पोस्ट विवरण
सुने
अंगूर
कीट
कृषि ज्ञान
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
11 Feb
Follow

द्राक्ष पिकातील पिठ्या ढेकूण व्यवस्थापन! (Management of Mealybug in the Grape crop!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

द्राक्ष हे बहुवर्षीय पीक असून, एकदा लागवड केल्यानंतर या पिकाचे आयुष्य साधारणतः 12 - 14 वर्षांचे असते. तेव्हा लागवडी संदर्भातील प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहून निर्णय घेणे फारच महत्वाचे ठरते. द्राक्ष हे नगदी पीक असून देशातील सर्वात महत्वाचे फळपीक मानले जाते. राज्यात प्रामुख्याने नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत द्राक्ष लागवड होते. या फळपिकाच्या वाढीकरिता, तसेच उत्पादनास पोषक असे वातावरण या विभागात आढळते. द्राक्षाचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी किडींचा/रोगाचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. द्राक्ष पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास द्राक्ष पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यातील एक महत्वाची कीड म्हणजे पिठ्या ढेकूण (Mealybug). गेल्या काही वर्षांपासून, द्राक्ष पिकावर या किडीचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. चला तर मग जाणून घेऊया पिठ्या ढेकूण या किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान व व्यवस्थापना याविषयी.

पिठ्या ढेकूण (Mealybug):

पिठ्या ढेकूण किटकाची ओळख (Identification of Grapes Mealybug) :

  • गेल्या काही वर्षांपासून, द्राक्ष पिकावर या किटकाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.
  • प्रौढ मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असून रंग पांढरट लालसर असते.
  • डोके आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात.
  • मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात जवळपास 600 अंडी घालते. अंडी वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात.
  • अंडी अंडाकृती, नारंगी रंगांची असतात.

पिठ्या ढेकूण किटकाची लक्षणे (Symptoms of Mealybug):

  • पिठ्या ढेकूण किटक बुंध्यातील, ओलांड्यातील, पानांमधील, कोवळ्या फांदीमधील रसशोषण करतो यामुळे पाने पिवळी पडून सुकून जातात तसेच या किडीच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो त्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या तसेच बुरशीची लागण झालेली दिसून येते.
  • नवीन फुटीची वाढ खुंटते. नवीन फुटीचे रूपांतर वेलीत न होता यू आकाराच्या आकडीत होते.
  • बुरशीमुळे पानांची अन्ननिर्मिती क्रिया मंदावते.
  • पिठ्या ढेकूण हा कीटक उष्ण आणि कोरड्या वातावरणात जास्त आढळतात तसेच या किटकाच्या शरीरावर कापसासारखा चिकट थर असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

पिठ्या ढेकूण किटकाचे व्यवस्थापन (Management of Mealybug):

  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 500 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • बुप्रोफेझीन 25% एससी (एचपीएम-अपोलो) 400 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 500 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • निर्यातक्षम  द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कृपया राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे यांनी वेळोवेळी प्रसारित केलेल्या अद्ययावत शिफारसी  प्रमाणे कीटकनाशक / बुरशीनाशक फवारावे . फवारणी करत असलेल्या औषधाचे उर्वरित अंश आपआपल्या ग्राहकांनी निर्धारित पातळीपेक्षा कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या द्राक्ष पिकातील पिठ्या ढेकूण किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. द्राक्ष वेलीला लागणारे प्रमुख रोग कोणते?

भुरी, करपा आणि केवडा हे द्राक्ष पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.

2. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी योग्य हवामान कोणते?

द्राक्ष पिकाच्या योग्य शाखीय वाढीसाठी उष्ण व कोरडे वातावरण उपयुक्त ठरते.

3. महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड कुठे होते?

महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड नाशिक जिल्ह्यात होते.

33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ