सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Jan
Follow
मराठवाडा व खानदेशातील वीस कारखान्यांकडून ४६ लाख टन ऊसगाळप

मराठवाडा व खानदेशातील ५ जिल्ह्यांतील १२ सहकारी व ८ खासगी मिळून २० कारखान्यांनी रविवारपर्यंत (ता. १९) ४६ लाख २२ हजार ८०२ टन उसाचे गाळप केले. या गाळतातून सरासरी ७.३६ टक्के साखर उताऱ्याने ३४ लाख ३२२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. यंदाचा ऊस गाळप हंगामात सहभागी झालेल्या वीस कारखान्यांपैकी सुमारे १६ कारखाने आपल्या दैनंदिन गाळप हंगामाच्या तुलनेत कमी क्षमतेने गाळप करीत असल्याची स्थिती आहे. जालना जिल्ह्यातील चार कारखान्यांचा गाळ् मात्र याला अपवाद आहे. तिथे किंचित गाळप क्षमतेच्या पुढे जाऊन होते आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
