आंबा पिकात जानेवारी महिन्यात करा हे काम! (Mango Crop:Do this work in the month of January!)

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक राज्य आहे. आंबा शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कृषी व्यवसाय आहे. महाराष्ट्रातील आंबा शेती मुख्यत्वे राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात केली जाते, जेथे हवामान आणि मातीची परिस्थिती आंब्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. तथापि, आंबा शेतीत पीक यशस्वी होण्यासाठी योग्य जागा निवडणे आणि हवामानारूप योग्य ते व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण आंबा पिकामध्ये चांगल्या बहारासाठी जानेवारी महिन्यात करावयाच्या कामांविषयी जाणून घेणार आहोत.
झाडांची छाटणी व साफसफाई:
- जानेवारीत झाडाच्या कोरडया, रोगट किंवा अनावश्यक फांद्या छाटून टाका.
- झाडाभोवती साचलेले कोरडे पान, गळलेली फळे आणि तण काढून टाका.
- झाडाभोवती स्वच्छता ठेवल्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
मोहोर टिकवण्यासाठी आवश्यक उपाय:
- जानेवारीत झाडांवर मोहोर येण्यास सुरुवात होते. मोहोर टिकवण्यासाठी झाडांना हलके पाणी देण्याची गरज असते.
- मोहोरावर पावसाचा किंवा थंड वाऱ्याचा परिणाम होऊ नये, यासाठी योग्य उपाय करा.
- डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या अखेरपर्यंत मोहोर निघण्याचा कालावधी असतो. या कालावधीत झाडाच्या वयानुसार कोणत्या झाडाला किती पाणी द्यावे याविषयी जाणून घेऊया.
1ले वर्ष: 6.8 ते 1 लिटर पाणी.
2रे वर्ष: 2.8 ते 3.3 लिटर पाणी.
3रे वर्ष: 6.3 ते 7.5 लिटर पाणी.
4 वर्ष पुढे: 10 ते 13 लिटर पाणी.
टीप: मोहोर आल्यानंतर हळूहळू पाणी द्यावे.
सिंचन व्यवस्थापन:
- या काळात झाडांना कमी प्रमाणात, पण नियमित पाणी देणे गरजेचे आहे.
- जास्त पाणी दिल्यास मोहोर गळण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या सिंचनावर भर द्या.
खते व पोषण व्यवस्थापन:
जानेवारीत स्फुरद (फॉस्फरस) आणि पोटॅश यांचा योग्य प्रमाणात वापर करा. यामुळे फळधारणा सुधारते.
जिवामृत किंवा सेंद्रिय खते वापरून झाडांना पोषण पुरवावे.
अतिसघन आंबा पिकासाठी सर्वसाधारण जमीनीसाठी खत व्यवस्थापन:
पहिल्यावर्षी : नत्र 35 ग्रॅम, स्फुरद 15 ग्रॅम, पोटॅश 25 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.
दुसऱ्यावर्षी : नत्र 45 ग्रॅम, स्फुरद 25 ग्रॅम, पोटॅश 50 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.
तिसऱ्यावर्षी : नत्र 75 ग्रॅम, स्फुरद 50 ग्रॅम, पोटॅश 75 ग्रॅम, शेणखत 10 किलो प्रति झाड द्यावे.
चार वर्षाच्या पुढील झाडास : नत्र 120 ग्रॅम, स्फुरद 75 ग्रॅम, पोटॅश 100 ग्रॅम, शेणखत 15 किलो प्रति झाड द्यावे.
रोग व किड नियंत्रण:
- पावडरी मिल्ड्यू आणि थ्रिप्स यांसारख्या रोगांपासून मोहोराचे संरक्षण करा.
- कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करा.
- मोहोर येण्या आगोदर पोपटी रंगाच्या पालवीवर करावयाची फवारणी:
- डेल्टाम्रेथीन 2.8% ईसी (बायर-डेसिस) 9 मिली प्रति 10 लिटर पाणी याची फवारणी मोहोरावर घ्यावी. या फवारणीमुळे तुडतुड्यांपासून मोहोराचे संरक्षण होईल.
पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसाने करायची दुसरी फवारणी:
लॅम्बडा सहालोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 6 मिली व हेक्सकोन्याझोल 5% ईसी (टाटा रॅलीस-कॉन्टाफ) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याची फवारणी मोहोरावर घ्यावी. या फवारणीमुळे वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांपासून व रसशोषक किडींपासून मोहोराचे संरक्षण होईल.
थंडीपासून झाडांचे संरक्षण:
- जानेवारी महिन्यात थंडीचा प्रभाव जास्त असतो. झाडांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी झाडाभोवती काडी-कचऱ्याचा आच्छादन द्या.
- थंड वाऱ्याचा परिणाम मोहोरावर होऊ नये, यासाठी झाडाभोवती कुंपण तयार करा.
आंबा फळधारणेसाठी महत्त्वाचे घटक:
- झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.
- झाडांची फांदी फळांचे वजन पेलू शकतील याची खात्री करा.
- मोहोर गळू नये यासाठी नियमित निरीक्षण करा आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना करा.
टीप:
- फवारणीसाठी लागणारी पाण्याची मात्रा अंदाजाने घ्यावी.
- झाडाचा आकार, वयोमान यानुसार पाण्याची मात्रा ठरवावी .
- फवारणी संपूर्ण झाडावर घ्यावी.
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच एकापेक्षा अधिक घटक मिसळा.
- फवारणी सकाळी 11च्या आत व संध्याकाळी 4 नंतर द्यावी.
- फवारणीमध्ये स्टिकर 100% टाकायचं आहे.
जानेवारी महिन्यात आंब्याची योग्य काळजी घेतल्यास दर्जेदार मोहोर तयार होतो, फळधारणा चांगली होते, आणि उत्पादन वाढते. शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी, सिंचन, खत व्यवस्थापन, आणि रोगनियंत्रण या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला हवे. यामुळे बाजारात चांगल्या दरात आंबा विकण्याची संधी निर्माण होते. तुमच्या आंबा पिकात तुम्ही जानेवारी महिन्यात काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पीके” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. आंबा झाडाला लागणारे प्रमुख कीटक कोणते?
आंबा झाडाला लागणारे तुडतुडे, पिठ्या ढेकूण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा, कोळी, मिजमाशी अशे 10 ते 12 प्रमुख कीटक आहेत.
2. आंबा पिकाला मोहोर कधी येतो?
आंब्याच्या पिकाला मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते.
3. आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी सर्वात जास्त हानिकारक रोग कोणता?
पावडरी बुरशी म्हणजेच भुरी हा आंबा पिकावरील सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
