पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
17 Aug
Follow

एक शेतकरी एक डीपी योजना (One farmer One DP scheme)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटांना समोर जावे लागते. कधी दुष्काळ, कधी नैसर्गिक संकट तसेच लाईट नसल्याने देखील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठे आहे. वीज पुरवठा कायम नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणे खूप अवघड जाते. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीज पुरवठा कायम अखंडित उपलब्ध करून देण्याचा निर्णय "एक शेतकरी एक डीपी" या योजने अंतर्गत घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 14 एप्रिल 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मान्यता दिली होती. तसेच 14 ऑक्टोबर 2020 रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया या योजनेसाठीची पात्रता, अर्जाची पद्धत या सारख्या महत्वाच्या गोष्टींविषयी.

एक शेतकरी एक डिपी योजनेची उद्दिष्ट:

  • लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे.
  • विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणे.
  • तांत्रिक वीज हानी वाढणे.
  • रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ.
  • विद्युत अपघात.
  • लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे इत्यादि..
  • वरील कारणांमुळे शेतकऱ्यांना अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी देखील होणार नाही.

पात्रता व अटी:

  • महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला वयाची कोणतीही अट नाही.
  • या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील शेतकरी घेऊ शकतात.
  • शेतकऱ्यांना प्रति HP 7,000 रु. इतकी रक्कम महावितरणला अदा करावी लागेल.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

एक शेतकरी एक डीपी योजनेचे फायदे:

  • ज्या शेतकऱ्यांच्या 2 हेक्टरपेक्षा कमी जमीनी आहेत, त्यांना प्रति HP मात्र 7,000 रुपये द्यावे लागतील.
  • अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना मात्र 5000 रुपये द्यावे लागतील.

आवश्यक कागदपत्रे:

  • लाईट बिल
  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8/अ उतारा
  • 100 रुपये स्टॅम्प
  • जातीचा दाखला
  • मोबाईल नंबर

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील लिंक द्वारे अर्ज करता येईल - https://mahadiscom.in/ . या पेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.
  • त्यावर नवीन कनेक्शन साठी अर्ज भरा या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर अग्रिकल्चर (agriculture) वर क्लिक करा.
  • पुढे हॉर्स पावर म्हणजे एचपी निवडा. दिलेल्या बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिट करा.
  • पुढे तुमच्यासमोर नवीन फॉर्म उघडेल त्यावर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट जमा करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
  • त्यानंतर मेल आयडी मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे सबमिट करा. शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाऊनलोड करा.

हेल्पलाईन नंबर:

  • शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
  • राष्ट्रीय टोल-फ्री – 1912 / 19120
  • महावितरण टोल-फ्री – 1800-102-3435 / 1800-233-3435

तुम्ही एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे?

एक शेतकरी एक डीपी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अखंडित उच्च दाब विद्युत प्रवाह उपलब्ध करून दिला जातो.

2. एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागेल?

एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.

3. एक शेतकरी एक डीपी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली ?

एक शेतकरी एक डीपी या योजनेची अंमलबजावणी राज्यात 14 एप्रिल 2014 पासून करण्यात आली.

38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ