पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Apr
Follow
पालघरच्या टपोऱ्या जांभळाला मिळाले भौगोलिक मानांकन; 150 शेतकऱ्यांना होणार लाभ
पुणे: पालघर जिल्हा फळबागायत दारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून येथील चिकू प्रसिद्ध आहेत. तर चिकू या फळाला 2016 साली डहाणू, घोलवड या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यानंतर आता जिल्ह्यात बहाडोली म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जांभळाला देखील भौगोलिक मानांकन मिळाले असून बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर हे भौगोलिक मानांकन बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने मिळाले आहे. याबाबत कृषी विभाग आणि 'आत्मा' अंतर्गत 2019 पासून जांभूळ उत्पादकांना मार्गदर्शन केले जात होते. 30 मार्चला याबाबत प्रमाणपत्र मिळाले असून याचा थेट 150 शेतकऱ्यांना होणार आहे.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ