पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
15 Feb
Follow

कोंबड्यातील ‘पेस्टी व्हेंट’ आजार ('Pasty Vent' disease in chickens)

कोंबड्यातील ‘पेस्टी व्हेंट’ आजार ('Pasty Vent' disease in chickens)


कोंबड्यातील ‘पेस्टी व्हेंट’ आजार ('Pasty Vent' disease in chickens)

नमस्कार पशुपालकांनो,

मित्रांनो, पेस्टी व्हेंट (Pasty Vent) डिसीज हा पिलांना विशेषतः हिवाळा आणि पावसाळ्यात प्रभावित करतो. पण घाबरू नका, थोडीशी काळजी त्याला रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकते! योग्य ब्रूडर तापमान राखून, स्वच्छ पाणी आणि स्टार्टर फीड म्हणून दळलेला मका देऊन हा आजार टाळता येऊ शकतो मात्र, या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने पिलांचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे त्वरित उपचार सुरू करावा.

‘पेस्टी व्हेंट’ आजार कोंबड्यांमध्ये कधी दिसून येतो व लक्षणं काय? (When does 'Pasty Vent' disease appear in chickens and symptoms?) 

 • कोंबडीच्या लहान पिलांमध्ये सुरुवातीच्या काळात पेस्टी व्हेंट आजार दिसतो.
 • या आजाराचे लक्षण (symptom) म्हणजे विष्ठेचा एक छोटा गोळा पिलांच्या गुदद्वाराला चिटकलेला दिसतो.
 • जसजसे पिल्लू विष्ठेला वरच्या बाजूला काढण्याचा प्रयत्न करते, तसतसा तो तयार होत राहतो व कडक होतो; अशा प्रकारे लहान पिलांचे गुदद्वार बंद होते.
 • पिलांच्या गुदद्वाराभोवती कोरडे गोळे तयार होतात.
 • पिलू सामान्यत: गुदद्वार बंद झाल्यापासून दोन दिवसांच्या आत मरते, त्यामुळे या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
 • काही कोंबड्यामध्ये इतरांपेक्षा जास्त वेळा ‘पेस्टी व्हेंट’ आजाराची स्थिती दिसून येते. याचे कारण म्हणजे पिलांची उबवल्यानंतरची हाताळणी किंवा लांब अंतरावर केलेली वाहतूक हे असते.

‘पेस्टी व्हेंट’ आजाराची कारणे (Causes of 'Pasty Vent' Disease) :

उष्णतेचा धक्का : पिल्ले उबवणुकीदरम्यान, हॅचरी, वाहतूक आणि सुरुवातीच्या ब्रूडिंग कालावधीत तापमानाच्या धक्क्यांचा सामना करतात.

उच्च तापमान : उच्च तापमानात उष्मायन आणि लवकर ब्रूडिंग पिल्लांच्या पचनसंस्थेशी गडबड करते.

उन्नत ब्रूडर तापमान : 102 अंश फॅरनहाइट इतके किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असलेल्या अंड्यामधून निघालेल्या पिलांचे शारीरिक वजन अपेक्षित भरत नाही.

तापमानाची गरज : पिलांना पहिल्या सात दिवसांत 35 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांचा एफसीआर (खाद्याचे मांसामध्ये होणारे रूपांतर) उत्तम राहतो. पहिल्या सात दिवसांत जास्त गरम होऊ नये म्हणून योग्य तापमान ठेवावे.

सिकल बोवेल स्टूल : सिकल आतड्यांच्या विष्ठेमध्ये चिकटपणा असतो. त्यामुळे ती विष्ठा आतड्याच्या मलमूत्रासह पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही.

‘पेस्टी व्हेंट’मुळे शरिरात होणारे बदल (Changes in the body due to 'Pasty Vent')

लहान आतड्याची स्थिती:

 • लहान आतड्यांचे मुख्य कार्य आतड्यातील पाणी शरीरात शोषून घेणे हे आहे.
 • त्यामुळे पॅन्टिंग करतेवेळी पिले केवळ शरीरातील पाणी गमावत नाहीत, तर सेकल डायजेस्टामधील पाणी गमावतात.
 • सिकल आतड्यांमधील सूक्ष्मजीवांच्या असंतुलनामुळे चिकट विष्ठा बनते.
 • त्यापैकी जे सूक्ष्मजंतू तंतुमय किंवा लाँगफॅटी ॲसिडचे ॲसिटिक, प्रोपिओनिक आणि ब्युटीरिक ॲसिड्ससारख्या शॉर्ट फॅटी ॲसिडमध्ये रूपांतरित करतात आणि त्यांच्यातील असंतुलनामुळे पचनशक्ती आणि तंतूंमध्ये बदल होतो.
 • त्यामुळे फॅटी ॲसिड्‍स आणि तंतुमय घटकांचे अपचन होऊन व सिकलमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पेस्टी व्हेंट ही समस्या उद्‍भवते.

अपचन:

 • पचण्यास कठीण अन्न घटकांचे सेवन हे पिलांमध्ये पेस्टी व्हेंट होण्याचे प्रमुख कारण आहे.
 • यामुळे पिलांना अधिक घट्ट, चिकट मल बाहेर टाकावे लागते, जे अखेरीस त्यांच्या गुदद्वाराला चिकटून राहते.
 • याचे सामान्य कारण म्हणजे पिलांची अल्प विकसित पचनसंस्था.
 • अन्नपदार्थांचे विघटन करण्यासाठी कोवळ्या पिलांची पचनसंस्था एन्झाइम्ससह पूर्णपणे विकसित झालेली नसते.
 • जास्त इलेक्ट्रोलाइट्सने आजार होतो.
 • पिलांना जिवाणू आणि विषाणूजन्य आजार होतो. काही वेळा पिलांना अतिसार होतो.

‘पेस्टी व्हेंट’ आजाराची लक्षणे (Symptoms of 'Pasty Vent' Disease):

 • भूक व तहान न लागणे.
 • अशक्तपणा आणि आळशीपणा.
 • गुदद्वार बाहेर पडणे, त्याला विष्ठा चिकटलेली असते.

‘पेस्टी व्हेंट’ आजारावर प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures against 'Pasty Vent' disease):

 • अंड्यातून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्या पिलांचे संगोपन करा.
 • योग्य जागा, स्वच्छ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स द्यावीत.
 • पहिले 7 दिवस ब्रूडरचे तापमान योग्य ठेवावे.
 • खाद्यामध्ये प्रोबायोटिक नसेल तर पाण्यामधून द्यावीत.
 • चांगले स्टार्टर खाद्य द्यावे. यामध्ये शेल ग्रिट किंवा फिश, बोन मिल नसल्याची खात्री करावी. पहिले काही दिवस भरडलेला मका द्यावा.

पिलांची स्वच्छता:

 • कोमट पाण्यात बुडवलेल्या रुमालाने पिलांचे गुदद्वार हळुवार पुसून घ्यावे.
 • मलमूत्र कोरडे असताना जबरदस्तीने बाहेर काढू नये. त्यामुळे कातडी फाटू शकते.
 • पिलांची मागील बाजू वाहत्या कोमट पाण्याखाली ठेवावी. कोमट पाणी कडक झालेले मल मोकळे करण्यास मदत करते.

तुमच्या कोंबड्यांमध्ये पेस्टी व्हेंट आजाराची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पेस्टी व्हेंट आजार कसा होतो?

पचण्यास कठीण अन्न घटकांचे सेवन केल्याने सुरुवातीच्या काळातच पिलांमध्ये पेस्टी व्हेंट आजार होतो.

2. कोंबडीला झालेला पेस्टी व्हेंट आजार कसा ओळखावा?

विष्ठेचा एक छोटा गोळा पिलांच्या गुदद्वाराला चिटकलेला दिसतो. जसजसे पिल्लू विष्ठेला वरच्या बाजूला काढण्याचा प्रयत्न करते, तसतसा तो तयार होत राहतो व कडक होतो; अशा प्रकारे लहान पिलांचे गुदद्वार बंद होते.

3. कोंबड्यांला होणारा रोगप्रसार कसा थांबवावा?

कोंबड्यांतील रोगप्रसार (Poultry Diseases) टाळण्यासाठी डास, गोचीड, पिसवा, माश्‍या यांचा प्रतिबंध करावा. शेडच्या आजूबाजूला पाणी साठून दलदल होणार नाही, शेड कोरडे राहील याची काळजी घ्यावी. पक्षी, उंदीर येऊ नयेत म्हणून उपाययोजना करावी. यासाठी कीटकनाशक फवारणी, माश्‍यांसाठी ट्रॅप या बाबी उपयोगी पडतात.

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ