सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Jan
Follow
नांदेड विभागात ऊस गाळपाला गती
नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी शुक्रवारअखेर (ता.२७) ३४ लाख ७७ हजार ८९९ टन उसाचे गाळप केले, तर २९ लाख ८२ हजार ८७७ क्विंटल साखरचे उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या सूत्राने दिली. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कार्यालय, नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२४-२५ साठी २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २८ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यातील २८ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ