पोस्ट विवरण
सुने
कृषि
फल
आम
बागवानी
कृषि ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
1 Apr
Follow

आंबा फळ व्यवस्थापन (Mango Fruit Management)

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो,

पुरातन काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात असून 400 वर्षांपूर्वी पासून आंब्याचे व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात. परिपक्व फळांचा आकर्षक रंग, मधूर चव आणि उत्कृष्ट पौष्टीकता या गुणांमुळे आंबा हे फळ जगातील अत्युच्य फळ समुहामध्ये वरच्या स्थानावर विराजमान झाले आहे. आंबा या पिकाखालील क्षेत्र व त्यापासून मिळणारे उत्पादन यांचा विचार केला तर भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. आंबा शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कृषी व्यवसाय असून, महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रातील आंबा शेती मुख्यत्वे राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात केली जाते, जेथे हवामान आणि मातीची परिस्थिती आंब्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. आंबा हे फळ बाजारात 90 ते 100 दिवस उपलब्ध असते. परंतू भारतात व परदेशातही आंब्याला वर्षभर मागणी असते. म्हणूनच आंब्याचा हा लोकप्रिय हंगाम आला असताना, आपण आंबा फळाची गुणवत्ता, आकार आणि फळगळ व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

आंबा पिकात फळ गळ व्यवस्थापन (Fruit Management in Mango):

 • वातावरणात दिवसेंदिवस बदल पाहायला मिळत आहेत, कधी कमी-जास्त तापमान तर कधी अवकळी पाऊस यामुळे आंबा वनस्पतीची फळगळती, फळावरील रोग किंबहुना आंबा उत्पादनात घट होत असते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
 • फळगळती व फळावर येणाऱ्या रोगाचे कारण:
 • मोहर येऊन गेल्यानंतर साधरणत: मार्च-एप्रिल मध्ये आंबे यायला सुरुवात होते.

फळ गळ होण्याची कारणे:

 • सामान्यपणे याच महिन्यामध्ये वातावरणात बऱ्याच प्रमाणात पिकासाठी अनावश्यक असे बदल होतात.
 • यादरम्यान प्रामुख्याने हवा ही कोरडी व उष्ण वाहू लागते, जी सुष्क होऊन जाते व वातावरणमध्ये नमी राहत नाही, त्यामुळे पिकामधे जीवनसत्व, नायट्रोजनची कमतरता भासून फळ लागून ही त्याची पूर्णता वाढ होत नाही परिणामी फळ गळती होते.
 • फळ लागणीच्या वेळेस झाडाला पाण्याचा पुरवठा कमी असल्यास फळ संकुचन पावतात व फळे पिकण्यापूर्वीच जमिनीवर गळून पडतात.
 • बहुतांश वेळेस अपुऱ्या परागकण प्रक्रियेमुळे तसेच अतिघन बागेतील झाडामध्ये पोषण तत्वासाठी आपापसात होणाऱ्या प्रतिस्पर्धेमुळे देखील फळांची वाढ स्थगित होते व गळती होते.
 • वनस्पतीची वाढ नियामक PGR पीजीआरची कमतरता आढळल्यास, फळांवर किडी आणि रोगाचां प्रादुर्भाव होतो.
 • मोहरच संरक्षण केल्यानंतर आंब्यावर फळमाशी, पिठ्या ढेकूण, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या अनेक घातक कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचप्रकारे पानावर, फळावर काळी बुरशी पाहायला मिळते, ज्यामुळे आंब्याची घट झालेली दिसते.
 • दुर्गंध, काळ्या रंगाचे टिपके व अति पिकलेली फळ यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

आंबा झाडाच्या वयानुसार कोणत्या झाडाला किती पाणी द्यावे (Water Management According to the Age of Mango plant) याविषयी जाणून घेऊया.

1ले वर्ष: 6.8 ते 1 लिटर पाणी.

2रे वर्ष: 2.8 ते 3.3 लिटर पाणी.

3रे वर्ष: 6.3 ते 7.5 लिटर पाणी.

4 वर्ष पुढे: 10 ते 13 लिटर पाणी.

टीप: मोहोर आल्यानंतर हळूहळू पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :

 • आंबा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे अतिशय महत्वाचे आहे.
 • अतिसघन आंबा बागेसाठी व मध्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्याचे घटक असलेल्या जमीनीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी खालील खतांची मात्रा शिफारस केली आहे.
 • माती परिक्षणा आधारित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनाची शाश्वती खुपच अचुक होते.
 • अतिसघन आंबा पिकासाठी सर्वसाधारण जमीनीसाठी खत व्यवस्थापन:

पहिल्यावर्षी : नत्र 35 ग्रॅम, स्फुरद 15 ग्रॅम, पोटॅश 25 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.

दुसऱ्यावर्षी : नत्र 45 ग्रॅम, स्फुरद 25 ग्रॅम, पोटॅश 50 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.

तिसऱ्यावर्षी : नत्र 75 ग्रॅम, स्फुरद 50 ग्रॅम, पोटॅश 75 ग्रॅम, शेणखत 10 किलो प्रति झाड द्यावे.

चार वर्षाच्या पुढील झाडास : नत्र 120 ग्रॅम, स्फुरद 75 ग्रॅम, पोटॅश 100 ग्रॅम, शेणखत 15 किलो प्रति झाड द्यावे.

फळगळती व रोग यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना:

 • उष्ण वातावरणामुळे झाडामध्ये पाण्याची कमतरता भासते म्हणून फळ धारणेच्या काळात झाडाला वेळोवेळी भरपूर प्रमाणात पाणी द्यावे. त्यामुळे फळगळती थांबते, झाडामध्ये नमी टिकून राहून फळे ही रोगमुक्त व जमिनीतून पोषण तत्वांचे शोषण करत राहतात.
 • झाडामध्ये होणाऱ्या सर्व जैविक-रासायनिक प्रक्रियेला प्रतिसाद देत फळ काढणीसाठी परिपक्व बनतात.
 • झाडाला पाणी दिल्यानंतर दीर्घकाळ त्याचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपण प्लॅस्टिक मल्चिंगचे व्यवस्थापन करून फळ गळती रोखू शकतो. (आंब्याला ठिबक सिंचन ने पाणी पुरवठा करणे अगदी योग्य आहे.)

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यादरम्यान आंबा पिकात तुडतुड्यांचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस प्रादुर्भाव एप्रिल महिन्यापर्यंत आढळून येतो. आंबा फळपिकामध्ये येणाऱ्या या कीटक व रोगांमुळे फळे गळण्याचे प्रमाण वाढते. त्याचा फटका उत्पादनाला बसतो. यांच्या नियंत्रणावर लक्ष दिले नाही तर, प्रादुर्भाव थोड्या फार प्रमाणात वर्षभर दिसून येतो. चला तर मग आता जाणून घेऊया आंबा बागेतील कीटक व रोगाच्या नियंत्रणाविषयी:

आंबा पिकावरील तुडतुडे (Mango Jassid):

तुडतुडे झाडाच्या खाच खळग्यात लपलेले असतात. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तुडतुडे सक्रिय असतात. त्यानंतर एप्रिल महिन्यात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

तुडतुड्यांमुळे होणारे नुकसान व त्याची लक्षणे:

 • तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ मोहराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषतात. त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात आणि त्यानंतर गळून पडतात.
 • तुडतुड्याच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे मोहोर व पानावर काळ्या बुरशीची वाढ होते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो. 50 ते 70% पर्यंत आंबा उत्पादनात घट येऊ शकते.


आंबा पिकावरील भुरी रोग (Mango Powdery Mildew):

आंबा पिकावरील भुरी रोग हा विशेषतः गंभीर मानला जातो. यात फळे ही विकृत होतात त्याचा रंग हा साधारण रंगापेक्षा फिकट होत जातो व आंबा हा पिकण्यापूर्वीच गळून पडतो.

भुरी रोग नुकसानीचा प्रकार:

 • बुरशीच्या वाढीमुळे पेशीवरील अन्नरस शोषला जातो, प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते व मोहर करपतो.
 • रोगाची तीव्रता अधिक असल्यास 60 ते 80 टक्क्यापर्यंत नुकसान होते.
 • कोवळया पालवीवर रोग असल्यास पाने तांबुस व पांढरी होऊन वाळतात व गळून पडतात.
 • फळधारणेनंतर रोग उद्‌भवल्यास फळांची गळ होते.

तुडतुड्यांच्या नियंत्रणाचे उपाय:

 • आंब्याची बाग आंतरमशागत करून, स्वच्छ व तणविरहित ठेवावी.
 • बागेत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी झाडाच्या आतील भागातील फांद्याची योग्य प्रकारे छाटणी करावी.
 • नत्र खताची मात्रा देताना शिफारशी प्रमाणेच द्यावी.
 • तुडतुड्यांवरील जैविक नियंत्रण (300 लिटर पाणीप्रमाणे):
 • व्हर्टिसिलियम लेकॅनी 1500 मिली : मोहर येत असताना फवारणी.
 • निंबोळी अर्क - 5 टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (10,000 पीपीएम) 1 ली प्रति 300 ली पाणी : प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या अवस्थेत
 • तुडतुड्यांवरील रासायनिक नियंत्रण (प्रति लिटर पाणीप्रमाणे) तीव्र प्रादुर्भाव असताना
 • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यू जी (बायर-एडमायर) 15 ग्रॅम एकरी 300 लई पाण्यात मिसळून फवारावे किंवा
 • थायमेथोक्सम 25% डब्ल्यू जी (देहात-असेर) 120 ग्रॅम 300 ली पाण्यात मिसळून एकरी फवारावे.

भुरी रोगावर उपाय:

पहिली फवारणी: फुले येण्यापूर्वी

 • प्रोपिनेब 70% डब्ल्यू.पी (देहात-झिनाक्टो) प्रति एकर 600 ग्रॅम प्रति  300 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
 • बोरॉन 20% (देहात-न्यूट्री वन) स्प्रे: 300 ग्रॅम 300 लिटर पाण्यात विरघळवा.
 • आणि

दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीनंतर 10-12 दिवसांनी.

 • पिकाची बोरॉनची गरज भागवण्यासाठी पीक हंगामात दोन फवारण्या पुरेशा असतात किंवा
 • थायमेथोक्सम 25% डब्ल्यू जी (देहात-असेर) 120 ग्रॅम 300 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारावे किंवा
 • अमिनो ऍसिड 62% (देहात-फिक्सा) 600 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारावे फवारावे.

टीप:

 • फवारणीसाठी लागणारी पाण्याची मात्रा अंदाजाने घ्यावी.
 • झाडाचा आकार, वयोमान यानुसार पाण्याची मात्रा ठरवावी .
 • फवारणी संपूर्ण झाडावर घ्यावी.
 • तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच एकापेक्षा अधिक घटक मिसळा.
 • फवारणी सकाळी 11च्या आत व संध्याकाळी 4 नंतर द्यावी.
 • फवारणीमध्ये (देहात-Lokke) 100 मि.लि. प्रति एकर वापरावे.

आंबा पिकाचे फळ काढणीपूर्वी व्यवस्थापन:

 • आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून शेवटच्या टप्प्यातील आंब्याची काढणी सुरु आहे.
 • काढणीस तयार आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे म्हणजेच 80 ते 85 टक्के पक्वतेला करावी.
 • उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने फळांची काढणी उन्हाची तीव्रता कमी असताना सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी तसेच काढणी चालू असताना काढणी झालेले आंबे लगेच झाडाच्या सावली मध्ये ठेवावेत.
 • आंबा फळांचे काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी.

आंबा फळाची काढणी:

 • आंबा फळाची काढणी पूर्ण झालेल्या बागेमध्ये झाडाचा विस्तार नियंत्रित करण्याच्या दृष्टीने तसेच नवीन पालवी लवकर मिळविण्याच्या दृष्टीने झाडाच्या गरजेनुसार आवश्यक छाटणी करावी.
 • झाडावरील बांडगुळे व रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी तसेच गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावी.
 • मोठ्या फांद्यावरील बांडगुळे काढलेल्या तसेच छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर १ टक्का बोर्डोमिषणाची फवारणी करावी.
 • पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा फळाच्या काढणीनंतर झाडाला खते द्यावीत.
 • सर्वसाधारण दहा वर्षे वयाची झाडे किंवा ज्यांची आकाराने उत्पादन क्षमता 300 ते 400 फळे देण्याएवढी असेल, अशा झाडांना प्रत्येकी 50 किलो सेंद्रिय खत यामध्ये 45 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि 5 किलो मासळी खत 3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने द्यावे.
 • फळांची संख्या व शिफारसीत खतांची मात्रा यांचे गुणोत्तर लक्षात घेवून ही मात्रा झाडाच्या वयानूसार आणि उत्पादन क्षमतेनुसार वाढवून द्यावी.

तुमच्या आंबा पिकात तुम्ही फळ व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. आंबा झाडाला लागणारे कीटक व रोग कोणते?

तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. कीटक तसेच करपा व भुरी रोग.

2. आंबा पिकाला मोहोर कधी येतो?

आंब्याच्या पिकाला मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते.

3. आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी सर्वात जास्त हानिकारक रोग कोणता?

पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी हा आंबा पिकावरील सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.

57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ