पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Mar
Follow

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी

वाशीम तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. वादळी वारा व गारपिटीने शेतामध्ये असलेले गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा फळबागांसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या वर्षभरात शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तींना सामोरा जात आहे. दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाचा दर घसरलेला आहे. यातून उत्पादन खर्च भागवणेसुद्धा कठीण झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.


64 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ