पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
27 Apr
Follow

पाईपलाईन अनुदान योजना (Pipeline Subsidy Scheme)

नमस्कार शेतकरी बंधुंनो,

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती करून जास्तीत जास्त पीक घ्यावे व स्वतः समृद्ध व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या Pipe Line Yojana Maharashtra अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत आहे. आजच्या या लेखात आपण याच महत्वपूर्ण योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

पाईपलाईन योजनेंतर्गत अनुदान:

पाईपलाईन अनुदान योजनेत महाराष्ट्र सरकार अंतर्गत वितरित करण्यात येणारे अनुदान हे 50 टक्के तसेच जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकरी पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करून 50 टक्के अनुदान मिळवू शकतात.

पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ कुणाला मिळणार (Who will get benefit from Pipeline Subsidy Scheme) :

पाईपलाईन अनुदान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर विहिरीची नोंद आहे किंवा इतर कोणत्याही सिंचन स्त्रोतांची नोंद आहेत जसे की शेततळे, विहीर किंवा इतर सिंचन पद्धती इत्यादी. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करिता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. पाईपलाईन करिता सिंचन स्त्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पाईपलाईन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया (Pipeline Subsidy Scheme Selection Process) :

  • पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाइन करायचा आहे.
  • पाईपलाइन योजना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे.
  • पाईपलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.
  • निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल व त्यांना एसएमएस प्राप्त होईल.
  • या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

आवश्यक कागदपत्रे (Important Documents) :

  • सातबारा उतारा व आठ अ
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • बँकेसोबत लिंक आधार कार्ड
  • पाणी उपलब्धतेची प्रमाणपत्र
  • पाईप खरेदी केल्याची बिले

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Application Process) :

  • सर्वप्रथम गुगल वर जाऊन महाडीबीटी फार्मर असे टाईप करून सर्च करा.
  • आता आपल्यासमोर महाडीबीटी शेतकरी पोर्टलची एक अधिकृत वेबसाईट आलेली असेल त्या वेबसाईटला ओपन करा.
  • या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • तुम्ही तुमची वैयक्तिक बेसिक माहिती टाकून तसेच एक युजरनेम आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करून घ्या.
  • आता तुम्ही या वेबसाईटवर लॉगिन करा आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून सिंचन साधने व सुविधा ही बाब त्या ठिकाणी निवडा.
  • आता वरील पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पाईप संच किंवा पाईप लाईन असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर पाईपलाईन अनुदान योजना अंतर्गत करावयाचा अर्ज ओपन झालेला आहे, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • अशाप्रकारे आपण पाईपलाईन योजनेंतर्गत लाभ मिळविण्याकरिता ऑनलाईन अर्ज करू शकता.

तुम्ही पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पाईपलाईन अनुदान योजनेचा उद्देश काय?

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती करून जास्तीत जास्त पीक घ्यावे व स्वतः समृद्ध व्हावे हे पाईपलाईन अनुदान योजनेचे उद्देश्य आहे.

2. पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

पाईपलाईन अनुदान योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा.

3. पाईपलाईन योजनेंतर्गत किती अनुदान मिळते?

पाईपलाईन अनुदान योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार कडून वितरित करण्यात येणारे अनुदान हे 50 टक्के तसेच जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकरी पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करून 50 टक्के अनुदान मिळवू शकतात.

53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ