पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
9 Nov
Follow

सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 (Organic Farming Subsidy Scheme 2024)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेती कृषी योजना राबवण्यात येते. सेंद्रिय शेती योजनांमध्ये शेतातील कीटकनाशकांचा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर भर देण्यात येतो. जेणेकरून जमिनीचा देखील पोत सुधारण्यास मदत होते. सोबतच उत्पादनातील पिकांची प्रत सुधारण्यात मदत होते. यासाठी राज्य सरकार सेंद्रिय शेतीच्या विकासावर भर देत आहे. सेंद्रिय शेती विकास योजना अमलात आणण्यासाठी राज्य सरकारा मार्फत शेतीविषयक तसेच कृषी विषयक विविध योजनांना एकत्रित करून पुनर्रचना करण्यात आली आहे. जेणेकरून राज्यातील अति दुष्काळी भागात या योजनेचा विकास सहजरित्या होईल. आजच्या लेखात आपण याच पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा योजनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सेंद्रिय शेती म्हणजे काय (What is Organic Farming)?

सेंद्रिय शेतीचा साध्या शब्दात अर्थ म्हणजे नैसर्गिक शेती असा होतो परंतु तांत्रिक शब्दात सांगायचे झाले तर सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवन चक्र समजून घेऊन व रासायनिक पद्धतीचा अतिवापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय.

सेंद्रिय शेतीचा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश 2024 (Main Objectives of Organic Farming Subsidy Scheme 2024):

  • राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
  • रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर बंद करणे.
  • शेतकऱ्यांच्या मदतीने सेंद्रिय शेती ग्राम विकसित करणे.
  • सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजन करून त्यातून प्रबोधन करणे.
  • शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करणे तसेच पुरवठा करणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पादित मालाचे व्यवस्थापन आणि प्रमाणीकरण तसेच विक्री करणे.
  • ग्राहकास विषमुक्त उत्पादित पिके उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
  • शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल व प्रगतीपथावर आणणे हा मुख्य उद्देश.

सेंद्रिय शेती अनुदान योजनेच्या मुख्य अटी व पात्रता (Main Terms and Eligibility for Organic Farming Subsidy Scheme):

  • 50 शेतकऱ्यांचा 50 एकराचा गट तयार करणे.
  • गटात भाग घेतलेला शेतकरी तीन वर्षे योजनेस बांधील राहील.
  • रासायनिक खते वापरणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल.
  • गटात समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान दोन पशुधन असणे आवश्यक.
  • निवड झालेल्या शेतकऱ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक.
  • प्रत्येक शेतकऱ्याने माती व पाणी परीक्षण करणे बंधनकारक राहील.
  • कोरडवाहू किंवा बागायती शेतीचा प्रत्येकी स्वतंत्र गट करावा लागेल.
  • कोरडवाहू शेतीला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • शेतीसाठी सौर ऊर्जा स्वतःचा वापर करणाऱ्या गटात प्राधान्य राहील.
  • शेती गट दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असले पाहिजे.
  • महिला शेतकऱ्यांचा गट स्वतंत्र होत असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करावा.
  • योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला त्यापूर्वी योजनेतून वेगळे होता येणार नाही.

सेंद्रिय शेती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Important Documents):

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रहीवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • ७/१२ व ८अ
  • प्रतिज्ञापत्र

सेंद्रिय शेती योजनेचा लाभ (Benefits of Organic Farming Scheme):

  • उच्च सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • केंद्रीय सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान
  • सेंद्रिय निविष्ठा तयार करणे
  • योजनेतून उत्पादित मालाचे वाहतूक भाड्याची तरतूद
  • शेतीसाठी लागणारे अवजारे भाड्याने घेणे
  • उत्पादित मालाचे प्रमाणीकरण करणे
  • प्रत्येक गटासाठी भरीव आर्थिक तरतूद
  • एका शेतकऱ्याला 1 एकर व जास्तीत जास्त 2.5 एकर लाभ घेता येईल.

सेंद्रिय शेती योजना अनुदान पद्धत:

  • महाराष्ट्रात सेंद्रिय शेती योजनेला डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत राबविण्यात येते.
  • योजनेअंतर्गत विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या सहा जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकरी गटाला तीन वर्षाच्या योजनेच्या कालावधीत 15 लाख रुपये रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल.
  • सन 2023-24 साठी 20 कोटी रुपये कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे.
  • सदर योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी केंद्र सरकारचे 60% आणि राज्य शासन 40% असेल.
  • अनुदानाची पद्धत: प्रथम वर्ष 7.67 लाख रुपये, द्वितीय वर्ष 4.98 लाख रुपये, तृतीय 2.89 लाख रुपये

सेंद्रिय शेती अनुदान योजनेचे मुख्य फायदे (Key Benefits of Organic Farming Subsidy Scheme):

  • सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व जमिनीचा पोत सुधारतो.
  • रासायनिक खतांवरची निर्भरता कमी होते व शेतकऱ्यांचा वाढीव खर्च कमी होतो.
  • मृदा आरोग्य व जमिनीचे आरोग्य तसेच शेतकऱ्याचे आरोग्य देखील सुधारते.
  • विषमुक्त पिकांमुळे ग्राहकाचे आरोग्य सुदृढ राहते.
  • यातूनच शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया (Organic Farming Subsidy Scheme 2024 Application Process):

  • सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 साठी शेतकरी गटाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
  • अधिकृत वेबसाईटवर https://www.maharashtra.gov.in/ क्लिक करा.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. सेंद्रिय शेती म्हणजे काय?

सेंद्रिय शेतीचा साध्या शब्दात अर्थ म्हणजे नैसर्गिक शेती असा होतो परंतु तांत्रिक शब्दात सांगायचे झाले तर सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवन चक्र समजून घेऊन व रासायनिक पद्धतीचा अतिवापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय.

2. सेंद्रिय शेती अनुदान योजनेचा मुख्य उद्देश काय?

राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे आणि रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर बंद करणे हा सेंद्रिय शेती अनुदान योजनेचा मुख्य उद्देश आहे.

3. सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 साठी शेतकरी गटाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ