पोस्ट विवरण
पाम लागवड तंत्र (Palm Cultivation)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
पाम हे एक नगदी पीक आहे. एक फायदेशीर व्यवसाय पीक म्हणून सुद्धा पाम ची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्यापासून बक्कळ असे पैसे सुद्धा कमावता येतात. पाम शेतीमधून शेतकरी 12 महिने उत्पादन घेऊ शकतात. पाम तेलाला गोल्डन पाम म्हणून सुद्धा ओळखले जाते. सध्या आपल्या देशातील 50,000 हेक्टर क्षेत्र पाम तेल झाडांच्या लागवडी खाली आहे. तसेच पामची शेती 15 हुन अधिक राज्यांमध्ये केली जाते. भारतातील प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, केरळ, गुजरात, गोवा, तामिळनाडू, महाराष्ट्र, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि अंदमान यांचा समावेश होतो. चला तर मग जाणून घेऊया या विशेष पिकाच्या लागवडीबद्दलची माहिती.
पाम पिक लागवडीसाठी उपयुक्त जमीन (Suitable Land for Pam):
- पाम हे पावसावर अवलंबून असलेले झाड आहे.
- कोणत्या ही प्रकारच्या मातीमध्ये पाम ची लागवड करता येऊ शकते.
- या रोपांच्या लागवडीसाठी मातीची खोली किमान 1 मीटर असावी.
- वाळूयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीत पाम ची लागवड करू नये.
- जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 एवढा असावा.
पाम पिक लागवडीसाठी उपयुक्त हवामान (Suitable Climate for Pam):
- पाम पीक लागवडीसाठी उष्ण - दमट हवामान मानवते.
- तापमान 200 - 270 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पामच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो.
- 33 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान वाढल्यास झाडाच्या प्रकाशसंश्लेषणक्रियेवर परिणाम होतो; तसेच फळांचे घड गळून पडतात.
- पामच्या योग्य वाढीसाठी पर्जन्यमान 2,000- 3,000 मिमी. असावे.
पाम पिक लागवडीसाठी हंगाम (Season for Pam):
पाम पिकाची लागवड ही जून ते डिसेंबर या महिन्यात करावी.
पाम लागवडीसाठी जमीन कशा प्रकारे तयार करावी:
- पाम लागवडीसाठी जमीन नेहमी स्वच्छ असावी तसेच शेतातील सर्व तण काढून घ्यावेत.
- लागवडीआधी जमीन एकदम भुसभुशीत करून घ्यावी.
पाम पीक लागवडीसाठी पूर्वतयारी:
- पाम ची शेती ही मुख्यत्वे बियाण्याद्वारे लागवड करून करतात.
- बियाणे जास्त सुप्त असल्यामुळे त्यांना 40 डिग्री सेल्सिअस तापमानात 75 दिवस आधी गरम करणे आवश्यक आहे.
- यानंतर बिया वाहत्या पाण्यात भिजवून 4 - 5 दिवस थंड होण्यासाठी ठेवाव्यात.
- बियाणे 10 ते 12 दिवसात उगवते, उगवण झाल्यानंतर पेरणी करावी.
पाम पिकाच्या उन्नत जाती (Pam Varieties) :
- पामच्या विशिष्ट अशा जाती नसून फळांच्या रचनेवरून व बियांच्या कवचाच्या जाडीनुसार वेगवेगळे तीन वर्ग करण्यात आले आहेत.
- ड्यूरा - बियांचे कवच जाड असून गर कमी ते मध्यम असतो.
- टेनेरा - बियांचे कवच मध्यम जाड असून गर मध्यम ते जास्त असतो.
- पिसिफेरा - कवच नसते.
नवीन जातीची निर्मिती करताना पातळ कवचाच्या टेनेरा पामचा ड्यूरा आणि पिसिफेरा या दोन जातींशी संकर केला जातो. नवीन जाती या बुटक्या, तेलाचे प्रमाण व दर्जा उत्कृष्ट असलेल्या, रोग व किडींना प्रतिकारक असाव्यात. ऊति- संवर्धनाने ऑईलपामची अभिवृद्धी करता येते. या पद्धतीने तयार झालेल्या जातीच्या एका झाडापासून प्रतिवर्षी सुमारे 250 किलो वजनाचा घड मिळतो.
पाम तेल शेती:
- पाम ची शेती ही मुख्यत्वे बियाण्याद्वारे घेतली जाते.
- बियाणे जास्त सुप्त असल्यामुळे त्यांना 40 डिग्री सेल्सिअस तापमानात 75 दिवस आधी गरम करणे आवश्यक आहे.
- यानंतर बिया वाहत्या पाण्यात भिजवून 4 - 5 दिवस थंड होण्यासाठी ठेवाव्यात.
- बियाणे 10 ते 12 दिवसात उगवतात आणि उगवण झाल्यानंतर पेरणी करावी.
पाम लागवड:
- पाम च्या लागवडीसाठी जमीन तणमुक्त करावी आणि जमीन चांगली भुसभुशीत होण्यासाठी दोन वेळा नांगरणी करावी.
- पाम तेल प्रत्यारोपणासाठी सर्वोत्तम हंगाम जून ते डिसेंबर हा असतो.
- त्रिकोणी लागवड पद्धतीनुसार 9 मीटर x 9 मीटर x 9 मीटर अंतर ठेवून लागवड करावी.
- तसेच 1 हेक्टर जागेत 143 ते 145 झाडे लावता येतात.
- 60 सेमी x 60 सेमी x 60 सेमी आकाराच्या खड्डयात लागवड करावी.
पाम पिकातील कीड आणि रोग (Insects and Diseases of Pam):
पाम शेतीमध्ये आढळणाऱ्या सामान्य कीटक आणि रोगांमध्ये पिठ्या ढेकूण, मावा, पाने खाणारी अळी किंवा नागअळी, गेंड्या भुंग्या, उंदीर, शेंडा करपा, व पर्णगुच्छ यांचा समावेश होतो.
काढणी:
- पाम शेतात लावल्यानंतर 5 ते 6 वर्षात काढणीस तयार होते.
- पाम शेतीमध्ये कापणीची वेळ निश्चित करणे फार महत्वाचे आहे, कारण ते तेलाच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर खूप परिणाम करते.
- फळे पिवळ्या - केशरी रंगाची होतात आणि 5 ते 8 फळे स्वतःच गळतात तेव्हा काढणी करता येते.
- याशिवाय फळाला बोटाने जोराने दाबल्यास पाम फळांमधून केशरी रंगाचे तेल निघते, तर समजावे की पाम काढणीसाठी तयार आहे.
- कापणी वर्षभर चालते आणि साधारणपणे 10 ते 14 दिवसांच्या अंतराने तीक्ष्ण चाकू किंवा विळ्याने कापणी केली जाते.
पाम लागवडीचे फायदे:
- इतर तेल पिकांच्या तुलनेत सर्वाधिक खाद्यतेल पाम तेलापासून मिळते.
- पामतेलाच्या पूर्वधारणेच्या कालावधीत शेतकऱ्यांना आंतरपीकातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
- चोरीचा धोका नाही आणि स्थानिक रोजगार प्रदान करतो.
- हे पीक वर्षभर मासिक उत्पन्न आणि चांगला बाजारभाव देते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार पाम पिकाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या पाम पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. पाम लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
पाम पीक लागवडीसाठी उष्ण - दमट हवामान योग्य आहे.
2. पाम लागवडीसाठी कोणती जमीन योग्य असते?
कोणत्या ही प्रकारच्या मातीमध्ये पाम पिकाची लागवड करता येऊ शकते.
3. पाम पिक लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता?
पाम पिकाची लागवड ही जून ते डिसेंबर या महिन्यात करावी.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ