पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
8 June
Follow

परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) (Paramparagat Krishi Vikas Yojana)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले स्वागत आहे.

परंपरागत कृषी विकास योजना (Paramparagat Krishi Vikas Yojana) ही योजना राज्य सरकारने 2015-16 पासून सुरू केली आहे. तसेच या योजनेत केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के सहभाग आहे. काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर होत आहे. फळे, भाजीपाला ताजा दिसण्यासाठी अनेक प्रकाराच्या औषधांचा वापर केला जातो. मात्र त्याचे आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतात. याबद्दलचे दुष्परिणाम संशोधनातूनही समोर आलेले आहेत. सरकारच्या कृषि विभागानेही याचा अभ्यास केला असून ग्राहक आणि शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परंपरागत कृषी विकास सेंद्रिय शेती योजना (Paramparagat Krishi Vikas Yojana) सुरू केली आहे. आपण आजच्या आपल्या या लेखात याच रासायनिक खतांचा वापर टाळावा म्हणून सरकारने सुरु केलेल्या महत्वपूर्ण योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

परंपरागत कृषी विकास योजनेचे उद्देश्य (Purpose of PKVY) :

परंपरागत कृषी विकास योजनेचा मुख्य उद्देश रासायनिक आणि अन्य हानिकारक खतांचा वापर करून जे पिक घेतले जाते त्यावर नियंत्रण मिळून परंपारिक पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक मदत करणे हे आहे. यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल आणि त्यांच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम पिकामुळे होणार नाही.

परंपरागत कृषी विकास योजनेचे वैशिष्ट्ये (Features of PKVY) :

 • देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहित करून आर्थिक मदत केली जात आहे.
 • जैविक शेती केल्याने शेतातील जमिनीची गुणवत्ता वाढते आणि त्या शेतात घेण्यात येणारे पीकही चांगले येते तसेच त्या शेतातील भाजीपाला ही आरोग्यासाठी चांगला असतो.
 • या योजनेअंतर्गत सरकार मूल्यवर्धन आणि वितरण तसेच क्लस्टर निर्मितीसाठी 8 हजार 800 रुपये देते तसेच क्षमता निर्माण करण्यासाठी 3000 रुपये प्रति हेक्टरी मदत ही दिली जाते.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारची कीटकनाशके, सेंद्रिय खते खरेदी करण्यासाठी प्रती हेक्टरी 31 हजार रुपयांची मदत करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत केली जाणारी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

परंपरागत कृषी विकास योजनेची पात्रता (Eligibility of PKVY):

 • अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असावे म्हणजेच भारतीय शेतकरीचं या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
 • अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
 • या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी केवळ शेतकरीच पात्र मानले जातात.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे शेती करण्यायोग्य जमीन असणे आवश्यक आहे.

परंपरागत कृषी विकास योजनेच्या अटी:

 • 50 एकर क्षेत्राचा 50  शेतकऱ्यांचा एक गट तयार करावा.
 • या गटामद्धे जे शेतकरी भाग घेतील त्यांना 3 वर्ष सेंद्रिय शेतीत भाग घेणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ हा एका शेतकऱ्यास 1 एकर ते 2.5 एकर शेती पर्यंतच घेता येतो.
 • शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारची रासायनिक किटकनाशके, रासायनिक खते वापरणार नाही याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
 • ज्या शेतकऱ्याने यापूर्वी सेंद्रिय शेती कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
 • गटात समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान 2 जनावरे असावीत.
 • शेतकऱ्याचे बँक खाते (पासबूक) असावे.
 • कोरडवाहू आणि बागायती असे दोन स्वतंत्र गट करावे, त्यात कोरडवाहू क्षेत्राला प्राधान्य द्यावे.
 • लाभार्थ्याने प्रत्येक वर्षी पाणी, माती तपासणे आवश्यक आहे.
 • अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य.
 • एक गट/समूह हा शक्यतो भौगोलिक व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या क्षेत्रातील असावा.
 • आदिवासी तसेच डोंगराळ क्षेत्रात प्रादेशिक परिषदेच्या मदतीने गट तयार करावा.
 • सौर कृषी पंपांच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

परंपरागत कृषी विकास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Important documents for PKVY) :

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र
 • जमिनीचा 7/12 उतारा
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • बँक खाते (पासबूक)
 • जातीचे प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो

परंपरागत कृषी विकास योजनेची अधिकृत वेबसाईट (Official website of PKVY):

https://pgsindia-ncof.gov.in.PKVY/Index.aspx

परंपरागत कृषी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा (Online Application process - PKVY):

 • सर्वात प्रथम परंपरागत कृषी विकास योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या होम पेज ला भेट द्या.
 • होम पेजवर गेल्यानंतर लॉगिन पर्याय निवडा.
 • त्यानंतर पुढील पेजवर विचारलेली संपूर्ण माहिती नोंदवा.
 • त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करा.
 • त्यानंतर या योजनेच्या अधिकृत साइटवर होम पेजवर येऊन आपले नाव हा पर्याय निवडावा लागेल.
 • त्यानंतर पहिल्या पेज वर या योजनेचा अर्ज मिळेल.
 • अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी.
 • संपूर्ण अर्ज भरल्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात या वेबसाईटवर अपलोड करावीत.
 • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घेऊन सबमिट या बटनावर क्लिक करावे.
 • अशा प्रकारच्या सरळ प्रक्रियेद्वारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता.

तुम्ही परंपरागत कृषी विकास (सेंद्रिय शेती) योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. परंपरागत कृषी विकास योजना केव्हा सुरु करण्यात आली?

परंपरागत कृषी विकास योजना योजना राज्य सरकारने 2015-16 पासून सुरू केली आहे. या योजनेत केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के सहभाग आहे.

2 . परंपरागत कृषी विकास योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती?

परंपरागत कृषी विकास योजनेची https://pgsindia-ncof.gov.in.PKVY/Index.aspx ही अधिकृत वेबसाईट आहे.

3. परंपरागत कृषी विकास योजनेचा उद्देश काय?

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा परंपरागत कृषी विकास योजनेचा मुख्य उद्देश आहे.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ