सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Jan
Follow
पाण्याअभावी बागायतीपासून ३३ गावे वंचित

पेण तालुक्यातील वाशी व शिर्की खारेपाटातील ५२ गावांपैकी १९ गावांना हेटवणेचे पाणी मिळाले आहे; मात्र उर्वरित ३३ गावे २५ वर्षांपासून बागायतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वर्षात तरी खारेपाटातील पाणीसंकट दूर होईल का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत दोन वेळा उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने खारेपाटातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी ७६६ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे नव्या सरकारने हेटवणे कालवा विभागाकडून लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
74 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
