पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
14 Mar
Follow

मुक्त संचार गोठा पद्धती (Mukt Sanchar Gotha)

मुक्त संचार गोठा पद्धती (Mukt Sanchar Gotha)


मुक्त संचार गोठा पद्धती (Mukt Sanchar Gotha)

नमस्कार पशुपालकांनो,

पशु सुयोग्य व्यवस्थापनासाठी चारापाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा या गोष्टी ज्या जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा. या गोठ्याचा प्रमुख उद्देश म्हणजे गुरांचे ऊन, वारा, पाऊस यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण व्हावे, गुरांना आरोग्यदायक वातावरणात रहावयास मिळावे व पशुसंगोपन व्यवस्थित व्हावे. पण बंदिस्त गोठ्यातील अडचणींचा विचार करता, पशुपालक आता मुक्त गोठा संचार पद्धतीचा वापर दिवसेंदिवस जास्त प्रमाणात करू लागले आहेत. मोकळ्या जागेत कुंपण करून जनावरांना बांधून न ठेवता मोकळे सोडले जाते या पद्धतीलाच मुक्त संचार गोठा पद्धती म्हणतात. मुक्त संचार गोठ्यात वैरण, पाणी व स्वच्छ हवा 24 तास पुरवली जाते.

बंदिस्त पद्धतीमध्ये गाई, म्हशींना एकाच जागी बांधल्यामुळे काही समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाच्या सांध्याचे, खुरांचे आजार, कासेचे आजार, गर्भाशयाचे आजार इत्यादी मोठे आजार संभवतात. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पशुपालकांना अधिक पैसा व वेळ खर्च करावा लागतो. म्हणूनच आजच्या या लेखात आपण अधिक पैसा व वेळ वाचविणाऱ्या मुक्त संचार गोठा पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत.

गोठ्याचे प्रकार (Types of cowsheds) :

 • ग्रामीण भागात स्थानिक परिस्थिती व हवामान यानुसार जनावरांच्या निवा-याची सोय केलेली असते. त्यानुसार आपल्याकडे जनावरांचे विविध प्रकाराचे गोठे पहावयास मिळतात.
 • पाचटाच्या छपरात, घराच्या पडवीला, सोप्याला किंवा घराबाहेर भिंतीला उभारलेल्या आडोशाला तसेच काही ठिकाणी राहत्या घराच्या पाठीमागे बंदिस्त भागात जनावरांना निवा-यासाठी गोठे बांधलेले आढळतात. परंतु याउलट शासकीय दुग्धशाळा, संशोधन संस्था, आधुनिक सहकारी दुग्धशाळा, सैनिक दुग्धशाळा व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर शास्त्रोक्त पध्दतीचे गोठे पहावयास मिळतात.
 • साधारणपणे भौगोलिक परिस्थिती, हवामान, जनावरांची संख्या, गोपालकांची आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर गोठ्याचे प्रकार व मांडणी अवलंबून असते.
 • सद्यस्थितीत मुख्यत्वे पारंपारिक पध्दतीचे आणि मुक्त/खुले गोठे, या दोन शास्त्रीय पध्दतीचे गोठे अधिक प्रचलित होत असल्याचे दिसून येते.

मुक्त संचार गोठा:

 • या पध्दतीच्या गोठ्यात गायी/म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवसरात्र मोकळेच सोडलेले असते.
 • फक्त धारा काढते वेळी स्वतंत्र दोहनगृहात नेऊन धारा काढल्या जातात.

बंदिस्त गोठा:

 • बंदिस्त आवारात एका किंवा दोन्ही बाजूस आच्छादीत गोठा असतो व त्यात चारा आणि निवाऱ्याची सोय असते.
 • गोठयासमोरील मोकळी जागा सर्व बाजूंनी ४ फुट उंचीची भिंत उभारुन अगर कुंपन घालून बंदिस्त केलेली असते.
 • या मोकळ्या जागेत गाई/म्हशी मुक्तपणे फिरतात.
 • गोठ्यातील गव्हाणीत चारा घालण्याची व्यवस्था असते तर पाण्याची सोय गोठ्यात मोकळ्या जागेत हौद बांधून केलेली असते.
 • चारा व पाणी दिवसभर मिळेल याची काळजी घेतली जाते.
 • संशोधनाअंती प्रचलीत पध्दतीच्या गोठयापेक्षा मुक्त पध्दतीच्या गोठ्यातील गायांच्या / म्हशींच्या दुधउत्पादनात वाढ झालेली आढळली आहे. तसेच प्रजननातही सातत्य दिसून आले आहे.

मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे:

 • या पध्दतीच्या गोठ्यात बांधकाम खर्च कमी असतो.
 • कमी बदलासह गोठ्याच्या आकारात वाढ व घट करता येते.
 • मुक्त संचार गोठ्यातून दररोज शेण उचलावे लागत नाही. त्यामुळे वेळ व श्रम वाचतात.
 • माजावरील जनावरे ओळखणे सोपे जाते.
 • जनावरांच्या मनाप्रमाणे खाणे-पिणे चालते, पुरेसा व्यायाम मिळतो, योग्य जागा पाहून जनावरे आरामशीर बसू शकतात त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते व जनावरे निरोगी राहतात.
 • जनावरांना फिरण्याचे स्वातंत्र्य असल्याने पाय व खुरांचे आजार यांचे प्रमाण खूपच कमी होते.
 • दुभत्या जनावरांना होणारा कासदाह आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.
 • स्वतंत्र दोहनगृहात धारा काढल्यामुळे स्वच्छ दूध उत्पादनास मदत होते.
 • जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो.
 • पिण्यासाठी पाणी 24 तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यानंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते. याचा फायदा उत्पादन वाढीतून दिसून येतो.
 • नैसर्गिक सर्व सुविधा मिळाल्यामुळे गायी, म्हशी आनंदी वातावरणात राहतात. त्यामुळे म्हशींमधील पान्हा सोडण्याची समस्या सुद्धा कमी होते.
 • मुक्त संचार गोठ्यात कोंबड्या सोडल्यास त्या जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील गोचीड, कीटक खातात त्यामुळे जैवीक नियंत्रण होते.
 • दुग्धव्यवसायात वेळ, मनुष्यबळ व पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
 • अशा पद्धतीने वेळ, श्रम व पैसा वाचविणारी मुक्त गोठा संचार पद्धती पशुपालकांना दुग्ध व्यवसायात फार महत्वाची ठरते.

मुक्त संचार गोठ्यात घ्यायची काळजी (Care Tobe Taken in Mukt Sanchar Gotha):

 • एका गाईला किंवा म्हशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी 200 चौ.मी. जागा लागते.
 • एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो.
 • गाईला मुक्त सोडण्यापूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळी युक्त कंपाउंड करून आत गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते.
 • गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात.
 • या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी. गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात. परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत.
 • जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो.
 • गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट घालणे होय. अशाप्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो (Mukt Sanchar Gotha).

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करू शकाल. याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. गाईंना पायकूट घालणे म्हणजे काय?

गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट घालणे होय.

2. मुक्त संचार गोठा पद्धती म्हणजे काय?

मुक्त संचार गोठा या पध्दतीच्या गोठ्यात गायी/म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवसरात्र मोकळेच सोडलेले असते.

3. बंदिस्त गोठा पद्धती म्हणजे काय?

बंदिस्त आवारात एका किंवा दोन्ही बाजूस आच्छादीत गोठा असतो व त्यात चारा आणि निवाऱ्याची सोय असते अशा गोठ्याला बंदिस्त गोठा पद्धती असे म्हणतात.

60 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ