पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
12 Mar
Follow

वाढत्या तापमानात असे करा शेळ्यांचे व्यवस्थापन (Management of goats in High temperature)

वाढत्या तापमानात असे करा शेळ्यांचे व्यवस्थापन (Management of goats in High temperature)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महाराष्ट्रात सर्वसाधारणत: शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात. त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान 8 ते 9 किलोमीटर चालावे लागते. उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ प्रतीचा चारा शिल्लक असतो. अश्यावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना कारावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते. तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो. म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

उन्हाळ्यात शेळ्यांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी आणि अति उष्णता यांचा त्रास होतो. याचा परिणाम शरीरावर झाल्याने प्रजनन क्रिया थांबते किंवा प्रजनन क्रियेस हानी होऊ शकते. उष्णतेचा ताण बसल्यास गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे आम्ल पित्ताचा त्रास होऊन जुलाब होऊ शकतात. अति उष्णतेमुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन उत्पादनाबरोबर आरोग्यावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण वाढत्या तापमानातील शेळ्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

शेळ्यांमधील उष्णतादाहाची लक्षणे (Symptoms of heatstroke in Goats) :

  • शेळ्या सावलीत राहणे पसंत करतात.
  • खाद्य खाणे कमी करतात.
  • पाणी पिण्याचे प्रमाण वाढते.
  • अस्वस्थता वाढते.
  • श्वासोच्छवास वाढतो.
  • शेळ्या तोंड उघडून श्वास घेतात.
  • हृदयाचे ठोके वाढतात.
  • घामाचे प्रमाण वाढते.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
  • लघवी करण्याचे प्रमाण कमी होते.
  • शेळ्यांच्या मासाची गुणवत्ता खराब होते.

वाढत्या तापमानात शेळ्यांसाठी निवारा (Shelter for Goats in High Temperature) :

  • उन्हाळ्यात उष्णतेपासून शेळ्यांचा बचाव करण्याकरिता त्यांच्यासाठी निवारा असणे गरजेचे आहे.
  • बांबू, लाकडे, वाळलेले गवत, तुरटया इ. च्या सहाय्याने शेळ्यांसाठी कमी खर्चात निवारा तयार करता येऊ शकतो. असा तात्पुरता निवारा जमिनीपासून 7 ते 8 फुट उंच असावा.
  • उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
  • निवाऱ्यात शेळ्यांसाठी थंडावा वाढविण्याकरिता निवाऱ्याच्या उघड्या बाजूस सुतीकापड किंवा ग्रीन गार्डन नेट किंवा सुतीपोती लावून घ्यावी व त्यावर पाणी शिंपडून घ्यावे.
  • पक्के गोठे असतील तर गोठ्यात फोगर (बाष्पक) आणि हवा खेळती राहावी याकरिता पंखे बसवून घ्यावेत.
  • गोठ्यामध्ये शेळ्यांना पुरेशी जाग उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमान वाढत नाही याकरिता प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते.
  • एका गोठ्यात 50-60 पेक्षा अधिक शेळ्यांना ठेवू नये.
  • गोठ्याचे छत पक्के असेल(सिमेंट कॉंक्रीट किंवा पत्रे) तर गोठ्याच्या छतास चुना किंवा पांढऱ्या पेंटचा जाड थर मारून घ्यावा ज्यामुळे आतील तापमान 2 ते 3 अंश सेल्सीअस ने कमी होण्यास मदत होते.

खाद्य, चारा व्यवस्थापन (Food, Fodder Management) :

  • शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एकावेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा.
  • चाऱ्याची कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करून द्यावे.
  • वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे जेणेकरून शेळ्या आवडीने चारा खातील.
  • शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा.
  • जेणेकरून शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही. या कालावधीत शेळ्यांना अतिरिक्त ऊर्जा पुरविणे गरजेचे आहे.
  • ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेल्या क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.
  • उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्यासाठी सोडियम, पोटॅशिअमचे प्रमाण चांगल्या पातळीवर ठेवणे गरजेचे असते. कारण वाढलेल्या तापमान काळात पोटॅशियम जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते. यासाठी यांचा खाद्यातून पुरवठा करावा.
  • उन्हाळ्यात शारीरिक तापमान समतोल साधण्यासाठी अॅन्टिऑक्सिडंट्‍स जसे जीवनसत्त्व क आणि ई चा आहारात समावेश करावा.
  • उन्हाळ्यात शेळ्यांची भूक कमी होते, अशावेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक घटक देऊन उत्पादन घेता येते. त्यासाठी बायपास फॅटचा वापर करावा.
  • शेळीच्या पोटात बायपास फॅटवर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याने कोठी पोटाचे तापमान कमी राखण्यास मदत होते.
  • उपलब्ध चारा, खाद्य घटकांचे पचन अधिक वाढविण्यासाठी बायपास फॅटबरोबरच प्रजननासाठी कॅल्शिअम व इतर नैसर्गिक खनिजे, रुमेन बफर व यीस्ट कल्चर, अॅसिडिटी रेग्युलेटर, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सेलेनियम व बायोटीन यांचा वापर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावा. यामुळे शेळ्या वेळेवर माजावर येण्यास, गाभण राहण्यास मदत होते. योग्य खाद्य पचनामुळे उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • उन्हाळ्यात पशुआहारात बटाट्याचा वापर केल्यास, बटाट्यातील स्टार्च व जीवनसत्त्व क च्या उपलब्धतेमुळे ताण कमी करण्यास मदत होऊन दुधाची उत्पादकता वाढते.
  • चराऊ शेळीपालनामध्ये चरण्याच्या वेळा बदलाव्यात. सूर्योदयापूर्वी व सायंकाळी शेळ्या चरावयास सोडाव्यात, जेणेकरून बराचसा काळ शेळ्या गोठ्यात राहतील. उन्हाचा ताण येणार नाही.
  • उन्हाळ्यात खाद्यामध्ये कमी तंतुमय घटक असलेले रेशन दिल्यास त्याचा पचनक्रियेवर चांगला परिणाम होऊन उत्पादकता टिकून राहते.

उन्हाळ्यातील शेळ्यांचे लसीकरण (Vaccination) :

  • आंत्र विषार ही लस वर्षातून एकदा एप्रिलमध्ये दोन मात्रा पंधरा दिवसाच्या अंतराने द्याव्यात, लाळ्या खुरकुत लसीकरण मार्च किंवा एप्रिल महिन्यात तसेच घटसर्प लस वर्षातून एकदा मार्च किंवा एप्रिल महिन्यात देण्यात यावी.
  • लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर एलेक्त्रोलायीट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही.
  • तसेच लसीकरण करण्याच्या आठ दिवस आधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना जंतनाशकाचा डोस द्यावा.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही वाढत्या तापमानात तुमच्या शेळ्यांचे व्यवस्थापन करू शकाल. याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. अति उष्णतेमुळे शेळ्यांवर काय परिणाम होतो?

अति उष्णतेमुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन उत्पादनाबरोबर आरोग्यावर परिणाम होतो.

2. शेळ्यांना चारा कसा द्यावा?

शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एकावेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा.

3. शेळ्यांसाठी तात्पुरता निवारा कशाच्या सहाय्याने करता येऊ शकतो?

बांबू, लाकडे, वाळलेले गवत, तुरटया इ. च्या सहाय्याने शेळ्यांसाठी कमी खर्चात निवारा तयार करता येऊ शकतो.

48 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ