पोस्ट विवरण
सुने
रोग
कीट
कृषि ज्ञान
फरसबी
कृषी ज्ञान
DeHaat Channel
7 Feb
Follow

फरसबी मधील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

फरसबीची लागवड भारतात मोठ्याप्रमाणात केली जाते. फरसबीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. फरसबी हे खरिपात घेतले जाणारे कमी कालावधीचे पीक आहे. आजच्या या लेखात आपण फरसबी मधील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.

प्रमुख रोग:

तांबेरा रोग:

लक्षणे :

 • तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
 • हे ठिपके हळूहळू जांभळट व थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
 • हे ठिपके गोल ते अंडाकृती आकाराचे असून विखुरलेले किंवा पुंजक्यांसारखे असतात.
 • तांबेरा रोगाची लक्षणे पर्णकोषावर आणि फुलांच्या फांदीवरही दिसतात.

रोग व्यवस्थापन :

 • रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
 • पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
 • वेळेवर पेरणी करावी.
 • पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
 • तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे.

पिवळा मोझॅक व्हायरस:

लक्षणे:

 • शेंडे रंगहीन होतात, पानांवर क्लोरोसिसचे पिवळे आणि हिरवे डाग विकसित होतात.
 • पांढरी माशी आणि मावा या कीटकांमुळे पिवळ्या मोझॅक व्हायरसचे संक्रमण होते.
 • रोग वाढल्यास सर्व पाने पिवळी पडतात.
 • शेंगा चांगल्या विकसित आणि पिवळ्या पडून सुकतात.
 • वाढ खुंटलेली असते.

रोग व्यवस्थापन:

 • पिकातील पांढऱ्या माशीचे संक्रमण रोखावे.
 • पांढरी माशी रोखण्यासाठी कार्बोफुरन 3% सीजी (अदामा-कार्बोमेन) प्रति एकर 3-5 किलो या प्रमाणात बियाणे पेरण्यापूर्वी मातीत मिसळावे.
 • प्रभावित रोपे काढून टाकावी.
 • मावा आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 50-60 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी.

अँथ्रॅकनोज:

लक्षणे:

 • फरसबीमध्ये अँथ्रॅकनोज हा एक बुरशीजन्य रोग आहे.
 • या रोगामुळे पान, फांद्या, शेंगा किंवा फळांवर पाणी शोषल्यासारखे डाग येतात.
 • अंडाकृती डागांभोवती स्पष्ट दिसणाऱ्या रंगीत कडा येतात.
 • फांदीचा खालचा भाग गडद तपकीरी आणि खडबडीत होतो.
 • गंभीर प्रकरणात पानगळ, झाड कोलमडणे किंवा फांद्यांची शेंडे मर होते.

रोग व्यवस्थापन:

 • रोगाची लक्षणे दिसताच प्रभावित भाग जाळून नष्ट करावेत.
 • रोग प्रतिरोधक वाणांची लागवड करावी.
 • अँथ्रॅकनोज नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 400 ग्रॅमची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

जिवाणूजन्य करपा:

लक्षणे:

 • पानावर, बोंडांवर आणि फांद्यांवर कोणेदार ते गोलाकार, लाल ते तपकिरी कडा असलेले मेणचट, पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात.
 • डाग तपकिरी होतात.
 • फांद्यांवर आणि खोडावर काळे व्रण येतात.

रोग व्यवस्थापन:

 • साफ, रोगमुक्त बियाणे पेरणीसाठी वापरावे.
 • बियाणे पेरण्यापूर्वी स्ट्रेप्टोसाइक्लीनमध्ये 30 मिनिटांसाठी बियाणे भिजवून ठेवावे.
 • करपा लागलेली रोपे जाळून टाकावीत.
 • स्ट्रेप्टोसाइक्लीन 6 ग्रॅम 120 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

प्रमुख कीटक:

शेंडे व फळ पोखरणारी अळी:

लक्षणे:

 • फुलांवर, कळ्यांवर खाल्ल्याची चिन्हे दिसतात.
 • कोवळे फुटवे तसेच काटक्या मरगळतात.
 • शेंगांवर आत शिरल्याची आणि बाहेर पडल्याची छिद्रे विष्ठेने बंद केलेली दिसतात.
 • फळातील गर नष्ट होऊन विष्ठेने फळ भरते.
 • अळ्या गुलाबी रंगाच्या असुन डोके तपकिरी असते.

व्यवस्थापन :

 • प्रति किलो बियाण्यावर 9 मिली इमिडाक्लोप्रिड 17.8% एस एल (बायर-कॉन्फिडोर)ने बीजप्रक्रिया करावी.
 • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) किंवा थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) किंवा फ्लुबेन्डियामाइड 39.35% एससी (बायर-फेम) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.

पांढरी माशी:

लक्षणे:

 • पानांवर पिवळे ठिपके येतात.
 • बुरशी विकसित होते.
 • पाने गोळा होऊन किंवा वाटीच्या आकाराचे होऊन विकृत होतात.
 • झाडाची वाढ खुंटते.

व्यवस्थापन:

 • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

लाल कोळी:

लक्षणे:

 • पानांच्या खालच्या बाजुला किंवा पानांवर कोळ्यांच्या लाल वस्त्या दिसतात.
 • कोळ्यांनी टाकलेली बरीचशी पांढरी कात देखील दिसते.
 • पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि पिवळे किंवा करपट भाग देखील विकासित होतात.

व्यवस्थापन:

 • नियंत्रणासाठी डायफेंथियूरोन 50% डब्ल्यूपी (सिजेंटा - पेगासस) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा प्रोपरगाईट 57% ईसी (ओमाईट- धानुका) 400 मिली प्रति एकर किंवा स्पाइरोमेसिफेन 240 एससी 22.9% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर - ओबेरॉन) 200 मिलीची प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

तुमच्या फरसबीच्या पिकात वरील पैकी कोणते रोग व कीटक दिसून आले? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ