पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Aug
Follow

'नमो शेतकरी महासन्मान'चा चौथा हप्ता दोन दिवसांत

राज्यातील जवळपास ९० लाख ८८ हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. वित्त विभागाने हप्ता देण्यास मान्यता दिल्याने पैसे वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती. पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबविण्याची घोषणा करून प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मागील वर्षी तीन तर यंदा चौथा हप्ता देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी पाचवा हप्ताही देण्यात येणार असल्याचे समजते.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ