पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Mar
Follow

ओल्या काजूगर विक्रीचा पर्याय ठरतोय सक्षम

सिंधुदुर्ग जिल्ह्याला विविध फळपिकांचे समृद्ध वरदान लाभले आहे. मात्र आंबा आणि काजू ही या प्रदेशातील दोन प्रमुख फळपिके आहेत. आंबा लागवड संपूर्ण जिल्हयात असली तरी किनारपट्टी आणि किनारपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या भागात हापूस लागवडीला अधिक पोषक वातावरण असते. त्या तुलनेत जिल्ह्यात काजू लागवडीला मात्र पोषक वातावरण आहे. त्यामुळे मागील २० ते २५ वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजूची लागवड झाली. अलीकडील काही वर्षात तर दरवर्षी पाच हजार हेक्टर याप्रमाणात लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सुमारे ७९ हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून, पैकी ६२ ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ