Post Details
Listen
Schemes
शेतकरी योजना
DeHaat Channel
29 June
Follow

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (Mission for Integrated Development of Horticulture)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या विशेष योजनेविषयीची माहिती.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची (MIDH) उद्दिष्टे:

  • पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार आणि प्रचार करणे.
  • कुशल आणि अकुशल बेरोजगार तरूणां करिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • वैविध्यपूर्ण कृषि हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोउद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीओत्तर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूहू पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.
  • शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांचे गट निर्माण करणे व शेतकरी उत्पादक समूह स्थापित करण्यासाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे.
  • अस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.
  • मोसंबी, आंबा, कागदी लिंबू, पेरू, संत्री, आवळा, मोसंबी, काजू, इ. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादनात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे या बाबींवर या योजनेअंतर्गत अनुदान आहे.
  • सेंद्रिय शेतीला प्रोत्सहन देणे.
  • काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी पूर्व शितकरण गृह, पॅक हाऊस, शितखोली, शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे, फिरते पूर्व शितकरण गृह, रायपनींग चेंबर यांद्वारे काढणीपश्चात व्यवस्थापन करणे.
  • शासकीय, खासगी किंवा सहकारी क्षेत्रासाठी फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन करणे.
  • बियाणे प्रक्रिया, साठवण, भाजीपाला, इत्यादी पायाभूत सुविधा सुकर करणे.
  • फलोत्पादन क्षेत्रात विशषेत: नियंत्रित शेती या घटकामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करणे.
  • प्रति हेक्टरी प्रति युनिट जास्तीतजास्त पीक उत्पादन वाढीसाठी शेतक-यांना मार्गदर्शन करणे.
  • फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे.
  • शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य करणे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अर्ज लागणारी कागदपत्रे:

  • 8-अ प्रमाणपत्र
  • 7/12 उतारा
  • आधार कार्ड
  • खरेदी करावयाच्या उपकरणांचे कोटेशन/ बिल
  • आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात (MIDH) सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया:

  • महाडीबीटी च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल
  • प्रथम अर्जदाराने नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करावे
  • वापरकर्ता आयडी किंवा ओटीपी आधारित आधार क्रमांकच्या सहाय्याने लॉगीन करून थेट मुख्यपृष्ठावर क्लिक करा.
  • कृषि विभागासमोरील अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.
  • फलोत्पादन या घटकाअंतर्गत बाबी निवडा यावर क्लिक करा.
  • आवश्यक असलेली माहिती भरा जासकी (तालुका, गाव, गट क्रमांक/ सर्वेक्षण क्रमांक, मुख्य घटक, घटक प्रकार, योजना निवडा इत्यादी).
  • सर्व माहिती भरल्यानंतर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • ‘मी अर्ज केलेल्या बाबी’ ऑप्शन वर क्लिक करा.
  • यानंतर आपण केलेल्या अर्जाची स्थिती दिसणार आहे. ‘अर्ज सादर करा’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर पेमेंट गेटवे ओपन होईल. २३.६०/- रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ योजनेचा ऑनलाईन अर्जप्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

योजनेत सहभागी होण्यासाठी:

MIDH योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

MIDH योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ :

http://krishi.maharashtra.gov.in व http://mahanhm.in किंवा नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

तुम्ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ कोणते?

http://krishi.maharashtra.gov.in http://mahanhm.in हे कृषि विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

2. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती?

योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

3. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचे उद्देश काय?

पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार आणि प्रचार करणे व कुशल आणि अकुशल बेरोजगार तरूणां करिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचे मुख्य उद्देश्य आहे.

42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor