पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Nov
Follow

पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळाला नाही, या नंबरवर फोन करा

देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते लाखो शेतकऱ्यांना मिळाले असून नुकताच 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र काही शेतकरी अजूनही 15 व्या हफ्त्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. काही कारणास्तव तुमचा हप्ता आला नसेल, तर तुम्ही योजनेच्या 155261 हेल्पलाइन नंबरवर कॉल करून योग्य मदत मिळवू शकता. त्याचबरोबर 1800115526 या नंबरवर देखील संपर्क करू शकता.तुमचा हप्ता का आला नाही, तो कशामुळे अडकला आहे, इत्यादी इतर माहिती तुम्ही या नंबरवरून मिळवू शकता. याशिवाय 011-23381092 या क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता, अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचा 15 वा हफ्ता अडकला आहे, अशा शेतकऱ्यांनी थेट हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ