पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Sep
Follow
पी.एम. किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना
कोल्हापूर जिल्ह्यात पी. एम. किसान योजनेच्या लाभापासून राज्यातील अद्यापही १३ हजार ३३५ खाती आधार लिंक झाली नाहीत. पी. एम. किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत आहे. परंतु तांत्रीक अडचणीमुळे अद्यापही जिल्ह्यातील १३ हजार ३५३ शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक झालेले नाही. यामुळे योजनेच्या लाभापासून हे शेतकरी वंचीत राहणार आहेत. याबाबत कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना बँकेमध्ये संपर्क करून बँक खाते आधारशी लिंक करावे. अथवा पोस्टात खाते काढावे; अशी माहिती देण्यात येत आहे.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ