पोस्ट विवरण
झेंडू पिकातील तण व्यवस्थापन (Marigold - Weed management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास कायमच मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडू हे संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये झेंडूची लागवड केली जाते. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणुन, तसेच भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणुन झेंडूचे पीक घेता येते. तसेच कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर देखील झेंडूची शेती करता येते. विविध रोग आणि कीटकांपासून पिकाचे संरक्षण करण्याबरोबरच उच्च दर्जाचे पीक घेण्यासाठी तणांचे नियंत्रण करणे देखील आवश्यक आहे. तणांच्या जास्त प्रमाणामुळे पिकाचे उत्पादन कमी होऊ शकते. यासोबतच झेंडूच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण झेंडू पिकामधील तण व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
झेंडू पिकात तणांमुळे होणारे नुकसान (Damage in Marigold crop due to Weeds) :
- जमिनीतील ओलावा, पोषक तत्वे, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी तण पिकाशी स्पर्धा करतात त्यामुळे उत्पादन कमी होते.
- तणांची तीव्रता सामान्यतः अल्फिसोल (लाल माती) मध्ये व्हर्टिसॉल (काळी कापूस माती) पेक्षा जास्त असते, रब्बी आणि उन्हाळी हंगामापेक्षा खरीप हंगामात तणांची तीव्रता जास्त दिसून येते.
- तण वनस्पती परिसर, लागवडीचा हंगाम आणि मातीच्या प्रकारानुसार भिन्न असतात.
- चिकणमाती मातीत बारमाही तण आणि लाल मातीत वार्षिक तण समस्याप्रधान असतात, झेंडू पिकाशी संबंधित सामान्य बारमाही तण म्हणजे हरळी(सिंडन डॅक्टिलॉन), मोथा (सायपेरस रोटंडस) आणि चांद वेल (कॉन्व्होल्युलस आर्वेन्सिस).
- वार्षिक गवतांमध्ये Dianebra retroflexa, Panicum isachne in vertisols आणि Digetartia marginata, Dactylocatinum aeqyptinum हे लाल मातीतील सामान्य तण आहेत.
- कॉमेलिना बेंघालेन्सिस, सायनोटिस एसपीपी हे सामान्यपणे पाहिले जाणारे इतर डिकॉट तण आहेत.
- झेंडू पिकाच्या मुळांना परजीवी म्हणून ओळखले जाते.
झेंडू पिकामधील तण नियंत्रणासाठी आंतरमशागत:
- आंतरमशागतीची मुख्य उद्दिष्टे आहेत (अ) तणांचे नियंत्रण (ब) मातीत हवा खेळती ठेवणे (क) जमिनीतील ओलावा टिकवणे (ड) बाष्पीभवन टाळण्यासाठी मातीचे आच्छादन तयार करणे.
- झेंडूची रोपे तयार केल्यानंतर आंतरमशागत प्रामुख्याने कुदळाच्या सहाय्याने केली जाते.
- कुदळाची रुंदी ओळ लावणीच्या अंतरावर आणि अचूकतेवर अवलंबून असते.
- पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आंतरमशागत करताना रोपे गाडली जाणार नाहीत किंवा फांद्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
- झेंडू पिकात 8 ते 10 वेळा आंतरमशागत केली जाते.
- भेगा पडू नयेत आणि जमिनीत ओलावा राहावा म्हणून तण नसतानाही वारंवार आंतरमशागत केली जाते.
झेंडू पिकात तणनाशकांचा वापर (Use of herbicides in Marigold crop) :
झेंडूचे शेत तयार करण्यापुर्वी:
- ऑक्सीफ्लोरफेन 23.5% ईसी (डाऊ-गोल) एकरी 120 मिलीची 400 लिटर पाण्यातून ओलसर जमिनीत फवारणी करावी.
- रुंद पानांचे तण उगवणीपुर्वी आणि उगवणीनंतर देखील हे नियंत्रणासाठी उपयोगी ठरते.
- पिक लागवडीपुर्वी शेताची मशागत करुन मगच लागवड करावी.
- हे तणनाशक लागवड करण्याच्या 90 ते 120 दिवस अगोदर वापरावे.
झेंडूच्या तयार केलेल्या शेतावरिल तण नियंत्रण:
- तण 1 ते 6 इंचाचे असतांना पॅराक्वॅट डिक्लोराईड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) 800 ते 1000 मिली / एकर फवारणी करावी.
- तणांसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले रोप देखील मरुन जाते, त्यामुळे शक्यतो लागवड करण्यापुर्वीच तणनाशक वापरावे.
- फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, झेंडूच्या पानांवर हे तणनाशक उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.
- तणांचे नियंत्रण हे तणांच्या बहुतांशी उंचीवर अवलंबुन असते.
झेंडूचे पीक उगवणीनंतर:
- पुर्नलागवड केलेल्या झेंडू साठीच उपयुक्त, लागवड करण्यापुर्वी किंवा लागवड केल्यानंतर वापरता येणारे तणनाशक पेंडिमिथालिन 30% ईसी (अडामा पेंडिगम) 1 लिटरची 400 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- झेंडूच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते त्यामुळे काळजीपुर्वक फवारणी करावी.
- मेटाक्लोर 50% ईसी (युपीएल-ॲमिकस) ची 800 मिली / एकर फवारणी करतांना जमिनीला चिकटुन करावी, झेंडूच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते त्यामुळे, काळजीपुर्वक फवारणी घ्यावी.
(वरिल माहिती उपयुक्त आहे तरी तणनाशक शिफारस स्व-जबाबदारी वर वापरावे!)
तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while spraying herbicides) :
- तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
- तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
- रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
- तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
- तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
- फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
- तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
- उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
- तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
- तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.
तुम्ही झेंडू पिकाचे तणांपासून कसे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. झेंडू पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
थंड हवामानात हे पीक चांगले येते व फुलांचे दर्जेदार उत्पादन मिळते.
2. झेंडूचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
झेंडू लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते. जमिनीचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असावा.
3. झेंडूच्या पिकातील महत्वाचे कीटक?
झेंडूच्या पिकात लाल कोळी, केसाळ अळी व तुडतुडे हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ