पोस्ट विवरण
नगरच्या राहुरी, कोपरगाव आणि कर्जतमधील ११ दूध संकलन केंद्रावर भेसळीप्रकरणी कारवाई
राज्यातील दूध भेसळीवरून कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. तर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आता मंत्री विखे यांच्याच जिल्ह्यात मोठी कारवाई दूध भेसळ प्रतिबंधक समितीने केली आहे. ही कारवाई नगरमधील ११ दूध संकलन केंद्रावर करण्यात आली असून भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी पी.बी. पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. पालवे व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने हजर होते. नगरच्या दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यात मोठी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाई अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ११ दूध संकलन केंद्रावर घडक कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यासह भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आ ले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ