पशुपालनासाठी 'मनरेगा पशु शेड योजनेद्वारे' मिळतेय 90 हजारांचे अनुदान! (A grant of 90,000 is being received through 'Manrega Pashu Shed Yojana' for Animal husbandry!)

नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारतामध्ये शेतात राबणारे तसेच पशुपालन करणारे शेतकरी यांना नजरेसमोर ठेवून भारत सरकारने बऱ्याच योजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे पशुपालकांसाठी आता केंद्र सरकार मनरेगा पशु शेड योजना घेऊन आले आहे. सदर योजनेचा लाभ भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात रहिवासी असलेल्या पशुपालकांना घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचे लाभ, पात्रता तसेच अर्ज कसा करावा याविषयीची थोडक्यात माहिती.
काय आहे 'मनरेगा पशु शेड योजना'?
- मनरेगा पशु शेड योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या पशुपालकास त्याच्या असलेल्या खाजगी जागेवर जनावरांसाठी शेड उभारण्याकरिता आर्थिक स्वरूपात काही रक्कम दिली जाईल.
- बरेचसे पशुपालक हे आर्थिक समस्येमुळे त्यांच्याजवळ असलेल्या जनावरांची व्यवस्थित देखभाल करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना जास्त नफाही मिळत नाही.
- पशुपालकाकडे तीन हून अधिक जनावरे असल्यास त्यास एक लाख साठ हजार रुपये मदत म्हणून मिळतात. परंतु ज्या पशुपालकांकडे तीन हून कमी जनावरे आहेत त्यांना 75 हजार 83 हजार रुपयांच्या दरम्यान मदत मिळेल. यासाठी पशुपालकाकडे मनरेगा कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे.
मनरेगा पशु शेड योजनेचे फायदे:
- तीन किंवा तीन पेक्षा कमी जनावरांकरिता 75 ते 83 लाख रुपये.
- तीन हून अधिक म्हणजेच चार जनावरांकरिता एक लाख साठ हजार रुपये.
मनरेगा पशु शेड योजनेसाठी पात्रता:
- मनरेगा पशु शेड योजनेकरिता अर्ज करण्यासाठी, खालील पात्रता असणे अनिवार्य आहे:
- यासाठी अर्जदाराकडे कमीत कमी तीन जनावरे असणे गरजेचे आहे.
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- पशुसंवर्धनासाठी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी.
- या योजनेसाठी फक्त शेतकरी आणि पशुपालक पात्र असतील.
- अर्जदार पशुपालकांनी त्याचा अर्ज आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या जिल्ह्यामधील असलेल्या मनरेगा विभागामध्ये जाऊन जमा करणे आवश्यक आहे.
- अर्जदार पशुपालकांनी पंचायतीच्या प्रतिनिधीस भेट देऊन त्याच्या पंचायतीचे मुख्य असलेले सरपंच किंवा वाढ सदस्य यांच्याशी संपर्क साधून अर्ज मिळविला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- आय प्रमाण पत्र
- मनरेगा जॉब कार्ड
- बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इ. अनिवार्य आहे.
मनरेगा पशु शेड योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम, मनरेगा पशु शेड योजनेचा अर्ज डाउनलोड करा आणि A4 आकारात त्याची प्रिंट काढा.
- अर्ज काळजीपूर्वक वाचा आणि सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- आता तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत अर्ज सबमिट करा.
- शाखेत जा आणि शाखा व्यवस्थापकाकडे फॉर्म सबमिट करा.
- शाखा व्यवस्थापक तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल.
- तुमचा अर्ज योग्य आढळल्यास, तुम्हाला या योजनेचे लाभ दिले जातील किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://nrega.nic.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx या वेब साईटला भेट द्या आणि या योजनेचा लाभ घ्या.
या योजनेचे उद्दिष्ट हे शेतकरी आणि पशुपालक यांच्या जनावरांकरिता उत्तम प्रकारचे आणि सुरक्षित असे वातावरण तयार करणे हे आहे.जेणेकरून जनावरांचे उत्पादन सुधारते तसेच शेतकऱ्यांना किंवा पशुपाकांना देखील अधिक नफा मिळवण्याकरता मदत होईल. मनरेगा पशु कार्ड योजना ही पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देऊन या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी सरकारचा एक उत्तम असा उपक्रम आहे. तुम्ही सदर योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातच्या “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. मनरेगा पशु शेड योजना भारतातील कोणत्या राज्यात लागू आहे?
मनरेगा पशु शेड योजना भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात रहिवासी असलेल्या पशुपालकांना घेता येणार आहे.
2. मनरेगा पशु शेड योजनेतुन पशुपालकांना किती अनुदान मिळेल?
मनरेगा पशु शेड योजनेतुन पशुपालकांना तीन किंवा तीन पेक्षा कमी जनावरांकरिता 75 ते 83 लाख रुपये व तीन हून अधिक म्हणजेच चार जनावरांकरिता एक लाख साठ हजार रुपये अनुदान मिळेल.
3. मनरेगा पशु शेड योजनेकरिता कोण पात्र असेल?
मनरेगा पशु शेड योजनेकरिता फक्त शेतकरी आणि पशुपालक पात्र असतील.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
