पोस्ट विवरण
सुने
आम
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
11 June
Follow

आंबा पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन (Mango Fruit fly Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले स्वागत आहे!

आपण तर जाणताच की आंबा हे फळ बाजारात 90 ते 100 दिवस उपलब्ध असते. आंबा शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कृषी व्यवसाय असून, महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रातील आंबा शेती मुख्यत्वे राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात केली जाते, जेथे हवामान आणि मातीची परिस्थिती आंब्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. पुरातन काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात असून 400 वर्षांपूर्वी पासून आंब्याचे व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात. आंब्याला भारतात व परदेशातही वर्षभर मागणी असते. आंबा पिकावर सुमारे 185 किडी आढळत असल्या तरी त्यातील तुडतुडे, पिठ्या ढेकूण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा अशा 10 ते 12 किडी महत्त्वाच्या आहेत. आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. जगभरात फळमाशीच्या 400 हून अधिक जाती असून, ही कीड वर्षभर विविध फळपिकांवर आढळते. फळमाशीच्या बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस, बॅक्ट्रोसेरा झोन्याटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या प्रमुख तीन जाती आंबा पिकावर आढळतात. निर्यातीवेळी आंबा फळामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कटाक्षाने तपासला जातो. तो आढळल्यास मोठे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण आंबा पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी जाणून घेणार आहोत.

फळमाशीची (Fruit Fly) ओळख:

  • फळमाशी रंगाने पिवळसर तांबूस असते.
  • फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
  • फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.

फळमाशी जीवनक्रम:

  • नर आणि मादी फळमाशीचे मिलन होते व त्यानंतर मादी फुलोऱ्यात आलेल्या पिकामध्ये आढळून येते.
  • एकदम कळीतून बाहेर आलेल्या छोट्या अशा फळावर फळमाशीची मादी डंख मारते आणि आतमध्ये अंडी घालते.
  • एक दोन दिवसात म्हणजेच अंडी घालण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यामधून अळी बाहेर येते व फळाच्या आतमध्येच वाढ चालू होते.
  • जसे जसे फळ मोठे होईल तसतसे आतमध्ये अळी पण मोठी होत जाते आणि फळ आतून खायला सूरवात करते.
  • अळी चा कालावधी संपल्यानंतर अळी फळातून बाहेर जमिनीत पडते व कोषावस्थे मध्ये जाते ज्यातून पुन्हा नवीन प्रौढ फळमाशी तयार होते.
  • पूर्ण वाढलेल्या अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात कोषावस्था 8 ते 12 दिवसांची असते कोषामधून फळमाशीचे प्रौढ किटक पुन्हा बाहेर येऊन अंडी देतात. अशा प्रकारे फळमाशीच्या एका वर्षात 7 ते 8 पिढ्या पूर्ण होतात.

फळमाशीची लक्षणे (Symptoms):

  • फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
  • त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात.
  • या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात.
  • या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.

फळमाशीमुळे होणारे नुकसान:

  • आंबा पिकामध्ये फळमाशीचा 25 ते 40 टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आढळून येतो.
  • फळांची गुणवत्ता कमी होते.
  • फळे खाण्यायोग्य राहात नाहीत.

फळमाशीचे आंबा पिकातील व्यवस्थापन:

  • फळांची काढणी योग्य वेळी करावी. झाडावर फळे पक्व होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • फळमाशीग्रस्त, बागेत खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते.
  • बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस या जातीच्या फळमाशीची कोषावस्था जमिनीत 2 ते 3 सेंटिमीटर खोलीपर्यंत असते. त्यामुळे झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी. या मातीमध्ये शिफारशीत दाणेदार कीटकनाशक मिसळावे.
  • प्रादुर्भावाच्या काळात झाडाखालची माती खुरप्याने 2 ते 3 सेंटिमीटर उकरून त्यावर क्लोरोपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस - तफाबान) 1 लिटर/ प्रति एकरी 200 लिटर पाणी याप्रमाणे तयार केलेले द्रावण माती पूर्णपणे ओली होईपर्यंत फवारावे.
  • या किडीची अळी अवस्था ही फळाच्या आत असल्याने तिथंपर्यंत रासायनिक कीटकनाशक पोहोचत नाही. नियंत्रणासाठी फवारणीऐवजी सापळ्यांचा व विषारी आमिषाचा वापर करावा.
  • बागेमध्ये कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
  • फळधारणा जेव्हा होईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टरीन (1000 पीपीएम) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नुकसानीची पूर्वसंकेत पातळी पाहून शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.

उपाय (Remedy):

  • फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक)100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फ्लुबेंडियामाइड 20% डब्ल्यूजी (टाटा-ताकुमी) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणीच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी:

  • फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
  • फवारणीसाठी वापरण्यात येणारे पाणी हे 6.5 ते 7.5 पीएच चे असावे.
  • फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा आहे याची खात्री करून घ्यावी.
  • फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
  • फवारणी मिश्रणामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नयेत.

तुम्हाला तुमच्या आंबा पिकात फळमाशीची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. आंबा झाडाला लागणारे प्रमुख कीटक कोणते?

आंबा झाडाला लागणारे तुडतुडे, पिठ्या ढेकूण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा, कोळी, मिजमाशी अशे 10 ते 12 प्रमुख कीटक आहेत.

2. आंबा पिकाला मोहोर कधी येतो?

आंब्याच्या पिकाला मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते.

3. आंब्यावरील कीटकांपैकी प्रमुख हानिकारक कीटक कोणता?

फळमाशी हा आंबा पिकावरील सर्वात जास्त हानिकारक कीटक आहे.

42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ