फुलकोबीमधील चौकोनी ठिपक्यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) कीटकाचे व्यवस्थापन! (Management of Diamond Back Moth in Cauliflower!)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे. जवळ-जवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये फुलकोबीची लागवड केली जाते. हे थंड हवामानात येणारे पीक असून सुधारित तसेच संकरीत जातींच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते. महाराष्ट्रामध्ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. मात्र फुलकोबी पिकास योग्य हवामान व जमीन न मिळाल्यास बटाटा पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यातीलच एक महत्वाची व घातक कीड म्हणजे चौकोनी ठिपक्यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ). या पतंगाचा सुरुवाती हंगामात लागवड केलेल्या पिकावर प्रादुर्भाव अधिक आढळून येतो ज्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो. म्हणूनच या कीटकामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण फुलकोबीमधील चौकोनी ठिपक्यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) या कीटकाविषयी व त्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाची (डायमंड बॅक मॉथ) अंडी अवस्था:
- डायमंड बॅक मॉथ या कीटकाची अंडी अंडाकार आणि चपटी असून 0.44 मिमी लांब व 0.26 मिमी रुंदीची असतात.
- तसेच अंडी पिवळ्या किंवा फिकट हिरव्या रंगाची असून पानांच्या पृष्ठभागावर 2 ते 8 अंडी असलेल्या लहान समूहांमध्ये दिसतात.
- या कीटकाची मादी 250 ते 300 अंडी घालू शकते, परंतु सरासरी 150 अंडी देते.
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाची (डायमंड बॅक मॉथ) अळी अवस्था:
- या कीटकाची लहान अवस्थेतील अळी सर्वात सक्रिय आणि पिकास हानिकारक असते.
- हे कीटक रेशमच्या धाग्यासारख्या तंतूवरून जमिनीवर पडतात.
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाची (डायमंड बॅक मॉथ) कोषावस्था:
- कोषावस्था एका सैल रेशीम मध्ये उद्भवते, सामान्यत: पिकाच्या खालच्या किंवा बाह्य पानांवर तयार होते.
- फुलकोबी, ब्रोकोली आणि कोबीमध्ये होते.
- पिवळ्या रंगाच्या कोषाची लांबी 7 ते 9 मिमी असते.
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाची (डायमंड बॅक मॉथ) प्रौढ अवस्था:
- प्रौढ डायमंड बॅक मॉथ एक बारीक, तपकिरी रंगाचा पतंग आहे. जो एक लहान, स्पष्ट अँटेनासह असतो.
- या कीटकाच्या मागील बाजूस क्रीमी किंवा हलक्या तपकिरी रंगाची चिन्हे असतात.
- दुसर्या बाजूने पाहिले असता, पंखाचे टोक किंचित वरच्या बाजूस फिरलेले दिसते.
- प्रौढ नर आणि मादी अनुक्रमे 12 आणि 16 दिवस जगतात, अंडी सुमारे 10 दिवस असतात. पतंग कमकुवत उडणारे असतात.
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाचे (डायमंड बॅक मॉथ) व्यवस्थापन:
- प्रादुर्भाव ग्रस्त पाने तोडून टाकावीत.
- एकरी 4 ते 5 कामगंध सापळे चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी लावावेत.
- मित्र कीटक असलेल्या कोटेशिया प्लुटेला या अळी परजीवीचे संवर्धन करावे.
- मोहरी या सापळा पिकाच्या 2 ओळी फुलकोबीच्या 20 ते 22 ओळीनंतर लावाव्यात.
- मोहरीच्या झाडांकडे 80 ते 90 टक्के चौकोनी ठिपक्यांचे पतंग आकर्षित होतात.
रासायनिक नियंत्रण:
- कामगंध सापळे (Plutella Xyllostella) 10 प्रति एकर लावा.
- 2 ते 3 प्रतिझाड प्रादुर्भाव दिसताच, प्रतिलिटर पाणी निंबोळी तेल (0.03 टक्के) किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरेक्टीन 3000 पीपीएम (उत्कर्ष:नीमोज-गोल्ड) 0.5 मिलीची फवारणी करावी.
प्रादुर्भाव जास्त दिसताच खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करा:
- सायान्ट्रानिलीप्रोल 10.26% ओडी (FMC-बेनेव्हिया) 400 मिली किंवा
- डायफेन्थुरॉन 50% डब्ल्यूपी (धानुका-पेजर) 240 ग्रॅम किंवा
- फ्लुबेंडियामाइड 39.35 एससी (बायर-फेम) 100 मिली किंवा
- क्लोरफेनापीर 10% एससी (BASF-इंटरप्रिड) 300 ते 400 मिली किंवा
- क्लोरफ्लुझुरॉन 5.4% ईसी (UPL-एटाब्रॉन) 600 मिली किंवा
- डायफेंथियुरॉन 40% w/w + स्पीनेटोरम 5% डबल्यु/डबल्यु एससी 300 मिली (अदामा-Trassid) किंवा
- फ्लक्सामेटामाइड 10% डबल्यु/डबल्यु ईसीन 160 मिली (गोदरेज-Gracia) किंवा
- टॉल्फेनपायरॅड 15% ईसी (PI-कीफुन) 400 मिली एकर 200 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
तुम्ही तुमच्या फुलकोबी पिकातील चौकोनी ठिपक्यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) किटकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. फुलकोबी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य आहे.
2. फुलकोबी लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
फुलकोबी पिकाला हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान फुलकोबीच्या वाढीस पोषक असते.
3. फुलकोबी लागवडीची जातीपरत्वे योग्य वेळ कोणती?
लवकर येणाऱ्या वाणांसाठी : सप्टेंबर-ऑक्टोबर
मध्यम येणाऱ्या वाणांसाठी : जून-जुलै-ऑगस्ट
उशिरा येणाऱ्या वाणांसाठी : एप्रिल-मे
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ