सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Oct
Follow
मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७९ हजार १३ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात व पावसाळा संपल्यानंतर आलेल्या जोरदार पावसाने अनेक भागात पेरण्या खोळंबविण्याचे काम केले आहे. मराठवाड्यातील लातूर व छत्रपती संभाजीनगर या दोन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या आठ जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख ५ हजार ११० हेक्टर इतके आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यातील ७ लाख ४१ हजार १८० हेक्टरसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
