सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Jan
Follow
नव्या वर्षातही शेतकऱ्यांना दूध अनुदानाची प्रतीक्षा ; सातारा जिल्ह्यातील ३९,१८४ शेतकऱ्यांचे अनुदान थकलेले
विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच रखडलेले दूध दर अनुदान नवीन वर्षांत तरी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होऊ लागला आहे. जिल्ह्यातील ३९ हजार १८४ शेतकऱ्यांचे सहा कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान थकलेले आहे. त्यांना पाच व सात रुपयांप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील प्रलंबित अनुदान देण्यासाठी मंत्रालय स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्ष खात्यावर अनुदान कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. महायुतीच्या सरकारने दूध दरातील तफावत दूर करून शेतकऱ्यांना अनुदानाच्या रुपाने मदत करण्यासाठी लिटर मागे पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पण, काही महिनेच शेतकऱ्यांना वेळेत हे अनुदान मिळाले.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ