पावसाळ्यात पशुधनाला रोगाच्या संसर्गाचा इशारा
पावसाळ्याच्या तोंडावर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पशुधनाला विविध संसर्गाचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून, विविध जिल्ह्यांना पशुधनांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात विविध पशुधनांना घटसर्प, शेळ्या मेंढ्यांना देवी, फऱ्या, पीपीआर, लाळ्या खुरकूत आदी विविध रोगांची लागण होण्याचा धोका असतो. गेल्या दोन वर्षांत लम्पी स्कीनसारख्या रोगाने मोठ्या प्रमाणावर पशुधनांचा मृत्यू झाला होता. यंदाही लम्पी स्कीनसारख्या रोगाचा उद्रेक होण्याचा धोका केंद्र सरकारने वर्तविला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विविध रोगांची लागण रोखण्यासाठी विविध लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ