.
  • अळयांची त्वचा गुळगुळीत असून पुर्ण वाढ झालेल्या अळीच्या तोंडावर पांढऱ्या रंगाच्या उलट्या वाय आकाराचे चिन्ह दिसते व समोरील आठव्या व मागुन दुसऱ्या शरीर वलयावर हलक्या रंगाचे चार चौकोनी ठीपके दिसतात.
  • या महत्वाच्या बाबीवरुन अळीची ओळख होते.
  • सामान्य लष्करी अळीचे शरीर तपकिरी असले तरी बहुतांश अळीची पाठ हिरवट रंगाची असते व अशा अळीच्या पाठीवर ठीपके गडद रंगाऐवजी हलक्या रंगाचे असतात.
  • उन्हाळयात अळी अवस्था 14 दिवसांची व हिवाळयात 30 दिवसापर्यंत असू शकते.
  • पुर्ण वाढ झालेली अळी 3.1 ते 3.8 से.मी. लांब असते. दिवसा अळी लपून बसते व रात्रीच्या वेळी प्रादुर्भाव घडवून आणते.

कोष :

  • कोषावस्था म्हणजे सुप्तावस्था असून कोष जमिनीत 2 ते 8 सें.मी. खोलीवर असतात.
  • कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात.
  • कोषावस्था उन्हाळयात 8 ते 9 दिवसांची व हिवाळ्यात 30 दिवसापर्यंत असते.

प्रौढ :

  • प्रौढ अवस्था ही निशाचर असून उष्ण व दमट वातावरणात जास्त सक्रिय असते.
  • नर पतंगाच्या पंखाच्या पुढच्या बाजूस पांढरे ठिपके असतात व मादी पतंगाचे पंख राखाडी तपकिरी रंगाचे असतात.
  • प्रौढांचे आयुष्य 10-12 दिवसांपर्यंत असून त्या कालावधीत मिलन करुन मादी अंडी देवून दुसरी पिढी चालु करते.

नुकसान:

  • या नुकसानीचा प्रकार म्हणजे सर्वप्रथम अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पानांचा पापुद्रा खातात. त्यामुळे पानांना पांढरे चट्टे पडतात.
  • दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळया पानांना छिद्रे करतात.
  • कालांतराने या अळया पोंग्यात जावून छिद्रे करतात.
  • जुनी पाने पर्णहीन होवून पानांच्या शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते.
  • झाड फाटल्यासारखे दिसते.
  • पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते.
  • मध्यम पोंगे अवस्था कमी तर उशीरा पोंगे अवस्था अळीला जास्त बळी पडते.
  • कालांतराने अळी कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करुन दाणे खाते.

अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन (Management of American armyworm):

  • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी पिक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
  • नर पतंग पकडण्यासाठी एकरी 6 कामगंध सापळे लावावेत.
  • 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी 5 मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे करावी.
  • अथवा अझाडीरॅक्टीन 1,500 पीपीएम (BACF - लिमडो) 5 मि.ली. प्रति लीटर पाणी प्रमाणे फवारणी करावी व नोमुरीया रिले या जैविक औषधाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 8 किलो/एकर किंवा
  • डेल्टामेथ्रिन 100% ईसी (11% w/w) (बायर-Decis) 60 मिली एकर किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (देहात-स्लेमाईट एससी) 400 ते 600 मिली एकर किंवा
  • स्पिनेटोरम 11.7 % एससी (Delegate - dow) 180 मिली एकर किंवा
  • नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% w/w एससी (Adama - Plethora) 175 मिली एकर 150 ते 200 लीटर पाण्यातून द्यावे.

तुम्ही मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करता? आणि कोणती कीटकनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मका हे कोणत्या हंगामातील पीक आहे?

मका हे उबदार हंगामातील पीक आहे.

2. मका पिकाला किमान किती दिवसांचा कालावधी लागतो?

मका पिकाला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.

3. अमेरिकन लष्करी अळीच्या वाढीच्या किती अवस्था आहेत व कोणत्या?

अमेरिकन लष्करी अळीच्या वाढीच्या चार अवस्था आहे. पहिली म्हणजे अंडी, दुसरी अळी, तिसरी कोष आणि चौथी म्हणजे प्रौढ अवस्था.

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ