पोस्ट विवरण
झेंडूची लागवड (Marigold Cultivation)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
झेंडू हे संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणुन, तसेच भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणुन झेंडूचे पीक घेता येते. तसेच कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर देखील झेंडूची शेती करता येते. चला तर मग आजच्या या भागात अशीच झेंडू लागवडीविषयीची माहिती जाणून घेऊया.
झेंडू लागवडीसाठी योग्य हवामान:
- उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात झेंडूची वर्षभर लागवड करता येते.
- फुलांच्या उत्पादनासाठी मध्यम हवामान लागते.
- रात्रीचे 15 ते 18 अंश सेल्सिअस तापमान झाडाची वाढ व उत्पादनासाठी पोषक असते.
- थंड हवामानात हे पीक चांगले येते, दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते.
- जास्त पावसाचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
झेंडू लागवडीसाठी योग्य जमीन:
- झेंडू लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते.
- जमिनीचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असावा.
- भरपूर सेंद्रिय कर्बनी युक्त, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन झेंडू लागवडीसाठी योग्य मानली जाते.
- भारी आणि सकस जमिनीत रोपांची वाढ चांगली होते परंतु फुले कमी मिळतात.
झेंडूच्या प्रचलित जाती कोणत्या?
पिवळा
- इंडस - इंडस 55 / 43
- गोल्ड स्पॉट 2
- ईस्ट वेस्ट - मॅक्सिमा यल्लो एफ 1
- नामदेव उमाजी - यल्लो प्राइड प्लस
- इनोव्हा ऑरेंज
- बायोसीड - अम्बर यल्लो
- अप्सरा गोल्ड
- सिंजेंटा - इंडी यल्लो टॉल [ खरिफ, YHARIF ] - इंडी पिवळा उंच [ खरीप - YLOO1 ]
- यूएस ऍग्री - SW 503
ऑरेंज [भगवा]
- कलश - भगवती
- इंडस - अष्टगंधा
- नामदेव उमाजी - इनोव्हा ऑरेंज
- सिंजेन्टा - इंडिऑरेंज [ के आणि आर ]
- ईस्ट वेस्ट - बेंगल ऑरेंज एफ 1
- एनझा झाडेन - आस्था [ वर्षभर ]
- कलश- अष्टमंदिरा
- युएस ऍग्री - SW 512 [ वर्षभर ]
- सोनरी - ईस्ट वेस्ट - आरो गोल्ड F1
- इंडस 44
- नामधारी - गोल्ड कॉईन
- रासी - टॉल गोल्ड
- सिंजेंटा - इंडिगोल्ड [ k & r ]
सोनरी पिवळा
- ईस्ट वेस्ट - बेंगाल पिवळा F1
झेंडू लागवडीची पूर्व तयारी:
- लागवडीपूर्व जमिनीची 2 ते 3 वेळा खोलवर नांगरट, 2 ते 3 वेळा फणणी करून धसकटे व हरळीच्या काशा वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी.
- त्यानंतर एकरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून 20 किलो नत्र, 80 किलो. स्फुरद व 80 किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीच पूर्णपणे मिसळून घ्यावे. नंतर सरी वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सर्यासची नाके तोडून पाणी पुरवठ्याच्या सोयीप्रमाणे वाफे करून घ्यावेत.
झेंडू लागवडीविषयी:
- बियांपासून रोपे तयार करण्यासाठी 2 x 1 चौरस मीटर आकाराचे कुजलेले शेणखत टाकून गादीवाफे तयार करावेत. खात्रीच्या ठिकाणाहून बी अथवा रोपे आणावीत.
- एक हेक्टर लागवडीसाठी 750 ते 1250 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी निवडलेले बियाणे शक्यतो मागील हंगामातील असावे.
- रोपांना 5 - 6 पाने आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर 3 - 4 आठवड्यांनी रोपांची शेतात लागन करावी.
- लागवडीपुर्वी सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात पुढीलप्रमाणे अंतर राखावे.
- पावसाळी उंच झाडांसाठी 60 x 60 सेमी
- पावसाळी मध्यम झाडांसाठी 60 x 60 सेमी
- हिवाळी उंच झाडांसाठी 60 x 45 सेमी
- हिवाळी मध्यम उंच झाडांसाठी 45 x 30 सेमी
- हिवाळी बुटक्या झाडांसाठी 30 x 30 सेमी
- उन्हाळी उंच झाडांसाठी 45 x 45 सेमी
- उन्हाळी मध्यम उंच झाडांसाठी 45 x 30 सेमी
खते आणि पाणी व्यवस्थापन:
- पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला एकरी 10 किलो नत्र, 10 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश देऊन झाडांना मातीची भर लावावी.
- फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरु नये.
- झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.
- उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
झेंडू पिकावरील महत्वाच्या किडी:
- लाल कोळी
- केसाळ अळी
- तुडतुडे
झेंडू पिकातील महत्त्वाचे रोग:
- मुळकुज
- पानांवरील ठिपके
फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री:
- झेंडू लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यांनी फुले येतात.
- लागवड जून महिन्यात केल्यास तोडणी ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात येते.
- लागवड जानेवारी महिन्यात केल्यास तोडणी मार्च - एप्रिल महिन्यात येते.
- झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी.
- हारांसाठी देठ विरहित फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी देठासह फुले तोडावीत.
- फुलांची तोडणी दुपारनंतर करावी.
- फुले तोडताना कळ्या व कोवळ्या फांद्या यांना इजा करू नये.
- तोडलेली फुले सावलीच्या ठिकाणी गारव्याला ठेवावीत.
- कटफ्लॉवर्ससाठी 6 ते 9 फुलांच्या जुड्या बांधून त्या कागदी खोक्यांतून विक्रीसाठी पाठवाव्यात.
झेंडूच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण:
- फुलांच्या काढणीनंतर त्यांच्या रंग, आकार व जातीनुसार फुलांची प्रतवारी करावी व नंतर फुले बांबूच्या करंड्यात भरावीत.
- फुले बाजारात विक्रीसाठी पाठविताना पॉलिथीन पिशव्यांत अथवा पोत्यात भरून पाठवावीत.
- कटफ्लॉवर्ससाठी फुलांच्या जुड्या बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून फुले कागदी खोक्यांत भरावीत.
- झेंडूची तोडणी केलेली फुले पॉलीथीनच्या पिशवीत थंड जागी ठेवल्यास 6 ते 7 दिवसांपर्यंत चांगली राहतात.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार झेंडूची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या झेंडू पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. झेंडू पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
थंड हवामानात हे पीक चांगले येते व फुलांचे दर्जेदार उत्पादन मिळते.
2. झेंडूचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
झेंडू लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते. जमिनीचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असावा.
3. झेंडूच्या पिकातील महत्वाचे रोग?
झेंडूच्या पिकात मुळकुज व पानांवरील ठिपके हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ