पोस्ट विवरण
सुने
अमरूद
कृषि ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
11 Dec
Follow

पेरूमधील फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो,

पेरूला जाम किंवा अमरूद असेही म्हणतात. अनुकूल हवामानामुळे पेरूची लागवड भारतभर करता येत असली तरी, उत्पादनात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे, त्यानंतर पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. पेरू लागवडीनंतर 18 महिन्यातच फळ येण्यास सुरुवात होते याच बहुगुणी फळ पिकावर येणाऱ्या फळमाशी या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण आजच्या लेखात बघणार आहोत.

फळमाशी कशी ओळखावी?

  • फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशीसारखी दिसते व साधारण 5 ते 6 मी. मी. लांब असते.
  • फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.
  • साधारणपणे फळमाशी पिवळसर सोनेरी दिसते.

फळमाशी पेरू पिकाचे काय नुकसान करते?

  • फळमाशीची मादी माशी सर्व फळाच्या पक्व फळात दोन ते तीन मी.मी. खोल फळाच्या सालीखाली साधारणत 100 ते 150 अंडी घालते या अंड्यातून साधारणत 2 ते 3 दिवसात मळकट पांढऱ्या रंगाच्या बिन पायाच्या अळ्या बाहेर पडतात.
  • या अळ्या तोंडाच्या बाजूस निमुळत्या असतात.
  • अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या आतील गरावर आपली उपजीविका करतात.
  • परिणामी अंडी घातलेल्या ठिकाणी फळे सडायला लागतात आणि गळतात.
  • फळातील गरावर उपजीविका करत असल्याने फळे सडून गळून पडतात काही फळे बाहेरून चांगली दिसली तरी आतून खराब व कुजलेली असतात.

फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन:

  • या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रती एकर 10 ते 12 फळमाशीचे रक्षक ट्रॅप सापळे पिकाच्या उंचीच्या प्रमाणे 4 ते 5 फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत किंवा बागेमध्ये मिथिल युजेनॉलचे सापळे एका एकरसाठी पाच किंवा दहा लावावे व त्यामधील कीटकनाशक 15 ते 20 दिवसांनी बदलणे गरजेचे आहे.
  • जर तुम्ही पेरूचे पीक घेत असाल तर आपल्या बागेत फळमाशीचे सापळे पहिल्याच पावसानंतर लगेच वापरायला हवे.
  • जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू देणे गरजेचे असून त्यामुळे या अळीचे कोश उष्णतेत नष्ट होतात.
  • मशागत करताना जमिनीमध्ये शिफारस केल्यानुसार कीडनाशक मिसळणे गरजेचे आहे.
  • शक्यतो फळमाशीला प्रतिकारक असणाऱ्या जातींची लागवड करणे गरजेचे आहे.
  • फळमाशी ग्रस्त बागेत पडलेली फळे गोळा करून ती नष्ट करून टाकावी किंवा लांब नेऊन त्यांचा नायनाट करावा.
  • फळधारणा जेव्हा होईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टरीन 1000 पीपीएम (उत्कर्ष-निमोझ) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू (एफएमसी-कोरेजेन) 60 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे.
  • किंवा फेनप्रोपॅथ्रिन 10% ईसी (सुमितोमो-डॅनिटॉल) 350-400 मिली 200 लिटर पाण्यातून एकरी फवारावे.
  • त्यासोबतच तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नुकसानीची पूर्वसंकेत पातळी पाहून शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.

तुमच्या पेरू पिकातील फळमाशीचे नियंत्रण तुम्ही कसे केले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


48 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ