पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
15 Dec
Follow

पानाच्या खालच्या पृष्ठभागावरील सुरवंटावर नियंत्रण ठेवणारे सर्वोत्तम उत्पादन इल्लिगो - श्री. ज्ञानेशवर भुसारे.

"चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या बियाण्यांसह महत्वाचे असते ते वेळोवेळी पिकावरील कीटकांची काळजी घेणे. सुरवंटासारखे कीटक पिकाच्या आतोनात नुकसानीसाठी कारणीभूत ठरतात म्हणूनच त्यांचे योग्य वेळी नियंत्रण करणे महत्वाचे आहे." असा सल्ला देहात कंपनीचे विक्री अधिकरी श्री ज्ञानेशवर भुसारे यांनी शेतकरी बांधवांना दिला.

गिम्भा, जिल्हा- वाशिम, धननी केएसके कोठारी येथे दि. 14 डिसेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी गावामधून विविध शेतकरी बांधव उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. ज्ञानेशवर भुसारे यांनी देहात शेतकऱ्यांसाठी पुरवीत असलेल्या सेवा, पशुखाद्य, पोषण उत्पादने, पीक संरक्षण उत्पादने, DWS 555 अशा विविध उत्पादनांविषयी मार्गदर्शन केले. सोबतच खुराक 5000, देहात कॅटरकिल, देहात अझिटॉप, वेटनोकल गोल्ड, साबू अशा विविध देहातच्या उत्पादनां आणि सेवांबद्दलही विस्तृत माहिती दिली.

देहात इल्लिगो:

  • यामध्ये एक उल्लेखनीय ट्रान्सलामिनार क्रिया आहे ज्याद्वारे ते पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या सुरवंटांना नियंत्रित करते.
  • इल्लिगो वापरल्यानंतर 2 तासांनंतर सुरवंट पिकांचे नुकसान करणे थांबवतात.
  • हे एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) प्रणालीसाठी योग्य कीटकनाशक आहे

डोस:

54-88 ग्रॅम एकर

देहात DWS - 555:

  • झाडाची उंची: 98-105 सेमी
  • प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती
  • उच्च उत्पन्न
  • आकर्षक कणीसे
  • 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम
  • काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील.
  • पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान

बियाणे दर: 40 किलो/एकर

देहात कॅटरकिल:

  • सोयाबीन व कपाशी पिकांमधील अळ्यांवर प्रभावी.
  • कॅटरकिल हे पानाच्या वरच्या पृष्ठभागावर फवारणी करताच खालच्या पृष्ठभागावर झिरपते आणि परिणाम सुनिश्चित करते.
  • वनस्पतींच्या पेशींद्वारे सहजपणे शोषले जाते आणि त्यामुळे पावसाळ्यात ही प्रभावी ठरते.

डोस -

250 मिली एकर फवारणीसाठी

देहात अझिटॉप:

  • अनेक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अझिटॉप हे ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे.
  • अझिटॉपमध्ये खूप चांगले प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत.
  • अझिटॉपची दुहेरी प्रभावी क्रिया पिकाच्या अनेक टप्प्यांवर बुरशीजन्य संसर्गाचे नियंत्रण सुनिश्चित करते.
  • अझीटॉपमुळे उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे चांगला भाव मिळेल.

डोस -

300 मिली/एकर

खुराक 5000:

  • 10-15 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी योग्य
  • 22-23% प्रथिने आणि 4% फॅटने समृद्ध

वापरण्याचे प्रमाण: 500 ग्रॅम / लिटर दूध उत्पादन

वेटनोकल गोल्ड:

  • जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त
  • दूध उत्पादनात वाढ
  • दात आणि हाडे मजबूत होतात

वापरण्याचे प्रमाण: 10 मिली प्रति लिटर दूध किंवा 100 ग्रॅम प्रति दिन


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ