पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
25 July
Follow

पावसाळ्यात असे करा शेळ्यांचे व्यवस्थापन (Management of goats in rainy season)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

गरीबाची गाय म्हणून शेळीला ओळखले जाते. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यातील आद्रता नियंत्रित करण्यासाठी घ्यावी लागते. कारण जास्त आद्रता शेळ्यांना सहन होत नाही.  त्यामुळे त्यांना श्‍वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यामध्ये आद्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते. त्यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. यासाठी व्यवसायात असणारी जागरूकता महत्त्वाची असते. शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन करताना लक्षात ठेवायच्या अशाच काही गोष्टींविषयी.

1) कळपातील सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषधे द्यावीत:

  • जंतुनाशकांमुळे तुमचा कळप जंतमुक्त राहू शकेल.
  • पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेली आर्द्रता आणि उष्णता जंतांची अंडी, गोचीड वाढीसाठी अनुकूल असते. अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात.
  • गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात.
  • अंगावर खाज सुटते, त्यामुळे शेळ्या बैचेन होतात, खाणे बंद करतात, हालचाल मंदावते यावर उपाय म्हणून शेळ्यांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक औषध लावावे किंवा गोठा धुऊन घ्यावा.

2) शेळ्या आर्द्रता सहन करू शकत नाहीत:

  • शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही त्या उष्णता सहन करू शकतात.
  • गोठ्यातील आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी अथवा 60 वॉटचा विजेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा.

3) गोठा कोरडा ठेवावा:

  • गोठ्यातील मलमूत्र रोजच्या रोज साफ करून गोठा कोरडा ठेवावा.
  • गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसर पणा राहून पायाला फोड येतात. यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, जनावरे चारा कमी खातात अशक्त होतात.

4) पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांना बाहेर सोडू नये:

पावसात जास्त वेळ शेळी भिजली की न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते.

5) पावसाळ्यात जनावरांना जास्त प्रमाणात चारा देऊ नये:

  • पावसाळ्यात आलेल्या कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, जास्त प्रमाणात हा चारा खाल्यामुळे शेळ्यांना अपचन होते.
  • पोटफुगी, हगवणीसारखे आजार होतात.
  • पोटफुगी होऊ नये यासाठी गोडे तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते.
  • हगवणीवर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

6) पावसाळ्यात करडाची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे:

  • पावसाळ्यात करडाची निगा राखल्यास करडामधील मरतुकीचे प्रमाण कमी करता येते.
  • मरतुकीचे प्रमाण 5 ते 10 टक्क्यांपर्यंत राखले पाहिजे, यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जन्मानंतर 24 तासांच्या आत करडांना चीक किंवा दूध पाजावे. त्यामुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती व ऊर्जा मिळते व त्यांची पचनसंस्था साफ होण्यास मदत होते.

7) पावसाळ्यात आंत्रविषार होऊ नये म्हणून लसीकरण करावे.

8) पावसाळ्यात फुफ्फुसदाह आजार गोठ्यातील चुकीच्या व्यवस्थापनामुळे होतो. नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरते.

9) पावसाळ्यात लाळ्या खुरकूत आजाराचा प्रसार वेगाने होतो. यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरते.

10) पावसाळ्यातच घटसर्प आणि फऱ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे.

11) गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहते, त्यामुळे चालताना घसरून पडणे हा प्रकार आढळतो, त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.

12) पावसाळ्यात शेळ्या विण्याचे प्रमाण अधिक असते. या काळात गर्भाशयाचे तोंड उघडे असते, जर योनी भाग व बाजूचा भाग स्वच्छ नसेल, तर गर्भाशयात जंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी व सौम्य जंतुनाशकाचा वापर करून धुऊन काढावा. स्वच्छता ठेवावी.

13) पावसाळ्यात शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे धनुर्वाताचे इंजेक्शन द्यावे.

14) शेळ्यांची खरेदी पावसाळ्यात करू नये. कारण पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. जर तशी गरज भासली तर ज्या भागातून शेळ्या खरेदी करावयाच्या आहेत, तेथे आजाराचा प्रादुर्भाव झालेला नसावा, याची तपासणी करावी.

15) पावसाळ्यात झुडपे, गवत आणि चारा पिकांची लागवड करावी.

लसीकरणाचे महत्व :

  • पावसाळ्यामध्ये शेळ्यांना प्रामुख्याने विविध जिवाणू विषाणू आणि परजीवी कृमी यांच्यामुळे विविध आजार होतात.
  • बदलते हवामान आणि खाद्यातील पोषकत्वांच्या अभावामुळे विशेषता करडे लवकर आजारास बळी पडतात.
  • पावसाळ्यामध्ये करडांच्या खाद्य, पाणी आणि आरोग्याची योग्य निगा राखणे आवश्यक असते.
  • शेळ्या व करडांना आंत्रविषार, फुफ्फुसदाह, लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
  • पावसाळ्यामध्ये शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी धनुर्वार्ताचे इंजेक्शन पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून द्यावे.
  • गाभण शेळीची पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहिल्यामुळे चालताना घसरून पडून गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यासाठी गाभण शेळ्यांचे स्वतंत्र योग्य निवाऱ्याखाली आणि कोरड्या ठिकाणी व्यवस्थापन करावे.

तुम्ही पावसाळ्यात तुमच्या शेळ्यांची काळजी कशी घेता? त्यांच्यामध्ये वरीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे दिसून आली आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरे पावसाळ्यात विविध आजारांना बळी का पडतात?

जनावरे माळरानावर उगवलेल्या नवीन हिरव्या गवतावर चरत असतात व नदी नाल्यातील दूषित पाणी पितात. त्याद्वारे विविध रोगाचे जंतू जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात.

2. शेळ्या मेंढ्यांची वाहतूक केव्हा करावी?

सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा वातावरण थंड असेल तेव्हा शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करावी.

3. करडांची जास्त मरतूक कशामुळे होते?

करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते.

46 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ