मका पिकातील किडी आणि त्यांचे व्यवस्थापन (Pests in Maize crops and their management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. मका, हे जगातील सर्वात महत्वाच्या पिकांपैकी एक आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच हे पीक भारतासोबतच महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मका हे उबदार हंगामातील पीक आहे. त्याला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. मका पिकाचे 30 ते 40 टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग. मका पिकावर होणाऱ्या किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण मका पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
मका पिकावर आढळून येणाऱ्या किडी (Pests in Maize crop):
- अमेरिकन लष्करी अळी
- खोडकिड
- कणसे पोखरणारी अळी
- गुलाबी अळी
- मावा
अमेरिकन लष्करी अळी (American armyworm):
अंडी :
- एक मादी तिच्या संपूर्ण जीवनकाळात सुमारे 1500 ते 2000 अंडी 100 ते 200 च्या समुहात कोवळ्या पानांच्या खालच्या किंवा वरच्या बाजुला पुंजक्यात देत असून, राखाडी रंगाच्या मऊ केसांनी झाकलेली असतात.
- घुमटाच्या आकाराची पांढरी अर्धगोलाकार अंडी चार ते पाच दिवसात उबवतात.
अळी :
- अळी अवस्था पिकाला प्रत्यक्ष नुकसान करणारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे.
- अळी हिरवट तपकिरी रंगाची असून वेगवेगळ्या सहा अवस्थांमधुन जाते.
- अळयांची त्वचा गुळगुळीत असून पुर्ण वाढ झालेल्या अळीच्या तोंडावर पांढऱ्या रंगाच्या उलट्या वाय आकाराचे चिन्ह दिसते व समोरील आठव्या व मागुन दुसऱ्या शरीर वलयावर हलक्या रंगाचे चार चौकोनी ठीपके दिसतात.
- या महत्वाच्या बाबीवरुन अळीची ओळख होते.
- सामान्य लष्करी अळीचे शरीर तपकिरी असले तरी बहुतांश अळीची पाठ हिरवट रंगाची असते व अशा अळीच्या पाठीवर ठीपके गडद रंगाऐवजी हलक्या रंगाचे असतात.
- उन्हाळयात अळी अवस्था 14 दिवसांची व हिवाळयात 30 दिवसापर्यंत असू शकते.
- पुर्ण वाढ झालेली अळी 3.1 ते 3.8 से.मी. लांब असते. दिवसा अळी लपून बसते व रात्रीच्या वेळी प्रादुर्भाव घडवून आणते.
कोष :
- कोषावस्था म्हणजे सुप्तावस्था असून कोष जमिनीत 2 ते 8 सें.मी. खोलीवर असतात.
- कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात.
- कोषावस्था उन्हाळयात 8 ते 9 दिवसांची व हिवाळ्यात 30 दिवसापर्यंत असते.
प्रौढ :
- प्रौढ अवस्था ही निशाचर असून उष्ण व दमट वातावरणात जास्त सक्रिय असते.
- नर पतंगाच्या पंखाच्या पुढच्या बाजूस पांढरे ठिपके असतात व मादी पतंगाचे पंख राखाडी तपकिरी रंगाचे असतात.
- प्रौढांचे आयुष्य 10-12 दिवसांपर्यंत असून त्या कालावधीत मिलन करुन मादी अंडी देवून दुसरी पिढी चालु करते.
नुकसान:
- या नुकसानीचा प्रकार म्हणजे सर्वप्रथम अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पानांचा पापुद्रा खातात. त्यामुळे पानांना पांढरे चट्टे पडतात.
- दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळया पानांना छिद्रे करतात.
- कालांतराने या अळया पोंग्यात जावून छिद्रे करतात.
- जुनी पाने पर्णहीन होवून पानांच्या शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते.
- झाड फाटल्यासारखे दिसते.
- पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते.
- मध्यम पोंगे अवस्था कमी तर उशीरा पोंगे अवस्था अळीला जास्त बळी पडते.
- कालांतराने अळी कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करुन दाणे खाते.
अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन (Management of American armyworm):
- पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- किडीच्या सर्वेक्षणासाठी पिक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
- नर पतंग पकडण्यासाठी एकरी 6 कामगंध सापळे लावावेत.
- 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी 5 मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- अथवा अझाडीरॅक्टीन 1,500 पीपीएम (BACF - लिमडो) 5 मि.ली. प्रति लीटर पाणी प्रमाणे फवारणी करावी व नोमुरीया रिले या जैविक औषधाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 8 किलो/एकर फवारावे किंवा
- डेल्टामेथ्रिन 100% ईसी (11% w/w) (बायर-Decis) 60 मिलि एकर फवारावे किंवा
- फिप्रोनिल 5% एससी (देहात-स्लेमाईट एससी) 400 ते 600 मिलि एकर फवारावे किंवा
- स्पिनेटोरम 11.7 % एससी (Delegate - dow) 180 मिलि 200 लीटर पाण्यातून एकरी फवारावे किंवा
- नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% w/w एससी (Adama - Plethora) 175 मिलि 150 ते 200 लीटर पाण्यातून द्यावे.
खोडकिड (Stem borer):
खोडकिडीची ओळख:
- खोडकिडीच्या अळीच्या पाठीवर काळया ठिपक्यांचे पट्टे असून डोके गडद रंगाचे असते.
- पुर्ण वाढ झालेली अळी 2.2 सें.मी. लांब धुरकट करडया रंगाची असून डोके काळे असते.
नुकसान:
- नावाप्रमाणे या किडीचा नुकसानीचा प्रकार म्हणजे खोडाला आतुन पोखरणे.
- किडीची अळी अवस्था नुकसानकारक आहे.
- मादी पतंग पानांच्या खालच्या बाजुला 2 ते 3 रांगेत चपटया आकाराची 300 अंडी देते.
- अंडी 50 ते 100 च्या समुहात असतात.
- अळी अवस्था 14 ते 28 दिवसांची असून त्यात 5 ते 6 वेळा कात टाकते.
- पुर्ण वाढ झालेली अळी खोडाला छिद्र पाडुन आत कोषात जाते.
- कोषातुन आठवड्याने प्रौढ बाहेर पडतो. अळी पानांना समान रेषेत छिद्र करुन खोडाच्या आतील भाग पोखरते. त्यामुळे पोंगा पुर्ण वाळतो.
- पिकाची रोपावस्था किडीला बळी पडणारी असते.
- मका पिकाची उगवण झाल्यावर जवळपास चौथ्या आठवडयानंतर किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो. सदर अळीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे 10 टक्के झाडांच्या पानांवर गोल छिद्र किंवा 5 टक्के पोंगेमर आढळते.
खोडकिड्याचे व्यवस्थापन (Management of Stem borer):
- जमिनीची खोल नांगरट करावी
- तूर, चवळी ही पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.
- 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- नत्राचा आणि स्फुरदाचा नियंत्रीत हप्ता दयावा.
- किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.
- शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा 50,000 अंडीपुंज म्हणजेच 4 ट्रायको कार्डचा वापर करावा.
- दाट लागवड करु नये व पाण्याचा योग्य निचरा करावा.
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम + फिप्रोनिल 0.6% जीआर (देहात - स्लेमाईट अल्ट्रा) 4 किलोचा बेसल डोस द्यावा.
- किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% एससीची (देहात - Ataque) 60 मिली प्रति एकरी फवारणी करावी. किंवा
- एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात - illigo) 54 ते 88 ग्रॅम एकर द्यावे किंवा
- थायमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात - Entokill) 50 ते 80 मिलि एकर द्यावे किंवा
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) @100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
कणसे पोखरणारी अळी (Maize borer):
कणसे पोखरणाऱ्या अळीची ओळख:
- या किडीचे पतंग मध्यम आकाराचे मळकट पिवळे करडया रंगाचे असतात.
- या किडीची अळी हिरव्या असून 38 ते 50 मी.मी. लांब असते.
नुकसान:
- या किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था म्हणजे केसर अवस्था होय.
- अळया कणसातील दाण्यांवर उपजीविका साधतात. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
- एक मादी सुमारे 350 अंडी घालून अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये 15 ते 35 होते.
- मादीपतंग बहुदा कणसाच्या स्त्रिकेसरवर अंडी घालतात.
- अळया जमिनीत कोषावस्थेत जातात.
- कोषावस्था हवामानानुसार 10 ते 25 दिवसांची असते.
- सदर अळीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला लहान अळया उचलुन नष्ट कराव्या.
- पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
कणसे पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन (Management of Maize borer):
- ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी किडीची अंडी असलेले 3 कार्ड प्रति एकरी लावावेत.
- सुरवातीला निंबोळी अर्क 5% उगवणीनंतर 15 दिवसांनी फवारणी करावी.
- किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी.
- स्पिनेटोरम 11.7 % एससी (Delegate - dow) 180 मिलि 200 लीटर पाण्यातून एकरी फवारावे किंवा
- प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एस.जी (देहात-इल्लिगो) 80 ग्रॅम किंवा
- क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5 एस.सी. (देहात-अटॅक्यू) 120 मिली प्रति 200 लि. पाण्यातून ड्रेंचिंग करावे.
गुलाबी अळी (Pink Mite):
गुलाबी अळीची ओळख:
- ही अळी गुलाबी रंगाची असून डोके तपकिरी रंगाचे असते.
नुकसान:
- पिकाच्या सर्वच अवस्थेत गुलाबी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- सुरुवातीला अळी पानांवर लांब निमुळते छिद्र पाडते.
- कणीस भरण्याच्या अवस्थेत कणसातील दाणे खाते.
- या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेत नेहमी स्वच्छ ठेवावे.
- पक्षी थांबे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे वापरावेत.
- पुर्ण वाळलेली सुरळी उपटुन नष्ट करावी.
गुलाबी अळीचे व्यवस्थापन (Management of Pink Mite):
- नियंत्रणासाठी डायफेंथियूरोन 50% डब्ल्यूपी (सिजेंटा - पेगासस) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
- प्रोपरगाईट 57% ईसी (ओमाईट- धानुका) 400 मिली प्रति एकर किंवा
- स्पाइरोमेसिफेन 240 एससी 22.9% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर - ओबेरॉन) 200 मिलीची प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
मावा (Aphids):
मावा कीटकाची ओळख:
- मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
- मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.
नुकसान:
- माव्याच्या शरीरातून चिकट द्रव पानावर सोडला जातो. त्यामुळे काळी कॅप्नोडीयम बुरशी वाढून पाने काळी होतात.
- प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. एकंदरीत झाड पिवळे पडून सुकायला लागते. यामुळे उत्पन्नात घट येते.
मावा कीटकाचे व्यवस्थापन (Management of Aphids):
- निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
- फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
- बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.
तुम्ही मका पिकातील किडींचे व्यवस्थापन कसे करता? आणि कोणती कीटकनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. मका हे कोणत्या हंगामातील पीक आहे?
मका हे उबदार हंगामातील पीक आहे.
2. मका पिकाला किमान किती दिवसांचा कालावधी लागतो?
मका पिकाला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.
3. मका पिकात कोणते तण आढळून येतात?
मक्याच्या पिकामध्ये प्रामुख्याने अरुंद पाने असलेले तण व रुंद पाने असलेले तण आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
