सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मच्छीमारांना कर्जमाफीची प्रतीक्षा

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मच्छीमारांना विविध कारणांसाठी कर्जे दिली जातात. राज्यातील मच्छीमारांना आतापर्यंत शेकडो कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, परंतु या कर्जाची वसुली होऊ शकलेली नाही. आता कर्जाची थकबाकी व त्यावरील व्याज मिळून ही रक्कम तब्बल ७४२ कोटी ९८ लाखांवर गेली आहे. हे कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, परंतु त्यावर अनेक महिन्यांपासून निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, त्याच धर्तीवर आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
