पिकांमधील मर रोग: कारणे आणि व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
रॅल्स्टोनिया सोलॅनेसेरम जीवाणूमुळे मातीतून होणारा रोग म्हणजे पिकांमधील मर रोग. फळवर्गीय कुटुंबातील बहुतेक प्रजातींसह विस्तृत श्रेणीवर या रोगाचा परिणाम होतो. आजच्या या भागात आपण याच मर रोगाविषयीची माहिती, कारणे आणि व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
मर रोग कसा पसरतो?
- दूषित सिंचन पाणी
- संक्रमित रोपे
- दूषित जमीन
- बूट, मानवी हस्तक्षेप
- साधने आणि उपकरणे
मर रोगासाठी अनुकूल परिस्थिती:
उच्च तपमान (30-35 डिग्री सेल्सिअस), मातीची उच्च आर्द्रता आणि खराब निचरा
मर रोग पिकांमध्ये कशाप्रकारे प्रवेश करतो?
लागवडीच्या पद्धती, नैसर्गिक जखमा, कीटक किंवा (नेमाटोड) सूत्रकृमी किंवा वनस्पतींवरील जखमा, तण
मर रोगाची लक्षणे:
प्रारंभिक लक्षण:
- 1-2 नवीन पानांची अचानकपणे मर होते.
- वनस्पतीची एक बाजू सुकून जाते.
- झाड पूर्णपणे पिवळे न पडता मरण पावते.
कसे निरीक्षण आणि निदान करावे?
प्रारंभिक लक्षणांचे निरीक्षण करा:
- नवीन फुटव्यांचे पिवळेपणा न येता अचानकपणे वाळणे.
- जिवाणू ओझ (ooze) ची चाचणी. (ओझ (ooze) चाचणी म्हणजे जिवाणू जन्य मर रोगाची खात्री करण्यासाठीची चाचणी.)
- वाळलेल्या झाडांना काढून टाका.
- जीवाणूचा प्रसार टाळण्यासाठी माती जागेवर काढली जाईल याची काळजी घ्या.
- रोग लागलेले झाड खोडाजवळून कापून घ्या.
कसे व्यवस्थापन करावे?
- जिवाणू जन्य मर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कीटक व्यवस्थापन शिफारसीय आहे.
- जिवाणू जन्य मर रोगासाठी कोणताही एक सर्वोत्कृष्ट उपाय नाही.
प्रतिबंधः
मर रोग कसा टाळावा?
- संक्रमित शेतात लागवड टाळा.
- जर उपलब्ध असेल तर रोगमुक्त किंवा प्रतिरोधक वाणांचा किंवा किया कलम केलेल्या रोपांचा वापर करा.
- रोपे तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे निर्जंतुकीकरण करा.
- मातीचा सामू तपासा आणि समांतर ठेवा (6.2-6.5).
- मातीमध्ये सेंद्रिय घटक घाला.
- गादीवाफ्यामुळे निचरा वाढतो.
- मोकळे पाणी देणे टाळा.
- संक्रमित झाडे हाताळल्यानंतर हात धुवा.
- वापरलेल्या साधनांचे निर्जंतुककरण करा.
नियंत्रण :
रोग उपस्थित असताना काय करावे?
- कासुगामाइसिन 3% एसएल (कासू बी-धानुका) 400 एमएल किंवा
- व्हॅलिडामायसिन 3% एल (जेयू-वॅल्यू) 400 मिलीने प्रति एकर ड्रेंचिंग करावे.
तुमच्या कोणत्या पिकात मर रोगाची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
