सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नांदेड जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

नांदेड: गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने विदर्भला अवकळी आणि गारपिठीचा इशारा दिला होता. यानंतर आता विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिठीने हाहाकार माजवला आहे. येथे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, अर्धापूर किनवट आणि उमरी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा आणि ज्वारी पिके आडवी झाली आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
