मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आले आहे. राज्यात 'राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान' ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. हे अभियानांतर्गत लघू अभियान १, २ आणि ३ समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
